India

विजयदुर्ग किनाऱ्याजवळ दुबईचे जहाज बुडाले; रत्नागिरी तटरक्षक दलाची मदत

रत्नागिरीतील तटरक्षक दलाच्या कर्मचाऱ्यांनी वेळीच मदतकार्य सुरू केल्यामुळे जहाजावरील १९ कर्मचाऱ्यांना वाचवण्यात यश आले आहे. जहाजाच्या तळाला मोठे भोक पडल्याने विजयदुर्ग किनार्‍यापासून चाळीस वावमध्ये तेल वाहतूक करणारे दुबई येथील पार्थ हे जहाज बुडाले.

Ganesh Mate

सिंधुदुर्ग : दुबईहून-बंगळुरुच्या (Dubai) दिशेने जाणारे पार्थ हे तेलवाहतूक करणारे जहाज विजयदुर्ग (Vijaydurg) किनाऱ्यानजीक बुडाले. सुदैवाने या जहाजावरील (Parth Ship) सर्व कर्मचाऱ्यांना वाचवण्यात तटरक्षक दलाला यश आले आहे.

रत्नागिरीतील तटरक्षक दलाच्या (Ratnagiri Coast Guard) कर्मचाऱ्यांनी वेळीच मदतकार्य सुरू केल्यामुळे जहाजावरील १९ कर्मचाऱ्यांना वाचवण्यात यश आले आहे. जहाजाच्या तळाला मोठे भोक पडल्याने विजयदुर्ग किनार्‍यापासून चाळीस वावमध्ये तेल वाहतूक (Oil Transportation) करणारे दुबई येथील पार्थ हे जहाज बुडाले. हे जहाज दुबईतून बंगळूरच्या दिशेने जात होते.

जहाज बुडत असल्याचे लक्षात येताच जहाजावरील कर्मचाऱ्यांनी तटरक्षक दलाशी संपर्क साधला. त्यानंतर रत्नागिरीतील तटरक्षक दलाने या जहाजावरील १९ कर्मचाऱ्यांना वाचविले आहे.

लातूर जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी धीरज देशमुख यांची बिनविरोध निवड; अविनाश जाधव उपाध्यक्षपदी

'बाबा ऐकत नाहीत…', शरद पवारांना अॅडमिट केल्यानंतर काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

Viral Money Saving Trick: नोट खिशात ठेवण्याची 'ही' ट्रिक पाहिलीय का? पैसे पडणारच नाहीत, VIDEO व्हायरल

Raigad News: ४७ गावं, ३३ आदिवासी वाड्या तहानलेल्या! उमटे धरणाच्या गाळमुक्तीसाठी संघर्ष ग्रुप आक्रमक, १३ कंपन्यांना दिले निवेदन

Supriya Sule CM News : सुप्रिया सुळे मुख्यमंत्री होणार? राऊत म्हणाले, त्यांच्या शपथविधीला मी जाणार! राज्यात पुन्हा होणार राजकीय भूकंप?