फोटो सौजन्य - सोशल मीडिया  repo rate
India

Repo Rate Update: 'महागाई रोखण्यासाठी रेपो दर...' ! गोखले संस्थेच्या विद्यार्थी समितीची शिफारस

Inflation & Repo Rate Update: वाढत्या महागाईला आळा घालण्यासाठी गोखले संस्थेच्या विद्यार्थी चलनविषयक धोरण समितीने (GSMPC-6) रेपो दर ५.५०% वरून ५.७५% करण्याची शिफारस केली आहे.

श्रेया देशमुख
  • वाढत्या महागाईला आळा घालण्यासाठी रेपो दर ५.७५ टक्क्यांवर न्या

  • गोखले संस्थेच्या विद्यार्थी चलनविषयक धोरण समितीची शिफारस

  • गोखले संस्थेच्या विद्यार्थी चलनविषयक धोरण समितीच्या अध्यक्ष अपूर्वा गोयेंका यांची भूमिका

Inflation & Repo Rate Update: वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर गोखले संस्थेच्या सहाव्या विद्यार्थी चलनविषयक धोरण समितीने (जीएसएमपीसी-६) रेपो दरात २५ बेसिस पॉईंट्सची वाढ करून तो ५.५० टक्क्यांवरून ५.७५ टक्के करण्याची शिफारस केली आहे. तसेच चलनविषयक धोरणाची भूमिका तटस्थ ठेवण्याचा सल्ला दिला आहे.

समितीच्या अध्यक्ष अपूर्वा गोयेंका यांनी ही शिफारस सादर केली. वाढत्या महागाईचा दबाव अर्थव्यवस्थेत रुजण्यापूर्वीच वेळीच आणि योग्य प्रमाणात धोरणात्मक प्रतिसाद देणे गरजेचे असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले., Gokhale Institute Pune, GSMPC-6, Monetary Policy Committee, Inflation News, Apoorva Goenka, रेपो दर वाढ, गोखले अर्थशास्त्र संस्था, महागाई, अर्थविषयक बातम्या, मराठी बातम्या

अलीकडेच किरकोळ महागाईत झालेली वाढ हा समितीच्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरला. ग्राहक किंमत निर्देशांकावर (सीपीआय) आधारित महागाई ५.५४ टक्क्यांवरून ६.०९ टक्क्यांवर पोहोचली असून, तिने सहनशीलतेची वरची मर्यादा ओलांडली आहे. अन्न महागाई ८.९४ टक्के, तर घाऊक किंमत निर्देशांकावर (डब्ल्यूपीआय) आधारित महागाई १२.२९ टक्क्यांवर पोहोचली आहे. सीपीआयमधील ४ टक्क्यांपेक्षा अधिक महागाई असलेल्या घटकांचे वाढते प्रमाणही चिंतेचे कारण ठरले आहे.

दर वाढीच्या बाजूने मत मांडणाऱ्या सदस्यांमध्ये दक्षी जैन, कृष चेतन पटेल आणि अँजलीन जोमन यांचा समावेश होता. वाढत्या महागाई अपेक्षा, मूळ महागाईच्या अंदाजात वाढ आणि नकारात्मक असलेला प्रत्यक्ष धोरण दर लक्षात घेता प्रतिबंधात्मक पावले उचलणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. बाह्य दबाव कमी झाल्याने देशांतर्गत महागाईकडे लक्ष देण्यास अधिक वाव मिळाल्याचेही त्यांनी नमूद केले.

दर कायम ठेवण्याचा मतप्रवाह

मोहोना चौधरी, प्राची पराशर आणि वर्षा प्रियदर्शिनी यांनी रेपो दर ५.५० टक्क्यांवर कायम ठेवण्याच्या बाजूने मत मांडले. सध्याचा महागाईचा दबाव मुख्यत्वे पुरवठ्याशी संबंधित असून, विशेषत: अन्न आणि ऊर्जा क्षेत्रात आहे, असे त्यांचे म्हणणे होते.

यापूर्वीच्या दरवाढीचा परिणाम बँकिंग व्यवस्थेत पोहोचण्यासाठी अधिक वेळ लागेल, असा युक्तिवाद त्यांनी केला. वापर, सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग आणि खासगी गुंतवणुकीवर अनावश्यक बोजा पडू नये, यासाठी तरलता व्यवस्थापन आणि सावध दृष्टिकोनाचा त्यांनी पुरस्कार केला. मतभेद असूनही किंमत स्थैर्य राखत आर्थिक वाढ जपण्याच्या महत्त्वावर सर्व सदस्यांचे एकमत होते. समितीने भारताचा पहिल्या तिमाहीतील ७.८ टक्के जीडीपी वाढीचा दर, देशांतर्गत महागाईची स्थिती आणि बाह्य क्षेत्रातील घडामोडींचाही विचार केला.

वाढीचा उद्देश आर्थिक क्रियाकलाप दडपण्याचा नाही

प्रस्तावित दरवाढीचा उद्देश आर्थिक क्रियाकलाप दडपण्याचा नसून किंमत स्थैर्य जपणे आणि दीर्घकालीन शाश्वत वाढीसाठी परिस्थिती निर्माण करणे हा आहे. जीएसएमपीसी-६ च्या चर्चेतून पुराव्यांवर आधारित चलनविषयक धोरण चर्चेचे महत्त्व अधोरेखित झाले असून, विद्यार्थ्यांना समकालीन आर्थिक आव्हाने आणि धोरणात्मक निर्णयांवर चिकित्सकपणे विचार करण्याची संधी मिळाली, असे अपूर्वा गोयंका यांनी सांगितले.

गोखले संस्थेच्या विद्यार्थी चलनविषयक धोरण समितीच्या अध्यक्ष अपूर्वा गोयेंका यांची भूमिका

“सातत्याने वाढणारी महागाई कुटुंबांच्या अपेक्षा, वेतन वाटाघाटी आणि उद्योगांच्या किंमतविषयक निर्णयांवर परिणाम करू शकते. २५ बेसिस पॉईंट्सची मोजकी वाढ महागाईच्या अपेक्षा स्थिर ठेवण्यास आणि दुसऱ्या टप्प्यातील परिणामांना आळा घालण्यास मदत करेल, तसेच आर्थिक उत्पादनावर त्याचा परिणाम मर्यादित राहील.”

गोखले संस्थेच्या समितीने रेपो दराबाबत कोणती शिफारस केली आहे?

गोखले संस्थेच्या सहाव्या विद्यार्थी चलनविषयक धोरण समितीने (GSMPC-6) रेपो दरात २५ बेसिस पॉईंट्सची वाढ करून तो ५.५० टक्क्यांवरून ५.७५ टक्के करण्याची आणि चलनविषयक धोरणाची भूमिका तटस्थ ठेवण्याची शिफारस केली आहे.

रेपो दरात वाढ करण्याची शिफारस का करण्यात आली आहे?

वाढत्या महागाईला आळा घालण्यासाठी आणि महागाईचा दबाव अर्थव्यवस्थेत रुजण्यापूर्वीच वेळीच व योग्य प्रमाणात धोरणात्मक प्रतिसाद देण्यासाठी ही शिफारस करण्यात आली आहे.

या समितीच्या अध्यक्ष कोण आहेत?

अपूर्वा गोयेंका या गोखले संस्थेच्या विद्यार्थी चलनविषयक धोरण समितीच्या अध्यक्ष आहेत.

भाऊ, Hitman is Back! रोहित शर्माच पुन्हा मुंबई इंडियन्सचा कर्णधार? MI च्या एका फोटोने सोशल मीडियावर धुमाकूळ

Sankashti Chaturthi: संकष्टी चतुर्थीच्या दिवशी काय खावे आणि काय टाळावे, जाणून घ्या नियम

Fashion: पश्मीना शाल खरेदी करताय? जाणून घ्या तिचे वैशिष्ट्य, प्रकार आणि ओळखण्याच्या 'या' खास टिप्स

वाळू माफियांची मुजोरी! महसूल अधिकाऱ्याला रॉड अन् दांडक्याने बेदम मारहाण; नेमकं काय घडलं?

विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात पुरंदर विमानतळाचा मुद्दा गाजणार; भूसंपादन अधिकाऱ्यांवर तारांकित प्रश्न