सौजन्य : सोशल मीडिया 
India

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी केलं मोठं विधान; म्हणाले, 'केजरीवाल...'

केजरीवाल यांच्या अटकेनंतर दिल्ली न्यायालयाने तपास यंत्रणेने दाखल केलेल्या अर्जावर युक्तिवाद ऐकून घेतला. त्यानंतर त्यांना तीन दिवसांची सीबीआय कोठडी सुनावण्यात आली. सुनावणीदरम्यान आप नेत्याने स्वतःला निर्दोष घोषित केले होते.

कृपादान आवळे

चंदीगड : आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांना कितीही त्रास देण्याचा प्रयत्न झाला तरी ते झुकणार नाहीत, असे पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी सांगितले. 'अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) न्यायालयाकडून जामीन मिळाल्यानंतर भाजपच्या इशाऱ्यावर सीबीआयने केलेली अटक हा सीबीआयचा उघड गैरवापर आहे', असेही त्यांनी म्हटले आहे.

कथित मद्य धोरण घोटाळ्याशी संबंधित भ्रष्टाचार प्रकरणात केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) ने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केली. त्यानंतर मान यांनी विधान केले. भगवंत मान यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर एका पोस्टमध्ये केजरीवाल यांचा फोटोही शेअर केला आहे.

त्यात त्यांनी म्हटले की, 'हे चित्र हुकूमशाहीविरुद्धच्या संघर्षाचे आहे. तुम्ही कितीही त्रास द्याल तरीही अरविंद केजरीवाल त्यापुढे झुकणार नाही. अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) न्यायालयाकडून जामीन मिळाल्यानंतर भाजपच्या इशाऱ्यावर सीबीआयने केलेली अटक हा सीबीआयचा उघड गैरवापर आहे'.

केजरीवाल यांच्या अटकेनंतर दिल्ली न्यायालयाने तपास यंत्रणेने दाखल केलेल्या अर्जावर युक्तिवाद ऐकून घेतला. त्यानंतर त्यांना तीन दिवसांची सीबीआय कोठडी सुनावण्यात आली. सुनावणीदरम्यान आप नेत्याने स्वतःला निर्दोष घोषित केले होते.

Mumbai News: भारतावर अतिवृष्टी, पूर आणि दुष्काळाचे संकट! महाराष्ट्रात दुष्काळ परिस्थितीची चिन्हे

मिनी महाबळेश्वर गारठलं! तापमान थेट एकेरी अंकात; पर्यटकांचा ओढा वाढला

Kolhapur Drink and Drive: कोल्हापुरात मद्यधुंद कारचालकाने दोघा भावांना चिरडले; गोकुळच्या माजी अध्यक्षांच्या मुलाला अटक

जुन्या कॅसेटला मिळाली नवी ओळख! 44 वर्षांपूर्वी फ्लॉप झालेलं गाणं GTA 6 मुळे पुन्हा ट्रेंडमध्ये

Bajra Soup: थंडीच्या दिवसांमध्ये सकाळच्या नाश्त्यात करा बाजरीच्या सूपचा समावेश, पित्ताच्या त्रासापासून मिळेल सुटका