पुतिन यांचे दिल्लीत आगमन! पंतप्रधान मोदींनी गळाभेट घेऊन केले भव्य स्वागत (Photo Credit- X) 
India

Putin in India: पुतिन यांचे दिल्लीत आगमन! पंतप्रधान मोदींनी गळाभेट घेऊन केले भव्य स्वागत, उद्या होणार द्विपक्षीय चर्चा

रशिया-युक्रेन युद्ध आणि रशियावर अमेरिकेने घातलेल्या निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर पुतिन यांचा हा दौरा होत असल्याने संपूर्ण जगाचे लक्ष या भेटीकडे लागले आहे.

नितिन कुऱ्हे
  • पुतिन दिल्लीत दाखल!
  • रशियावरील निर्बंधांदरम्यान भारत भेटीला महत्त्व
  • मोदी-पुतिन उद्या द्विपक्षीय चर्चा करणार

दिल्ली: रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आज (गुरुवार) भारत भेटीसाठी दाखल झाले आहेत. पुतिन यांचे विमान राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील पालम विमानतळावर सायंकाळी सुमारे ७ वाजता उतरले. पुतिन हे २३ व्या भारत-रशिया वार्षिक शिखर परिषदेत (India-Russia Annual Summit) भाग घेण्यासाठी भारताच्या दौऱ्यावर आले आहेत. रशिया-युक्रेन युद्ध आणि रशियावर अमेरिकेने घातलेल्या निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर पुतिन यांचा हा दौरा होत असल्याने संपूर्ण जगाचे लक्ष या भेटीकडे लागले आहे.

पंतप्रधान मोदींनी केली गळाभेट

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या स्वागतासाठी पालम विमानतळावर रेड कार्पेट अंथरण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः पुतिन यांच्या स्वागतासाठी विमानतळावर उपस्थित होते. व्लादिमीर पुतिन विमानातून बाहेर येताच पंतप्रधान मोदींनी गळाभेट घेऊन त्यांचे भव्य स्वागत केले. रात्री पंतप्रधान मोदी पुतिन यांच्यासाठी डिनर (रात्रीचे भोजन) आयोजित करणार आहेत.

'या' महत्त्वाच्या करारांवर होणार चर्चा

४ वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर पुतिन भारत दौऱ्यावर आले आहेत. पंतप्रधान मोदी आणि पुतिन यांच्यात उद्या (शुक्रवार) द्विपक्षीय चर्चा होईल आणि संयुक्त निवेदन जारी केले जाईल. या बैठकीत अनेक मोठ्या संरक्षण करारांवर (Defense Deals) चर्चा होण्याची शक्यता आहे. दोन्ही देशांमध्ये ब्रह्मोस क्षेपणास्त्राच्या ऍडव्हान्स व्हर्जन (Advanced Version) वर महत्त्वपूर्ण करार होऊ शकतो. हे नवीन व्हर्जन पूर्वीपेक्षा अधिक घातक असेल.

लढाऊ विमाने आणि संरक्षण प्रणाली

SU-57 लढाऊ विमान, तसेच S-400 आणि S-500 एअर डिफेन्स सिस्टीमवरही करार होण्याची शक्यता आहे.  दोन्ही नेत्यांमध्ये रशियाकडून तेल खरेदी करण्याच्या मुद्द्यावरही चर्चा होण्याची शक्यता आहे.

विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात पुरंदर विमानतळाचा मुद्दा गाजणार; भूसंपादन अधिकाऱ्यांवर तारांकित प्रश्न

Alice Huang : चीनचा मोठा 'AI' डाव उघड! कथित गुप्तहेर ॲलिस हुआंगच्या नेटवर्कला तब्बल 2491 कोटींचा निधी; अमेरिकेची मोठी कारवाई

Tata Group : Noel Tata विरुद्ध N Chandrasekaran वाद कोर्टात! बॉम्बे हायकोर्टात कायदेशीर लढाईची तयारी; काय निर्णय होणार?

Amravati News: ६९ गावांत १०% पाणीकपात! १ डिसेंबरपासून अंमलबाजावणी; उन्हाळ्यापूर्वीच उद्भवणार जलसंकट

Harshad Atkari: ५० ATKT अन् गावभर नापासाचे होर्डिंग्ज! हर्षद अतकरीने सांगितला भूमिकेमागचा भन्नाट किस्सा!