भारतीय लष्कराची ताकद आणखी वाढणार; भारत शत्रूचे ड्रोन हवेतच नष्ट करणार भारतीय लष्कराची ताकद आणखी वाढणार; भारत शत्रूचे ड्रोन हवेतच नष्ट करणार
India

भारतीय लष्कराची ताकद आणखी वाढणार; भारत शत्रूचे ड्रोन हवेतच नष्ट करणार

'ज्वाला एमके-१' मध्ये ड्युअल-पल्स सॉलिड रॉकेट मोटर आणि एअरोडायनॅमिक फिन कंट्रोल तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे क्षेपणास्त्राला उड्डाणादरम्यान दिशा बदलण्याची क्षमता मिळते.

Krupadan Awale

नवी दिल्ली : आत्मनिर्भर भारत अभियानाला चालना देत स्वदेशी संरक्षण क्षेत्रातील कंपनी 'आयजी डिफेन्स'ने राजस्थानमधील पोखरण फायरिंग रेंजवर 'ज्वाला एमके-१' या क्षेपणास्त्र प्रणालीची यशस्वी चाचणी केली आहे. कंपनीच्या दाव्यानुसार, ही भारतातील पहिली स्वायत्त काउंटर-अनमॅन्ड एअरक्राफ्ट सिस्टीम मायक्रो-मिसाइल प्रणाली आहे.

देशात पुढील पिढीतील स्वदेशी काउंटर-ड्रोन तंत्रज्ञान विकसित करण्याच्या दृष्टीने ही महत्त्वाची कामगिरी मानली जात आहे. या प्रणालीची कार्यकारी क्षमता पाच किलोमीटरपर्यंत असल्याचे कंपनीने सांगितले आहे. शत्रूच्या मानवरहित हवाई प्रणाली अर्थात ड्रोनमुळे निर्माण होणाऱ्या वाढत्या धोक्यांचा सामना करण्यासाठी ही स्वदेशी, स्वायत्त आणि तुलनेने किफायतशीर प्रणाली विकसित करण्यात आली आहे.

उड्डाणादरम्यान दिशा बदलण्याची क्षमता

कंपनीच्या माहितीनुसार, 'ज्वाला एमके-१' मध्ये ड्युअल-पल्स सॉलिड रॉकेट मोटर आणि एअरोडायनॅमिक फिन कंट्रोल तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे क्षेपणास्त्राला उड्डाणादरम्यान दिशा बदलण्याची क्षमता मिळते. या प्रणालीमध्ये प्री-फॅगमेटेड हाय-एक्सप्लोसिव्ह वॉरहेड आणि प्रॉक्सिमिटी फ्यूजचा समावेश आहे. त्यामुळे लक्ष्यावर थेट धडक देण्याची आवश्यकता नसते. लक्ष्याच्या जवळ पोहोचल्यानंतरही स्फोट घडवून ड्रोनला निष्प्रभ करता येते. असे कंपनीने स्पष्ट केले आहे.

स्वस्त ड्रोनविरुद्ध महागड्या संरक्षणाचे आव्हान

अलीकडील आंतरराष्ट्रीय संघषर्षांमध्ये कमी खर्चातील हल्लेखोर ड्रोनचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असल्याचे दिसून आले आहे. मात्र, अशा तुलनेने स्वस्त ड्रोनचा मुकाबला करण्यासाठी अनेकदा महागड्‌या पारंपरिक हवाई संरक्षण प्रणालींचा वापर करावा लागतो. त्यामुळे संरक्षण यंत्रणांवर आर्थिक दबाव वाढतो. महागड्या इंटरसेप्टर क्षेपणास्त्रांचा साठा, दारूगोळ्याची उपलब्धता आणि संरक्षणावरील खर्च ही आव्हाने अधिक गंभीर बनत आहेत.

सीमावर्ती सुरक्षेसाठी स्वदेशी तंत्रज्ञानाचे महत्त्व

स्वदेशी काउंटर-ड्रोन तंत्रज्ञान विकासाला चालना सीमावर्ती भागामध्ये होणाऱ्या संभाव्य घुसखोरी आणि हवाई धोक्यांच्या पार्श्वभूमीवर काउंटर-यूएएस तंत्रज्ञानाचे महत्त्व वाढले आहे. अशा परिस्थितीत स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित अशा संरक्षण प्रणालींची गरज निर्माण झाली आहे. 'ज्वाला एमके-१'च्या चाचणीमुळे भारताच्या मिळण्याची अपेक्षा आहे.

काउंटर ड्रोन प्रणाली विकसित करणे महत्त्वाचे

भारताच्या भौगोलिक आणि सुरक्षाविषयक परिस्थितीचा विचार करता स्वदेशी, किफायतशीर आणि आवश्यकतेनुसार विस्तार करता येतील अशा काउंटर ड्रोन प्रणाली विकसित करणे महत्त्वाचे ठरत आहे.

प्रमुख वैशिष्ट्ये काय?

- भारतातील पहिली स्वयंचलित सीयूएएस मायक्रो-मिसाइल प्रणाली

- पाच किलोमीटरपर्यंत लक्ष्य भेदण्याची क्षमता

- शत्रूचे ड्रोन ओळखून त्यांना हवेतच निष्प्रभ करण्याची क्षमता

- उड्डाणादरम्यान दिशा बदलण्याची सुविधा

- स्वदेशी आणि तुलनेने किफायतशीर संरक्षण प्रणाली

Mumbai News: भारतावर अतिवृष्टी, पूर आणि दुष्काळाचे संकट! महाराष्ट्रात दुष्काळ परिस्थितीची चिन्हे

मिनी महाबळेश्वर गारठलं! तापमान थेट एकेरी अंकात; पर्यटकांचा ओढा वाढला

Kolhapur Drink and Drive: कोल्हापुरात मद्यधुंद कारचालकाने दोघा भावांना चिरडले; गोकुळच्या माजी अध्यक्षांच्या मुलाला अटक

जुन्या कॅसेटला मिळाली नवी ओळख! 44 वर्षांपूर्वी फ्लॉप झालेलं गाणं GTA 6 मुळे पुन्हा ट्रेंडमध्ये

Bajra Soup: थंडीच्या दिवसांमध्ये सकाळच्या नाश्त्यात करा बाजरीच्या सूपचा समावेश, पित्ताच्या त्रासापासून मिळेल सुटका