स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंती साजरी केली जात आहे (फोटो - टीम नवराष्ट्र)  
ताज्या बातम्या

Dinvishesh : स्वातंत्र्यवीर विनायक सावरकर यांची जयंती; जाणून घ्या 28 मे चा इतिहास

आज स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती आहे. नाशिकमध्ये जन्म घेतलेल्या सावरकर यांनी हिंदू राष्ट्र आणि स्वातंत्र्याची चळवळ फक्त देशभरात नाही तर परदेशातून चालवली.

प्रीति माने

भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये क्रांतीकारी विचारसरणीचा महत्त्वपूर्ण वाटा आहे. त्यातील एक व्यक्तीमत्त्व म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर. हिंदू राष्ट्रवादाची राजकीय विचारसरणी, 'हिंदुत्व' विकसित करण्याचे मोठे श्रेय सावरकरांना जाते. विनायक दामोदर सावरकर यांनी काळ्या पाण्याची शिक्षा भोगून स्वातंत्र्यासाठी लढा दिला. स्वातंत्र्यवीर सावरकर यांची आज जयंती असून

28 मे रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना

  • 1490 : जुन्नरचा बहामनी सेनापती मलिक अहमद याने उर्वरित बहामनी सैन्याचा पराभव केला आणि जुन्नरमध्ये स्वतंत्र सल्तनत घोषित केली.
  • 1907 : पहिली आयल ऑफ मॅन टीटी शर्यत आयोजित केली गेली.
  • 1918 : अझरबैजानने स्वतःला स्वतंत्र घोषित केले.
  • 1937 : नेव्हिल चेंबरलेन इंग्लंडचे पंतप्रधान झाले.
  • 1937 : फोक्सवॅगन जर्मन ऑटोमोबाईल उत्पादन कंपनीची स्थापना.
  • 1940 : दुसरे महायुद्ध – बेल्जियमने जर्मनीला शरणागती पत्करली.
  • 1952 : ग्रीसमध्ये महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला.
  • 1958 : स्वातंत्र्यसैनिक सावरकर यांचा 75 व्या वाढदिवसानिमित्त मुंबई महापालिकेतर्फे सत्कार करण्यात आला.
  • 1964 : पॅलेस्टाईन लिबरेशन ऑर्गनायझेशन ची स्थापना झाली.
  • 1998 : पाकिस्तानने बलुचिस्तानच्या चगई भागात पाच यशस्वी अणुचाचण्या केल्या.
  • 1999 : लिओनार्डो दा विंचीचा द लास्ट सपर इटलीमध्ये चित्र प्रदर्शनासाठी ठेवण्यात आले
  • 2008 : नेपाळमध्ये राजेशाहीची प्राचीन परंपरा संपुष्टात आली.

28 मे जन्म दिनविशेष

  • 1660 : ‘जॉर्ज (पहिला)’ – इंग्लंडचा राजा यांचा जन्म. (मृत्यू: 11 जून 1727)
  • 1759 : ‘छोटा विल्यम पिट’ – युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान.
  • 1883 : ‘विनायक दामोदर सावरकर’ – स्वातंत्र्यवीर क्रांतिकारक यांचा जन्म. (मृत्यू: 26 फेब्रुवारी 1966)
  • 1903 : ‘शंतनुराव किर्लोस्कर’ – उद्योगपती, किर्लोस्कर उद्योगसमूहाचे आधारस्तंभ यांचा जन्म. (मृत्यू: 24 एप्रिल 1994)
  • 1907 : ‘दिगंबर विनायक’ तथा ‘नानासाहेब पुरोहित’ – स्वातंत्र्यसेनानी रायगड मिलिटरी स्कूलचे संस्थापक यांचा जन्म. (मृत्यू: 27 नोव्हेंबर 1994)
  • 1908 : ‘इयान फ्लेमिंग’ – दुसर्‍या महायुध्दातील गुप्तहेर, लेखक, पत्रकार आणि जेम्स बाँड चा जनक यांचा जन्म. (मृत्यू: 12 ऑगस्ट 1964)
  • 1921 : ‘पं. दत्तात्रय विष्णू’ ऊर्फ ‘बापूराव पलुसकर’ – शास्त्रीय गायक यांचा जन्म. (मृत्यू: 25 ऑक्टोबर 1955)
  • 1923 : ‘एन. टी. रामाराव’ – तेलगू अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते व आंध्रप्रदेशचे 10 वे मुख्यमंत्री यांचा जन्म. (मृत्यू: 18 जानेवारी 1996)
  • 1946 : ‘के. सच्चिदानंदन’ – भारतीय कवी आणि समीक्षक यांचा जन्म.

28 मे मृत्यू दिनविशेष

  • 1787 : ‘लिओपोल्ड मोत्झार्ट’ – ऑस्ट्रियन संगीतकार व व्हायोलिनवादक यांचे निधन. (जन्म: 14 नोव्हेंबर 1719)
  • 1961 : ‘परशुराम कृष्णा गोडे’ – प्राच्यविद्या संशोधक यांचे निधन. (जन्म: 11 जुलै 1891)
  • 1982 : ‘बळवंत दामोदर’ ऊर्फ ‘कित्तेवाले निजामपूरकर’ – यांचे निधन.
  • 1994 : ‘गणपतराव नलावडे’ – हिंदूसभेचे नेते व पुण्याचे महापौर यांचे निधन.
  • 1999 : ‘बी. विट्टालाचारी’ – भारतीय दिग्दर्शक आणि निर्माते यांचे निधन. (जन्म: 18 जानेवारी 1920)

Mumbai News: भारतावर अतिवृष्टी, पूर आणि दुष्काळाचे संकट! महाराष्ट्रात दुष्काळ परिस्थितीची चिन्हे

मिनी महाबळेश्वर गारठलं! तापमान थेट एकेरी अंकात; पर्यटकांचा ओढा वाढला

Kolhapur Drink and Drive: कोल्हापुरात मद्यधुंद कारचालकाने दोघा भावांना चिरडले; गोकुळच्या माजी अध्यक्षांच्या मुलाला अटक

जुन्या कॅसेटला मिळाली नवी ओळख! 44 वर्षांपूर्वी फ्लॉप झालेलं गाणं GTA 6 मुळे पुन्हा ट्रेंडमध्ये

Bajra Soup: थंडीच्या दिवसांमध्ये सकाळच्या नाश्त्यात करा बाजरीच्या सूपचा समावेश, पित्ताच्या त्रासापासून मिळेल सुटका