श्रावण महिण्यात अनेकजण उपवास करतात. या काळात उपवासाला खाता येईल असे अनेक पदार्थ आहेत. यामध्ये साबुदाणा आणि बटाटा मोठ्या प्रमाणात खाल्ला जातो. मात्र नेहमी साबुदाण्याची खिचडी आणि बटाट्याचा शिरा किंवा इतर कुठलाही पदार्थ खाऊन तुम्ही कंटाळले असाल तर, यावेळी तुम्ही उपवासाचा एक नवीन पदार्थ ट्राय करा, आज आम्ही तुम्हाला उपवासाला खाता येईल अशी बटाट्याची शेव (Potao Sev) कशी बनवायची हे सांगणार आहोत.