Travel(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)  
लाइफ स्टाइल

Travel: मुंबईतील ५ अनोखी पर्यटनस्थळे, शहरातच घ्या निसर्गचा आणि इतिहासाचा आनंद!

Travel: मुंबईतील गजबजाटापासून दूर निसर्गाचा आनंद घ्यायचा असेल आणि शहराचा ऐतिहासिक वारसा जाणून घ्यायचा असेल, तर छोटा काश्मीर, भाऊ दाजी लाड संग्रहालय, महाराष्ट्र निसर्ग उद्यान, मढ आयलंड आणि बाणगंगा तलाव या पाच अनोख्या पर्यटनस्थळांना नक्की भेट द्या.

siddhi berde
  • छोटा काश्मीर आणि महाराष्ट्र निसर्ग उद्यान येथे हिरवळ, शांत वातावरण आणि निसर्गसौंदर्याचा आनंद घेता येतो.

  • भाऊ दाजी लाड संग्रहालय आणि बाणगंगा तलाव येथे मुंबईचा ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि धार्मिक वारसा अनुभवता येतो.

  • मढ आयलंडवरील समुद्रकिनारे आणि निसर्गरम्य परिसरामुळे कुटुंबीयांसोबत किंवा मित्रमंडळींसह निवांत वेळ घालवता येतो.

मुंबई म्हटले की सर्वप्रथम गजबजलेले रस्ते, उंच इमारती, समुद्रकिनारे आणि चित्रपटसृष्टी डोळ्यांसमोर येते.त्याचबरोबर मुंबईत ही अशी काही पर्यटन स्थळे आहे जी आपण पाहताच आपण त्यांच्या प्रेमात पडू आणि मुंबईची वेगळी बाजू दिसेल, जिथे निसर्गाचा आनंद घेण्यासोबतच इतिहास आणि संस्कृतीची ओळख करून घेता येते. ज्यांना दरवेळी मोठी सुट्टी टाकून लांब फिरायला जाणे शक्य नसते त्यांनी मुंबईतील या पाच ठिकाणानां नक्कीच भेट द्या विशेष म्हणजे, या ठिकाणांना भेट देण्यासाठी मुंबईबाहेर जाण्याचीही गरज नाही. चला तर जाणून घेऊया मुंबईतील पाच अनोख्या पर्यटनस्थळांविषयी.

१. छोटा काश्मीर, आरे कॉलनी

मुंबईतील आरे कॉलनी परिसरात असलेले छोटा काश्मीर हे निसर्गप्रेमींसाठी आकर्षणाचे ठिकाण आहे. हिरवीगार झाडे, सुंदर उद्यान आणि शांत वातावरण यामुळे शहरातील गोंगाटापासून काही वेळ दूर राहता येते. येथील तलाव आणि त्याच्या सभोवतालचा निसर्गरम्य परिसर पर्यटकांना आकर्षित करतो. कुटुंबीयांसोबत फिरणे, फोटोग्राफी करणे आणि निवांत वेळ घालवण्यासाठी हे ठिकाण उत्तम आहे. शहराच्या मध्यवर्ती भागातील धावपळीपासून दूर निसर्गाचा अनुभव घेण्यासाठी येथे भेट देता येते.

२. भाऊ दाजी लाड संग्रहालय, भायखळा

मुंबई वेगवेगळ्या प्रकारची संग्रहालय आहेत त्यापैकी भाऊ दाजी लाड संग्रहालय हे एकदा तरी भेट द्यावं आसा आहे. इतिहास आणि कलाप्रेमींसाठी भायखळा येथील भाऊ दाजी लाड संग्रहालय विशेष महत्त्वाचे आहे. १८५५ मध्ये स्थापन झालेले हे मुंबईतील सर्वात जुने संग्रहालय आहे. येथे मुंबईच्या इतिहासाशी संबंधित जुने नकाशे, छायाचित्रे, शिल्पे, मातीच्या वस्तू आणि विविध कलात्मक नमुने पाहायला मिळतात. संग्रहालयाची व्हिक्टोरियन शैलीतील वास्तुरचना पाहण्यासारखी आहे. जुन्या मुंबईची जीवनशैली, कला, संस्कृती आणि ऐतिहासिक वारसा जाणून घेण्यासाठी या संग्रहालयाला आवर्जून भेट द्यावी. भेट दिल्यानंतर आपण इतिहासाठतून फिरून आल्याची भावना निर्माण होते.

३. माहीम नेचर पार्क

निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवायचा असेल तर माहीम येथील महाराष्ट्र निसर्ग उद्यान हा उत्तम पर्याय आहे. विशेष म्हणजे, पूर्वी कचरा टाकण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या जागेचे रूपांतर सुंदर हिरव्यागार उद्यानात करण्यात आले आहे. येथे विविध प्रकारची झाडे, औषधी वनस्पती, फुलपाखरे आणि पक्ष्यांच्या अनेक प्रजाती पाहायला मिळतात. पर्यावरण संवर्धन, वृक्षप्रेम आणि पक्षीनिरीक्षणाची आवड असणाऱ्यांसाठी हे ठिकाण खास आहे. लहान मुलांना निसर्ग आणि पर्यावरणाची ओळख करून देण्यासाठीही येथे भेट देता येते.

४. मढ आयलंड

मुंबईच्या पश्चिम किनारपट्टीवर असलेले मढ आयलंड हे शांत समुद्रकिनारे आणि निसर्गरम्य परिसरासाठी प्रसिद्ध आहे. येथे अक्सा बीच, एरंगल बीच आणि स्थानिक कोळीवाडे पाहायला मिळतात. नारळाची झाडे, समुद्राच्या लाटा आणि मोकळे वातावरण यामुळे येथे मन प्रसन्न होते. याशिवाय मढ किल्ल्यासारख्या ऐतिहासिक वास्तूंमुळे या परिसराला वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. मित्रमंडळी किंवा कुटुंबीयांसोबत निवांत वेळ घालवण्यासाठी हे ठिकाण उत्तम आहे.

५. बाणगंगा तलाव, मलबार हिल

मुंबईच्या ऐतिहासिक आणि धार्मिक वारशाची ओळख करून देणारे बाणगंगा तलाव हे एक अनोखे पर्यटनस्थळ आहे. मलबार हिल परिसरात असलेल्या या तलावाभोवती प्राचीन मंदिरे, दगडी पायऱ्या आणि पारंपरिक वास्तू पाहायला मिळतात. या तलावाला धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे. तलावाच्या शांत परिसरात जुन्या मुंबईच्या संस्कृतीचा अनुभव घेता येतो. येथे साजरे होणारे विविध धार्मिक उत्सव आणि पारंपरिक सोहळे पर्यटकांचे लक्ष वेधून घेतात. इतिहास, अध्यात्म आणि स्थापत्यकलेची आवड असणाऱ्यांनी या ठिकाणाला नक्की भेट द्यावी.

मुंबईतील ही पाच ठिकाणे शहराच्या वेगळ्या बाजूची ओळख करून देतात. त्यामुळे नेहमीच्या पर्यटनस्थळांपेक्षा काहीतरी वेगळे अनुभवायचे असेल तर या ठिकाणांना भेट देण्याचा पर्याय नक्की निवडा.

Pramod Mittal : जगातील सर्वात श्रीमंत कुटुंबाला लागली उतरती कळा; प्रमोद मित्तल यांच्या लंडन मेफेअरमधील 'त्या' 357 कोटींच्या बंगल्याचा वाद काय?

Mira Bhayandar Water Supply : पाणीटंचाईतून सुटकेची चाहूल! मीरा-भाईंदरकरांना दिलासा! जानेवारीत 'सूर्या'चे 50 ते 60 दशलक्ष लिटर पाणी मिळणार

मूळव्याध समजून शरीरात दिसून येणाऱ्या लक्षणांकडे दुर्लक्ष करत आहात? उद्भवू शकतो मोठ्या आतड्यांच्या कॅन्सरचा धोका

Instagram For TV : आता स्मार्ट टीव्हीवरही वापरता येणार इन्स्टाग्राम; एकाच वेळी 5 अकाऊंट्स येतील जोडता

Rishabh Pant: केवळ २३ धावा अन् ऋषभ पंतचा मोठा कारनामा! बेन स्टोक्सचा रेकॉर्ड मोडला