Benefits Of Amla Powder: केसांपासून त्वचेपर्यंत आरोग्यासाठी गुणकारी ठरेल आवळ्याची पावडर! जाणून घ्या खाण्याची योग्य पद्धत 
लाइफ स्टाइल

Benefits Of Amla Powder: केसांपासून त्वचेपर्यंत आरोग्यासाठी गुणकारी ठरेल आवळ्याची पावडर! जाणून घ्या खाण्याची योग्य पद्धत

Benefits Of Amla Powder: आवळ्याचे सेवन केल्यामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात. आवळ्यामध्ये विटामिन सी आणि इतर आवश्यक पोषक घटक असतात, ज्यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडून जातात आणि पोटावर वाढलेला चरबीचा घेर कमी होण्यास मदत होते.

सुरुची कदम

Benefits Of Amla Powder: धावपळीच्या जीवनशैलीमुळे शरीराची काळजी घेण्यासाठी जास्तीचा वेळ मिळत नाही. खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये सतत होणारे बदल, पोषक घटकांची कमतरता, झोपेच्या वेळांमध्ये सतत होणारे बदल इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम शरीरावर दिसू लागल्यानंतर आजारपणात वाढ होते. त्यामुळे आरोग्याची योग्य पद्धतीने काळजी घेणे फार आवश्यक आहे. शरीराची कमकुवत झालेली रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी आवळ्याचे सेवन करणे फार आवश्यक आहे. आवळा आरोग्यासाठी फायदेशीर मानला जातो. पण कामाच्या धावपळीमध्ये आवळ्यापासून वेगवेगळे पदार्थ करणे किंवा रस तयार करण्यासाठी जास्त वेळ मिळत नाही. अशावेळी बाजारात सहज उपलब्ध असलेल्या आवळ्याच्या पावडरचा वापर करावा. (फोटो सौजन्य – istock)

आवळा वाळवून कडक सुकवल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात घालून जाडसर वाटून पावडर तयार करा. तयार केलेली पावडर हवा बंद डब्यात भरून ठेवा. आवळ्यामध्ये विटामिन सी आणि इतर आवश्यक पोषक घटक सुद्धा असतात. त्यामुळे नियमित एक चमचा पावडर पाण्यात मिक्स करून प्यावी. पण आवळा वाळवताना आणि पावडर तयार करताना त्यातील आवश्यक पोषक घटक नष्ट होण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे आवळ्याची पावडर बनवताना योग्य ती काळजी घ्यावी. चला तर जाणून घेऊया आवळा पावडरचे सेवन केल्यास शरीराला होणारे फायदे.

आवळा पावडर खाण्याचे फायदे:

आवळा पावडर कोमट पाण्यासोबत घेणे फायदेशीर ठरते. सकाळी उपाशी पोटी एक ग्लास कोमट पाण्यात चमचाभर आवळा पावडर मिक्स करून प्यायल्यास आरोग्य सुधारण्यास मदत होईल. आवळ्याची चव तुरट आणि आंबट असल्यामुळे सुरूवातीच्या वेळी अर्धा चमची एवढ्या प्रमाणात आवळा पावडरचे सेवन करावे. यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडून जातात आणि पोटावर वाढलेला चरबीचा घेर कमी करण्यास मदत होते. पण पोट संवेदनशील असल्यामुळे आम्लपित्त, मळमळ किंवा जुलाब होण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे कोणतेही उपाय करण्याएआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणे फार आवश्यक आहे.

केसांसाठी प्रभावी:

केसांच्या निगेसाठी वाढीसाठी आवळा पावडर अतिशय प्रभावी ठरते. आवळा पावडर पाण्यात मिक्स करून केसांच्या मुळांपासून ते अगदी टोकांपर्यंत लावल्यास  केसांची वाढ, केसगळती कमी, अकाली केस पांढरे होण्याच्या समस्येपासून आराम मिळतो. पण आवळा पावडर लावल्यानंतर केसांमध्ये टाळूला खाज, जखमा किंवा जळजळ होत असल्यास आवळा पावडरचा वापर करू नये.

आवळा, शिकेकाई आणि रिठा यांसारख्या पारंपरिक वनस्पतीजन्य घटकांचा वापर केसांच्या स्वच्छतेसाठी केला जातो. केस धुण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मिश्रणात किंवा शाम्पूमध्ये सुद्धा आवळा पावडर मिक्स करून लावावी. पारंपरिक वनस्पतीजन्य घटकांचा वापर केसांच्या स्वच्छतेसाठी केल्यास केसांची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यास मदत होईल .

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Wardha News: वर्ध्यात पीककर्ज वाटपाला ब्रेक! ११ हजार शेतकऱ्यांनाच रब्बी पीककर्ज, उर्वरित शेतकऱ्यांचे काय?

Dalimb: जितेंद्र कुमार-प्रिया बापटचा सायकोलॉजिकल थ्रिलर ‘डाळिंब’, ४ डिसेंबरला हिंदी ZEE5 वर प्रदर्शित होणार!

Supreme Court on Rahul Gandhi: सर्वोच्च न्यायालयाकडून राहुल गांधींना मोठा दिलासा! 'त्या' प्रकरणातील चौकशीचे आदेश रद्द

Sanch Manyata Update: शिक्षकांच्या वेतनावर परिणाम होण्याची शक्यता? संच मान्यतेचा डेटा अंतिम करण्यासाठी 'ही' डेडलाईन

Vaibhav Suryavanshi: 'दबदबा है और...'; वैभवने यूएईची पिसं काढली, सोशल मिडियावर Memes चा पाऊस