लाइफ स्टाइल

मिठाई खरेदी करत आहात? 'ही' काळजी नक्की घ्या

Rashmi Dongre

सध्या सणासुदीचे दिवस असून गणेशोत्सवास बुधवारपासून सुरूवात होत आहे. त्यामुळे भाविकांनी मिठाई, खाद्य पदार्थ खरेदी करताना काळजी घ्यावी. तसेच गणेशोत्सवानिमित्त विविध मंडळातर्फे भंडारा, प्रसाद, अन्नदान इत्यादी कार्यक्रम ठेवण्यात येतात. त्याचबरोबर घरोघरी गणेश मुर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे. त्यामुळे प्रसाद म्हणून खरेदी करत असताना मिठाई, खाद्यपदार्थांची काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

ग्राहकांनी स्वीट मार्टमधून मिठाई घेताना त्या मिठाईच्या बाजूला बेस्ट बिफोरचा बोर्ड आहे किंवा नाही याची खात्री करणे आवश्यक आहे. हा बोर्ड पाहिल्याशिवाय वेगवेगळे गोड पदार्थ खरेदी करू नयेत मिठाई कधी बनवली आहे, याचा अंदाज येत नसेल तर खरेदी न करणे योग्य होईल.

ग्राहकांसाठी काही खास सूचना

  • मिठाई, दूध व दुग्धजन्य पदार्थ खरेदी करताना नोंदणीधारक अथवा परवानाधारक अस्थापनांकडून खरेदी करावी.
  • वापर योग्य तारखेची नोंद पाहूनच खरेदी करावी.
  • मिठाईवर बुरशी आढळल्यास त्याचे सेवन करू नये.
  • अनेक दुकानदार मिठाईची विक्री झाली नाही तर ती तशीच काचेच्या रॅकमध्ये ठेवतात. शिळी मिठाई खाण्यात गेल्यास विषबाधेचा त्रास होऊ शकतो.

Delhi Jama Masjid : दिल्लीतील जामा मशिद पोलीस ठाण्यात पाच पोलिसांवर चाकूने हल्ला; आरोपीच्या पायावर गोळी झाडत केली अटक

Gold Imports Drop : PM Modi यांच्या आवाहनाचा मोठा परिणाम? सोन्याच्या आयातीत तब्बल 40 % घट; 7 महिन्यांत 1.53 लाख कोटींची बचत

Maharashtra Recruitment Exam: पेपरफुटी करणाऱ्यांना १० कोटींचा दंड, १० वर्षे कारावास; भरती परीक्षांसाठी सरकारचा कठोर ॲक्शन प्लॅन

Leopard Attack in Assam:बिबट्याचा थरारक हल्ला कॅमेऱ्यात कैद; वनविभागाच्या बचावकार्यात मोठी दुर्घटना

IND A vs UAE : गोलंदाजांना सुर गवसेना, युएईचं भारताला 250 धावांचं आव्हान