लाइफ स्टाइल

उन्हाळ्यात पुरूषांनी असं जपा त्वचेचं सौंदर्य; 'हा' सोपा उपाय ठरेल खूपच गुणकारी

न्हाळ्यात महिलांसोबत पुरुषांनाही त्वचेची विशेष  काळजी घेण्याची गरज असते. ज्यामध्ये पहिले काम असते त्वचा स्वच्छ ठेवणे. खरं तर, चेहरा घाण आणि ऑयल फ्री ठेवणे विशेषतः उन्हाळ्यात पुरुषांसाठी खूप कठीण काम आहे. पण, बर्फाच्या पाण्याने चेहरा धुतल्याने तुमच्यासाठी हे काम सोपे  होऊ शकते.

Aparna Kad

सध्या प्रचंड कडक उन्हाळा सुरू आहे. उष्म्याचा आरोग्यासह त्वचेवरही खूप परिणाम होतो. उन्हाळ्यात ऊन, धूळ आणि प्रदूषणाचा परिणाम सर्वांच्या त्वचेवर होत असतो. उन्हाळ्यात महिलांसोबत पुरुषांनाही त्वचेची विशेष  काळजी घेण्याची गरज असते. ज्यामध्ये पहिले काम असते त्वचा स्वच्छ ठेवणे. खरं तर, चेहरा घाण आणि ऑयल फ्री ठेवणे विशेषतः उन्हाळ्यात पुरुषांसाठी खूप कठीण काम आहे. पण, बर्फाच्या पाण्याने चेहरा धुतल्याने तुमच्यासाठी हे काम सोपे  होऊ शकते.

बर्फाच्या पाण्याने किंवा थंड पाण्याने चेहरा धुतल्याने त्वचेची पीएच पातळी कायम राहते. बर्फाच्या पाण्याने चेहरा धुणे देखील विशेषतः पुरुषांसाठी खूप फायदेशीर आहे. बर्फाच्या पाण्याने चेहरा धुण्याचे विशेष फायदे जाणून घेऊया.

  • छिद्रे आकुंचन पावतील -

उन्हाळ्यात चेहऱ्यावरील अतिरिक्त तेलामुळे त्वचेवरील बारीक छिद्रे उघडू लागतात. अशा स्थितीत बर्फाच्या पाण्याने चेहरा धुतल्याने चेहऱ्यावरील तेलकटपणा तर कमी होतोच, शिवाय जास्त उघडली गेलेली छिद्रेही आकुंचन पावू लागतात.

  • सूज आणि जळजळ कमी होईल -

तुमच्या चेहऱ्यावर सूज येत असेल तर बर्फाच्या पाण्याने चेहरा धुतल्याने त्वचेतील रक्ताभिसरण सुधारते. असे केल्याने सूजही कमी होऊ लागते. त्याचबरोबर बर्फाच्या पाण्याने चेहरा धुतल्याने टॅनिंग आणि सनबर्नपासूनही आराम मिळतो.

  • ओलावा कायम राहील -

उन्हाळ्यात ऊन आणि धुळीमुळे त्वचा कोरडी पडते. थंड पाणी त्वचेचे ट्रांसएपिडर्मल लॉस रोखण्यासाठी उपयुक्त आहे. उन्हाळ्यात बर्फाच्या पाण्याने चेहरा धुतल्यानंतर त्वचेची आर्द्रता टिकून राहते.

  • सीबममध्ये वाढ -

उन्हाळ्यात चेहऱ्यावर मुरुमे आणि पिंपल्स येण्याची समस्या वाढते. ज्याचे मुख्य कारण म्हणजे उष्णतेमुळे चेहऱ्यावर सेबम कमी पडतं. अशा परिस्थितीत, बर्फाचे पाणी चेहऱ्यावरील सेबमचे प्रमाण वाढवून पिंपल्स आणि मुरुमे कमी करण्यास मदत करते.

  • सुरकुत्या निघून जातील -

चेहऱ्यावर सुरकुत्या येणं हे वृद्धत्वाचे लक्षण आहे. पण उन्हाळ्यात अनेकदा सुरकुत्या वाढू लागतात. कोमट/गरम पाण्याने चेहरा धुतल्याने सुरकुत्या वाढू लागतात. त्यामुळे सुरकुत्या कमी करण्यासाठी बर्फाच्या पाण्याने चेहरा धुणे हा उत्तम पर्याय आहे.

Sharad Pawar Retirement : पवारांच्या निवृत्तीच्या बातमीवर सुप्रिया सुळे भडकल्या, राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना सुरुवात

Sharad Pawar Retirement: 12 डिसेंबरला शरद पवार निवृत्त होणार? फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया अन् चर्चेला उधाण

NCP Merger : राष्ट्रवादीचे आठही खासदार पक्ष सोडणार? शशिकांत शिंदेंनी चर्चेचं सत्य सांगितलं

Manoj Jarange Patil : कुणबी प्रमाणपत्र मिळत नाहीये? मनोज जरांगे थेट तुमच्या जिल्ह्यात येणार! लवकरच महाराष्ट्र दौऱ्याची घोषणा

Sachin Sawant : 'मुस्लिम गुन्हेगार टाइम बॉम्ब, इतर धर्माचे फुलबाजा का?' कुर्ला मारहाण प्रकरणावरून सचिन सावंतांचा भाजपला थेट सवाल!