बडीशेप खाण्याचे फायदे?
किती प्रमाणात बडीशेप खावी?
बडीशेप खाण्याचे तोटे?
Fennel Seeds: रात्रीच्या जेवणानंतर सगळ्यांचं बडीशेप किंवा मुखवास खाण्याची सवय असते. तर काही घरांमध्ये माऊथ फ्रेशनर म्हणून बडीशेप खाल्ली जाते. बडीशेप खाल्ल्यामुळे तोंडाला दुर्गंधीचा वास येत नाही आणि खाल्लेले अन्नपदार्थ पचन होण्यास मदत होते. बडीशेपचा वास आणि चव सगळ्यांचं खूप जास्त आवडतो. यामध्ये फायटोएस्ट्रोजेन्स आणि इतर आवश्यक पोषक घटक असतात. त्यामुळे अतिप्रमाणात बडीशेप खाल्ल्यास हार्मोनल असंतुलनाच्या समस्या उद्भवून आरोग्य बिघडू शकते. चला तर जाणून घेऊया बडीशेप खाल्ल्यामुळे शरीराला नेमके काय फायदे होतात आणि दिवसभरात किती वेळा बडीशेप खावी, याबद्दल सविस्तर माहिती.
जेवल्यानंतर बडीशेप खाल्ल्यास शरीराला होणारे फायदे:
जेवल्यानंतर खाल्लेले अन्नपदार्थ व्यवस्थित पचन करण्यासाठी बडीशेप खाल्ली जाते. बडीशेप खाल्ल्यामुळे पचन व्यवस्थित होते आणि मांसपेक्षा आराम मिळतो. जेवणानंतर पोट फुगणे, पोटात गॅस किंवा अपचन झाल्यास बडीशेप खाल्ल्यास अपचनाच्या समस्या कमी होतील. पण तुम्हाला वारंवार अपचनाचा त्रास होत असेल तर बडीशेपवर अवलंबून न राहता डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध उपचार करणे फार आवश्यक आहे. अन्यथा गंभीर आजारांचा धोका वाढू शकतो.
बडीशेप खाल्ल्यानंतर तोंडात ताजेपणा जाणवतो आणि तोंडाच्या दुर्गंधीपासून सुटका मिळते. बडीशेप खाल्ल्यानंतर तिचा वास बराच वेळ तोंडात तसाच टिकून राहतो. बडीशेप चावून खाणे हा एक प्रकारचा ब्रश करण्याचा किंवा फ्लॉसिंगसाठीचा पर्याय नाही. त्यामुळे दातांच्या आरोग्याची काळजी घेणे फार आवश्यक आहे. तोंडाच्या स्वच्छतेसाठी नियमित ब्रश करणे, गुळण्या करणे फायदेशीर ठरते. दोन वेळा दात घासूनही श्वासांमधून दुर्गंध येत असेल तर दातांच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
दुपारी किंवा जेवणानंतर थोड्याच प्रमाणात बडीशेप खावी. सतत बडीशेप खाऊ नये. यामुळे हार्मोन्ससंबंधित समस्या वाढू शकतात. याशिवाय तोंडात वर्ण येणे किंवा जिभेच्या साली निघून जातात. बडीशेप खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये. त्यामुळे बडीशेपचे कण घशात अडकण्याची जास्त शक्यता असते. बडीशेपेची एलर्जी असल्यास भाजलेले तीळ किंवा ओवा खावा. यामध्ये तुम्ही बडीशेप मिक्स करून खाऊ शकता.