Face Pack: हिवाळ्यात त्वचेवर पांढरा थर तयार झाला आहे? मग 'या' फेसपॅकने काळवंडलेली त्वचा होईल चमकदार आणि स्मूथ  
लाइफ स्टाइल

Face Pack: हिवाळ्यात त्वचेवर पांढरा थर तयार झाला आहे? मग 'या' फेसपॅकने काळवंडलेली त्वचा होईल चमकदार आणि स्मूथ

Face Pack: चेहऱ्यावर जमा झालेली डेड स्किन आणि निस्तेज त्वचा उजळदार करण्यासाठी महागड्या फेसपॅकचा वापर करण्याऐवजी घरीच पिकलेल्या केळीचा वापर करून फेसपॅक बनवावा. यामुळे त्वचा स्वच्छ होण्यासोबतच हायड्रेट राहते.

सुरुची कदम
  • थंडीच्या दिवसांमध्ये त्वचेची काळजी कशा पद्धतीने घ्यावी?

  • त्वचेच्या समस्या कमी करण्यासाठी घरगुती उपाय?

  • घरगुती फेसपॅक बनवण्याची रेसिपी?

हिवाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर त्वचेच्या समस्या वाढू लागतात. त्वचा खूप जास्त कोरडी पडते आणि ताणल्यासारखी वाटते. याशिवाय दमट वातावरणामुळे त्वचा काळवंडून जाते आणि चेहऱ्यावर डेड स्किन जमा होऊन त्वचेचा ग्लो निघून जातो. कोरड्या हवेचा परिणाम शरीरसोबतच त्वचेवर सुद्धा लगेच दिसून येतो. टॅन झालेली त्वचा उजळदार करण्यासाठी अनेक वेगवेगळे उपाय केल्यानंतर सुद्धा त्वचेच्या समस्या काही केल्या कमी होत नाहीत. चेहरा काळा पडल्यानंतर तो उजळदार करण्यासाठी बाजारातील वेगवेगळ्या महागड्या क्रीम, फेसपॅक, फेसमास्क इत्यादी अनेक गोष्टींचा वापर केला जातो. पण वारंवार महागड्या क्रीमचा वापर केल्यामुळे त्वचेच्या समस्या कमी होण्याऐवजी आणखीनच वाढू लागतात.(फोटो सौजन्य – istock)

चेहरा निस्तेज झाल्यानंतर फारसे लक्ष दिले जाते नाही. पण असे न करता थंडीच्या दिवसांमध्ये त्वचा हायड्रेट ठेवणे फार आवश्यक आहे, अन्यथा त्वचेच्या समस्या वाढून चेहऱ्यावर रॅश किंवा लालसरपणा वाढतो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला त्वचेची काळजी घेण्यासाठी घरगुती पदार्थांचा वापर करून फेसपॅक बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेला फेसपॅक त्वचेच्या समस्या कमी करण्यासोबतच त्वचा आतून हायड्रेट ठेवण्यास मदत करेल. घरगुती उपाय केल्यानंतर ते हळूहळू त्वचेवर सकारात्मक परिणाम करतात. यामुळे चेहऱ्याला कोणतीही हानी पोहचत नाही.

हिवाळ्यात त्वचेसाठी खास बनाना फेसपॅक:

थंडीच्या दिवसांमध्ये त्वचा हायड्रेट ठेवण्यासाठी वेगवेगळे क्रीम किंवा मॉईश्चराईजर लावले जातात. पण त्याऐवजी पिकलेल्या केळीचा वापर करून बनवलेला फेसपॅक चेहऱ्यावर लावावा. जास्त पिकलेलं केळ खायला नको असल्यास या पद्धतीने तुम्ही फेसपॅक बनवून त्वचेवर लावू शकता. यासाठी वाटीमध्ये पिकलेलं केळ घेऊन मॅश करा आणि पेस्ट बनवा. तयार केलेल्या मिश्रणात मध घालून व्यवस्थित मिक्स करा. त्यानंतर त्यात कॉर्न स्टार्च आणि विटामिन ई कँप्सूल घालून मिक्स करा. तयार केलेला फेसपॅक व्यवस्थित मिक्स करून घ्या. यामुळे सर्व पदार्थ एकत्र मिक्स होतील.

फेसपॅक बनवल्यानंतर संपूर्ण चेहऱ्यावर आणि मानेवर लावून हलक्या हाताने मसाज करा. मसाज केल्यामुळे त्वचेच्या वाढत्या समस्यांपासून सुटका मिळेल आणि त्वचा स्वच्छ होण्यास मदत होईल. चेहऱ्यावर जमा झालेली डेड स्किन कमी करण्यासाठी फेसपॅक खूप जास्त उपयुक्त ठरेल. तयार केलेल्या फेसपॅकमध्ये थोडीशी साखर टाकून मिक्स केल्यास डेड स्किन कमी होण्यास आणखीनच मदत होईल. पण चेहऱ्यावर खूप जास्त पिंपल्स किंवा ऍक्ने असतील तर साखरेचा वापर अजिबात करू नका. यामुळे त्वचेवर आणखीनच पिंपल्स येऊ शकतात. त्यानंतर त्वचा पाण्याने स्वच्छ धुवून टाका.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Revanath Maharaj: नवनाथांपैकी सातवे सिद्ध गुरू रेवणनाथ; जाणून घ्या जन्मकथा, गुरुभेट आणि संजीवन समाधीचे महत्त्व

Mandar Kiwale Assisination Case:दिसला की तोडला! सख्ख्या भावानेच रचला कट! मंदार किवळेच्या हल्ल्यामागचे खरे कारण समोर

Soup Recipe: लहान मुलं भाज्या खाण्यास नकार देतात? मग थंडीच्या दिवसांमध्ये झटपट बनवा हेल्दी टेस्टी व्हेजिटेबल स्टॉक मंचाव सूप

Constitution Day : 26 नोव्हेंबर 1949 ला नेमकं काय घडलं होतं? जाणून घ्या संविधान दिनाचा संपूर्ण रंजक इतिहास

24 तासांच्या आऊटेजनंतर Microsoft लागू केला 'Code Red', इंजीनियरिंग सिस्टिम आणि क्राइसिस रिस्पॉन्समध्ये होणार बदल...