महाराष्ट्रामध्ये जीबीएस आजाराचा पहिला बळी! 11 वर्षांच्या विद्यार्थ्याचा उपचारादरम्यान मृत्यू 
लाइफ स्टाइल

महाराष्ट्रामध्ये जीबीएस आजाराचा पहिला बळी! 11 वर्षांच्या विद्यार्थ्याचा उपचारादरम्यान मृत्यू, लक्षणे दिसताच घ्या डॉक्टरांचा सल्ला

जीबीएस आजार झाल्यानंतर शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होऊन जाते. त्यानंतर हळूहळू मज्जासंस्थेवर परिणाम होण्यास सुरुवात होते. या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष न करता वेळीच योग्य ते उपचार करावेत.

सुरुची कदम
  • जीबीएसची लागण झाल्यानंतर दिसून येणारी लक्षणे?

  • जीबीएस आजार होण्याची कारणे?

  • ११ वर्षीय तरुणांच्या मृत्यूचे कारणे?

कोरोनानंतर पुन्हा एकदा महाराष्ट्रात जीबीएस या मज्जासंस्थेसंबंधित आजाराने हाहाकार माजवला आहे. कोरोना काळात संपूर्ण देशाची अर्थव्यवस्था कोलमडून गेली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा जीबीएसने डोकं वर काढले आहे. काही दिवसांआधी कोल्हापूर शहराच्या जवळ असणाऱ्या कळंबा गावात जीबीएसचे ७ रुग्ण सापडले होते. त्यानंतर त्यांना सीपीआर रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. त्यातील ११ वर्षीय राजवर्धन बुचडे याचा मृत्यू झाला आहे. त्याच्या मृत्यूमुळे सगळीकडे खळबळ निर्माण झाली आहे. राजवर्धन बुचडेवर छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत माळावली.

जीबीएसचे सात रुग्ण सापडल्यामुळे आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. कनेरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने काल दिवसभर कळंबा गावात घरोघरी जाऊन आरोग्य तपासणी आणि सर्वेक्षण मोहीम सुद्धा राबवण्यात आली आहे. युद्धपातळीवर सुरू असलेल्या या मोहिमेला नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिले आहे. जीबीएस आजाराच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावे, तसेच कोणतीही लक्षणे दिसल्यास तातडीने वैद्यकीय तपासणी करून घ्यावी, असे सुद्धा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

जीबीएस आजाराची लागण झाल्यानंतर शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होऊन जाते. त्यानंतर हळूहळू मज्जासंस्थेवर परिणाम होण्यास सुरुवात होते. हाता-पायांमध्ये अशक्तपणा जाणवणे, चालताना त्रास होणे, हात-पायांची ताकद कमी होणे यांसारखी लक्षणे दिसू लागतात. काही रुग्णांना अतिशय गंभीर वेदना सुद्धा होतात. त्यामुळे सतर्क राहून योग्य ते उपचार करणे आवश्यक आहे.

जीबीएसची लागण झाल्यानंतर दिसून येणारी लक्षणे:

जीबीएस म्हणजे गुइलेन-बॅरे सिंड्रोम. या आजाराची लागण झाल्यानंतर शरीरात हळूहळू लक्षणे दिसू लागतात. सुरुवातीच्या दिवसांमध्ये पाय आणि हातांमध्ये मुंग्या येणे, सुन्नपणा आणि स्नायूंचा अशक्तपणा जाणवणे इत्यादी लक्षणे दिसू लागतात तर कालांतराने हाता-पायाची बोटं, मनगटांमध्ये टोचल्यासारखे किंवा मुंग्या आल्यासारखे वाटते. पायांमध्ये अशक्तपणा येऊन चालण्यास किंवा तोल सांभाळण्यास, जिने चढण्यास त्रास होणे. कधीकधी कंबर, पाठ, मांड्या किंवा पायांमध्ये दुखणे किंवा क्रॅम्प येणे इत्यादी लक्षणे दिसू लागतात. ही लक्षणे रात्रीच्या वेळी अधिक होतात.छातीचे स्नायू कमकुवत झाल्यामुळे धाप लागणे किंवा सरळ झोपणे सुद्धा अवघड होऊन जाते. चेहऱ्याचे स्नायू शिथिल होणे, बोलताना चावताना त्रास होणे, अथवा गिळण्यास अडथळा येणे, हृदयाचे ठोके वाढणे/कमी होणे, रक्तदाबात चढ-उतार किंवा लघवी, पचनावर नियंत्रण ठेवण्यात त्रास होणे इत्यादी गंभीर लक्षणे दिसू दिसतात.

Italy Burqa Ban: युरोपमध्ये पुन्हा बुरखा बंदीचा मुद्दा तापला; इटलीच्या मेलोनी सरकारने लागू केला 1.1 लाख रुपये दंडाचा नवा कायदा

Tandel Marathi Movie: समुद्राशी नातं, संघर्षाची कहाणी! सयाजी शिंदे आणि ओम भुतकर यांच्या ‘तांडेल’ची घोषणा

Mercedes-Benz China: चीनमध्ये स्थानिक ऑटो पार्ट्स पुरवठ्यासाठी मर्सिडीज-बेंझ उभारणार नवा संयुक्त उपक्रम

Google Maps मध्ये मोठा बदल! आता रस्ते दिसणार अधिक स्पष्ट, नेव्हिगेशनचा अनुभव होणार आणखी सोपा

Pramod Mittal : जगातील सर्वात श्रीमंत कुटुंबाला लागली उतरती कळा; प्रमोद मित्तल यांच्या लंडन मेफेअरमधील 'त्या' 357 कोटींच्या बंगल्याचा वाद काय?