How many types of dark chocolate are there(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)  How many types of dark chocolate are there(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
लाइफ स्टाइल

Food tips: डार्क चॉकलेटचे किती प्रकार आहेत? जाणून घ्या आरोग्यदायी फायदे!

Food tips: डार्क चॉकलेट केवळ चवीसाठीच नाही, तर त्यातील कोको, फ्लॅव्होनॉइड्स आणि अँटिऑक्सिडंट्समुळे आरोग्यासाठीही उपयुक्त ठरू शकते. बाजारात ५० टक्क्यांपासून १०० टक्क्यांपर्यंत कोको असलेले डार्क चॉकलेट उपलब्ध आहेत. जाणून घ्या डार्क चॉकलेटचे विविध प्रकार, त्याचे आरोग्यदायी फायदे आणि सेवन करताना घ्यायची काळजी.

siddhi

चॉकलेट म्हटले की लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. मात्र, मिल्क चॉकलेटपेक्षा डार्क चॉकलेट आरोग्यासाठी अधिक फायदेशीर मानले जाते.पण ते सर्वांनाच आवडेल असे नाही. चवीला कडवट असलेले हे डार्क चॉकलेटमध्ये कोकोचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे त्यामध्ये अँटिऑक्सिडंट्स, फ्लॅव्होनॉइड्स, लोह आणि मॅग्नेशियम यांसारखे पोषक घटक आढळतात.चव कडवट असून देखील काही लोक डार्क चॉकलेट आवडीने खातात. बाजारात कोकोच्या प्रमाणानुसार डार्क चॉकलेटचे वेगवेगळे प्रकार उपलब्ध आहेत. चला तर जाणून घेऊया, डार्क चॉकलेटचे प्रकार आणि त्याचे फायदे कोणते आहेत.

डार्क चॉकलेटचे प्रकार कोणते आहेत?

१. ५० ते ५५ टक्के डार्क चॉकलेट : ज्यांना पहिल्यांदाच डार्क चॉकलेट खायचे आहे, त्यांच्यासाठी हा चांगला पर्याय आहे. यामध्ये कोकोचे प्रमाण तुलनेने कमी असल्यामुळे चव फारशी कडू नसते.

२. ६० ते ७० टक्के डार्क चॉकलेट : या प्रकारात कोकोचे प्रमाण अधिक असते. याची चव किंचित कडवट आणि गोडसर असते. डार्क चॉकलेट खाण्याची सुरुवात करणाऱ्यांसाठी हा प्रकार योग्य ठरू शकतो.

३. ७० ते ८५ टक्के डार्क चॉकलेट : या चॉकलेटमध्ये कोकोचे प्रमाण जास्त आणि साखरेचे प्रमाण तुलनेने कमी असू शकते. त्यामुळे आरोग्याची काळजी घेणारे अनेकजण हा पर्याय निवडतात.

४. ९० ते १०० टक्के डार्क चॉकलेट : या प्रकारात कोकोचे प्रमाण खूप जास्त असते. त्यामुळे त्याची चव अधिक कडू असते. १०० टक्के डार्क चॉकलेटमध्ये अतिरिक्त साखर नसते

डार्क चॉकलेट खाण्याचे आरोग्यदायी फायदे जाणून घ्या!

१. हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत : डार्क चॉकलेटमध्ये फ्लॅव्होनॉइड्स नावाचे अँटिऑक्सिडंट्स असतात. हे रक्तवाहिन्यांचे कार्य सुधारण्यास आणि रक्तप्रवाह सुरळीत ठेवण्यास मदत करू शकतात. काही संशोधनानुसार, कोकोमधील घटक रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासही हातभार लावू शकतात. त्यामुळे मर्यादित प्रमाणात डार्क चॉकलेटचे सेवन हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते.

२. मेंदूची कार्यक्षमता सुधारते : डार्क चॉकलेटमधील फ्लॅव्होनॉइड्स मेंदूकडे होणारा रक्तप्रवाह सुधारण्यास मदत करू शकतात. यामुळे स्मरणशक्ती, एकाग्रता आणि विचार करण्याच्या क्षमतेला फायदा होऊ शकतो. मात्र, डार्क चॉकलेट खाल्ल्याने बुद्धिमत्ता वाढते, असे निश्चितपणे म्हणता येत नाही.

३. मूड आनंदी ठेवण्यास मदत करते : डार्क चॉकलेट खाल्ल्याने मन प्रसन्न होण्यास मदत होऊ शकते. यामध्ये असणारे काही घटक मेंदूतील मूडशी संबंधित रासायनिक प्रक्रियांवर परिणाम करू शकतात. त्यामुळे थकवा किंवा कंटाळा आल्यावर थोडे डार्क चॉकलेट खाल्ल्याने आनंदी वाटू शकते.

४. शरीरातील ऑक्सिडेटिव्ह तणाव कमी करते : डार्क चॉकलेटमध्ये पॉलिफेनॉल्स आणि फ्लॅव्होनॉइड्ससारखे अँटिऑक्सिडंट्स असतात. हे शरीरातील फ्री रॅडिकल्समुळे होणारे नुकसान कमी करण्यास मदत करतात. त्यामुळे पेशींचे संरक्षण होण्यास हातभार लागू शकतो.

५. त्वचेच्या आरोग्यासाठी उपयुक्त : डार्क चॉकलेटमधील फ्लॅव्होनॉइड्स त्वचेचे ऑक्सिडेटिव्ह तणावापासून संरक्षण करण्यास मदत करू शकतात. काही अभ्यासांनुसार, कोकोमधील घटक त्वचेतील रक्तप्रवाह सुधारण्यास आणि सूर्याच्या अतिनील किरणांमुळे होणाऱ्या काही नुकसानापासून संरक्षण मिळवण्यास मदत करू शकतात. मात्र, यासाठी सनस्क्रीनचा वापर करणे आवश्यक आहे.

६. लोह आणि मॅग्नेशियमचा स्रोत : डार्क चॉकलेटमध्ये लोह, मॅग्नेशियम, तांबे आणि मँगनीज यांसारखी खनिजे असतात. ही खनिजे शरीरातील विविध कार्यांसाठी आवश्यक असतात. विशेषतः मॅग्नेशियम स्नायू आणि मज्जासंस्थेच्या कार्यासाठी महत्त्वाचे आहे.

७. रक्तातील साखरेच्या नियंत्रणासाठी मदत: कोकोमधील फ्लॅव्होनॉइड्स शरीराची इन्सुलिनला प्रतिसाद देण्याची क्षमता सुधारण्यास मदत करू शकतात. मात्र, डार्क चॉकलेट हा मधुमेहावरील उपाय नाही. मधुमेह असलेल्या व्यक्तींनी साखरेचे प्रमाण तपासूनच चॉकलेटचे सेवन करावे.

८. व्यायामानंतर शरीराला पोषक घटक मिळतात :डार्क चॉकलेटमध्ये मॅग्नेशियम आणि इतर खनिजे असल्यामुळे ते संतुलित आहाराचा भाग ठरू शकते. मात्र, व्यायामानंतर शरीराची ऊर्जा भरून काढण्यासाठी केवळ चॉकलेटवर अवलंबून राहू नये.

लक्षात ठेवा : डार्क चॉकलेटमध्येही कॅलरी आणि काही प्रमाणात कॅफिन असते. त्यामुळे दिवसाला साधारण २० ते ३० ग्रॅमपेक्षा जास्त खाणे टाळावे. कोकोचे प्रमाण जास्त आणि साखरेचे प्रमाण कमी असलेले चॉकलेट निवडणे अधिक योग्य ठरते.

Banks Offer : इलेक्ट्रिक वाहनांच्या युगात कमाईची मोठी संधी! Charging स्टेशनसाठी बँकांनी उघडला खजिना! मिळणार 10 कोटींचा निधी

Kalatmak Rajyog: डिसेंबरच्या सुरुवातीला कलात्मक योगाचा प्रभाव; कर्क राशीसह या राशींच्या लोकांना मिळणार करिअरमध्ये मोठे यश

Fashion: महाराष्ट्रीयन साड्यांचे आहेत अनेक प्रकार; पैठणीपासून नऊवारीपर्यंत जाणून घ्या प्रत्येक साडीची खासियत!

Vaibhav Sooryanvanshi: ६ संघाच्या एकत्रित सिक्स वैभवच्या नावे, पाकिस्तानची तंतरली; वैभव सूर्यवंशीची दहशत

Suspicious Death: हृदयविकाराचा झटका असल्याचा बनाव अन् कपाटात लपवलेली ती साडी! सुनेच्या मृत्यू प्रकरणात हत्येचा गंभीर संशय...