संध्याकाळच्या नाश्त्यात लहान मुलांसाठी झटपट बनवा Achaari Paneer Tikka Paratha
लहान मुलांना नाश्त्यात नेहमीच काय द्यावं? असा प्रश्न पालकांना नेहमीच पडतो. नाश्त्यामध्ये मुलं सतत बाहेर विकत मिळणारे पिझ्झा, बर्गर किंवा इतर तेलकट पदार्थ खाण्यास मागतात. मात्र नेहमीच तेलकट तिखट पदार्थ खाणे लहान मुलांच्या आरोग्यासाठी चांगले नाही. सतत जंक फूडचे सेवन केल्यामुळे मुलांचा सर्वंगीण विकास होत नाही. शरीराला योग्य पोषण न मिळाल्यामुळे वाढत्या वयात आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवू लागतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला लहान मुलांसाठी आचारी पनीर टिक्का पराठा बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. नेहमीच नाश्त्यात मैद्याचे पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर झटपट तुम्ही पराठा बनवू शकता. लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं पनीर खायला खूप आवडते. पनीर आरोग्यासाठी पौष्टिक आहे. चला तर जाणून घेऊया आचारी पनीर टिक्का पराठा बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)
साहित्य:
- पनीर
- लाल तिखट
- मीठ
- शिमला मिरची
- कांदा
- दही
- सातू पावडर
- आलं लसूण पेस्ट
- हिरवी मिरची
- जिऱ्याची पावडर
- गरम मसाला
- कोथिंबीर
- लोणचं मसाला
- बटर
कृती:
- आचारी पनीर पराठा बनवण्यासाठी सर्वप्रथम, मोठ्या बाऊलमध्ये शिमला मिरची, कांदा आणि पनीरचे बारीक तुकडे करून घ्या.
- मिश्रण तयार करताना सगळ्यात आधी दही घेऊन त्यात लाल तिखट, हळद, चवीनुसार मीठ, जिऱ्याची पावडर, चाट मसाला, लोणचं मसाला घालून मिक्स करा.
- नंतर त्यात बारीक करून घेतलेल्या भाज्या टाकून पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्या.
- पॅनमध्ये बटर घालून तयार केलेले पनीर दोन्ही बाजूने भाजून घ्या. पनीर आणि भाज्या जास्त भाजू नये.
- चपाती घेऊन त्यावर सॉस लावून पसरवून घ्या. त्यानंतर त्यावर भाजून घेतलेला पनीर टिक्का आणि भाज्यांचे तुकडे पसरवून घ्या.
- त्यानंतर वरून बारीक चिरून घेतलेला कांदा आणि चीज पसरवून घ्या. तयार केलेला पराठा फोल्ड करून सॅण्डविच मेकरमध्ये टोस्ट करून घ्या.
- तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला आचारी पनीर टिक्का पराठा.