देशभरात नवरात्रौत्सव सुरू झाला आहे. नवरात्रीत अनेक भाविक उपवास धरतात. काहीजण नऊ दिवस केवळ पाणी पिऊन उपवास करतात, तर काहीजण दिवसभर उपाशी राहून रात्री एक वेळेस जेवण करतात.
नवरात्रीत उपवास करणं हे शुभ मानलं जातं. मात्र यामुळे अनेकांना अॅसिडिटीची समस्याही उद्भवू शकते. बराच वेळ उपाशी पोट राहिल्याने अॅसिडिटी निर्माण होते, तर काही वेळा उपवासाचे पदार्थ खाल्याने देखील काहीना अॅसिडिटी होते.
यासाठी काही पदार्थांचे सेवन करून तुम्ही ही समस्या दूर करू शकता.
- तुमच्या दिवसाची सुरुवात चहाने नाही तर सफरचंदाने करा. यामुळे तुम्हाला गॅसची समस्या होणार नाही आणि तुम्हाला ऊर्जा मिळेल.
- उपवासात लोक फार कमी पाणी पितात. यामुळे गॅसची समस्या उद्भवू शकते. उपवासाच्या दिवशी १-२ नारळांचे पाणी प्यावे, ते गॅस आणि अॅसिडिटी दूर करेल.
- अनेकजण उपवासामध्ये दुधी भोपळा खातात. यामुळे अॅसिडिटीची समस्या दूर होईल. तुम्ही याची खीर बनवून खाऊ शकता.
उपवासात तुम्ही वरीच्या तांदळाची खिचडी खाऊ शकता. यामुळे गॅसही होणार नाही आणि पोटही सहज भरेल.
- उपवासाच्या दिवशी दहीचे अवश्य सेवन करावे. यामुळे तुम्हाला अॅसिडिटीचा त्रास होणार नाही. तुम्ही दह्यात बटाटा घालूनसुद्धा खाऊ शकता.
- गॅस किंवा अॅसिडिटी होत आहे असे वाटत असेल तर ते टाळण्यासाठी अर्धा ग्लास थंड दूध प्या. यामुळे अॅसिडिटीपासून झटपट आराम मिळेल.
महत्त्वाची टिप - कधी ही उपाशी पोटी राहू नका, थोडा तरी खाऊन झोपा, त्यामुळे अॅसिडिटी पासून मुक्ती मिळेल.