पिण्याचे पाणी किमान एक मिनिट उकळून स्वच्छ, झाकण असलेल्या भांड्यात साठवा.
पाण्याची टाकी नियमित स्वच्छ ठेवा आणि योग्य वॉटर फिल्टरची देखभाल करा.
पाणी गढूळ किंवा दुर्गंधीयुक्त असल्यास प्रयोगशाळेत तपासणी करून घ्या आणि पाणीपुरवठा विभागाकडे तक्रार करा.
पाणी हे आपल्या दैनंदिन जीवनातील अत्यंत महत्त्वाचे घटक आहे.ते स्वच्छ असणं देखील तितकाच गरजेचं आहे. पिण्यासाठी, स्वयंपाकासाठी आणि घरातील इतर कामांसाठी आपण पाण्याचा वापर करतो. मात्र, अनेकदा नळातून येणारे पाणी गढूळ, दुर्गंधीयुक्त किंवा त्यामध्ये मातीचे कण असल्याचे दिसून येते.ज्याने आपुल्या कुटुंबियांच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. विशेषतः पावसाळ्यानंतर किंवा पाइपलाइनच्या दुरुस्तीच्या वेळी पाण्याच्या गुणवत्तेवर परिणाम होऊ शकतो. अशा अस्वच्छ पाण्याचा वापर केल्यास आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे घरात येणारे पाणी स्वच्छ आणि सुरक्षित आहे की नाही, याची काळजी घेणे आवश्यक आहे. जाणून घेऊया घरात अस्वच्छ पाणी येत असल्यास कोणते उपाय करावेत.
पिण्याचे पाणी सुरक्षित करण्यासाठी उकळणे हा सोपा उपाय आहे.कमीतकमी पिण्याचे पाणी तसेच जेवणात वापरले जाणारे पाणी उकळवून वापरण्याचा प्रयत्न करा. पाणी चांगले उकळल्यानंतर किमान एक मिनिट उकळत ठेवा. यामुळे पाण्यातील बहुतांश रोगकारक जिवाणू, विषाणू आणि परजीवी नष्ट होण्यास मदत होते. त्यानंतर पाणी झाकण असलेल्या स्वच्छ भांड्यात साठवा.
घरातील पाणी स्वच्छ ठेवण्यासाठी योग्य वॉटर फिल्टर बसवू शकता.ज्याने तुम्हाला कष्ट पडणार नाही आणि वेळ ही वाया जाणार नाही. मात्र, पाण्यात कोणत्या प्रकारची अशुद्धता आहे, यानुसार फिल्टरची निवड करणे महत्त्वाचे आहे. फिल्टरची वेळोवेळी स्वच्छता आणि देखभाल करावी.तसेच फिल्टर स्वच्छ ठेवावा.
घरातील पाण्याच्या टाकीत माती, धूळ आणि शेवाळ जमा होऊ शकते.त्याच बरोबर त्यात कचरा देखील जाऊ शकतो. त्यामुळे पाण्याच्या टाकीची नियमित स्वच्छता करावी. टाकीला व्यवस्थित झाकण लावावे, जेणेकरून बाहेरील कचरा आणि कीटक आत जाणार नाहीत.त्याचबरोबर पाणी देखील सुरक्षित राहील.
नळातून वारंवार गढूळ किंवा दुर्गंधीयुक्त पाणी येत असल्यास त्याची प्रयोगशाळेत तपासणी करून घ्या.लॅब मध्ये पाठवून पाण्याची चाचणी करण्याचा प्रयत्न करा. पाण्यातील जिवाणू, रासायनिक घटक आणि इतर अशुद्धता तपासणे गरजेचे आहे.
पिण्याचे पाणी साठवण्यासाठी स्वच्छ आणि झाकण असलेली भांडी वापरा. पाणी काढण्यासाठी स्वच्छ डाव किंवा नळ असलेल्या भांड्याचा वापर करा. हात थेट पाण्यात घालणे टाळा.तसेच प्रत्येक आठवड्याला पाण्याची भांडी स्वच्छ धुवून घ्या.
पाण्यात माती किंवा वाळूचे कण दिसत असल्यास ते स्वच्छ कापडातून किंवा योग्य फिल्टरमधून गाळून घ्या.त्याने तुमच्या पाणी वापरला येईल. मात्र, केवळ गाळल्याने जिवाणू आणि विषाणू नष्ट होत नाहीत. त्यामुळे पिण्यापूर्वी पाणी उकळणे आवश्यक आहे.
नळातून सतत अस्वच्छ पाणी येत असल्यास पाइपलाइनमध्ये गळती किंवा सांडपाणी मिसळण्याची शक्यता असते. अशा वेळी संबंधित प्लंबर किंवा पाणीपुरवठा विभागाकडून तपासणी करून घ्या.पाइपलाइन स्वच्छ करून घ्या.
पाण्याचा रंग बदलणे, दुर्गंधी येणे किंवा वारंवार गढूळ पाणी येणे अशा समस्या असल्यास स्थानिक महानगरपालिका किंवा पाणीपुरवठा विभागाकडे तक्रार करा.त्यामुळे तुम्हाला नक्की कुठे समस्या आहे ते लक्षात येईल.
दूषित पाण्याच्या सेवनामुळे अतिसार, उलट्या, पोटदुखी, टायफॉइड आणि कॉलरासारखे आजार होऊ शकतात. त्यामुळे पाणी स्वच्छ दिसत असले तरी ते सुरक्षित आहे असे समजू नये. पाणी उकळल्याने जंतू नष्ट होतात; मात्र रासायनिक प्रदूषके किंवा जड धातू दूर होत नाहीत. अशा वेळी तपासणीनुसार योग्य शुद्धीकरण पद्धत निवडावी. तसेच बाजारातून वॉटर फिल्टरचा वापर करावा. घरातील प्रत्येक सदस्याच्या आरोग्यासाठी स्वच्छ आणि सुरक्षित पाणी पिणे महत्त्वाचे आहे.प्रत्येक सदस्याने पाणी पिताना काळजी घ्यावी. त्यामुळे पाण्याच्या गुणवत्तेकडे दुर्लक्ष न करता वेळोवेळी त्याची तपासणी करा आणि योग्य खबरदारी घ्या.