जेवणाची वाढेल दुप्पट चव! हिरव्या मुगापासून बनवा झटपट चमचमीत पौष्टिक डाळ, नोट करून घ्या रेसिपी
जेवणाच्या ताटातील दोन मुख्य पदार्थ म्हणजे डाळ आणि भात. हे पदार्थ जर ताटात नसतील तर जेवल्यासारखे अजिबात वाटतं नाही. मुगडाळ आणि तुरीच्या डाळीचा वापर करून भातासोबत खाण्यासाठी हिरव्या मिरचीची फोडणी देऊन वरण किंवा आमटी बनवली जाते. पण नेहमीच तेच ठराविक पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची सगळ्यांचं खूप जास्त इच्छा होते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला हिरव्या मुगाचा वापर करून जेवणात खमंग डाळ बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ सगळ्यांचं खायला खूप जास्त आवडेल. कमीत कमी साहित्यात झटपट बनवलेली डाळ चवीला अतिशय सुंदर लागते. याशिवाय हिरवे मूग खाल्ल्यामुळे शरीराला भरपूर फायदे होतात. हिरव्या मुगाची चविष्ट डाळ गरमागरम भातासोबत किंवा चपातीसोबत सुद्धा तुम्ही खाऊ शकता. दुपारच्या जेवणात किंवा रात्रीच्या जेवणात हॉटेल स्टाईल डाळ खाण्याची इच्छा झाल्यास मुगाची डाळ बनवावी. चला तर जाणून घेऊया हिरव्या मुगाची डाळ बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)
साहित्य:
- हिरवी मूग डाळ
- खडे मसाले
- तूप
- कांदा टोमॅटो
- जिरं
- हिंग
- लाल तिखट
- हळद
- दही
- कसुरी मेथी
- गरम मसाला
- मीठ
- बटर
- आलं
- लसूण
कृती:
- हिरव्या मुगाची पौष्टिक डाळ बनवण्यासाठी सर्वप्रथम, डाळ ६ ते ७ तास पाण्यात भिजत ठेवा. त्यानंतर पाण्याने स्वच्छ धुवून घ्या.
- कुकरच्या भांड्यात भिजवलेली डाळ, हिरवी छोटी वेलीची, दालचिनी, तमालपत्र, काळीमिरी, लवंग, चवीनुसार मीठ आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून व्यवस्थित मिक्स करा आणि कुकरचे झाकण लावून ठेवून द्या.
- कुकरच्या ४ ते ५ शिट्ट्या काढून घ्या. यामुळे डाळ व्यवस्थित शिजली जाईल आणि चव चांगली लागेल.
- कढईमध्ये तूप गरम करून त्यात जिरं, बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, आलं लसूण पेस्ट आणि हिंग घालून खमंग भाजा.
- त्यानंतर त्यात हळद, लाल तिखट, गरम मसाला घालून व्यवस्थित मिक्स करून घ्या. सर्व मसाले भाजल्यानंतर त्यात वाटीभर दही घालून मिक्स करून घ्या.
- त्यानंतर त्यात शिजवून घेतलेली डाळ टाकून व्यवस्थित मिक्स करा आणि एक उकळी काढून घ्या. उकळी आल्यानंतर कसुरी मेथी, बटर आणि कोथिंबीर घालून मिक्स करून घ्या.
- तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली पौष्टिक हिरव्या मुगाची डाळ.