Takeshis Castle in Real Life 
लाइफ स्टाइल

Takeshis Castle in Real Life: खऱ्या आयुष्यात अनुभवा 'ताकेशी कॅसल'ची मजा, इथे आहे रिअल-लाइफ ॲडव्हेंचर थीम पार्क

Adventure Theme Park : टेलिव्हिजनवर जपानचा 'ताकेशी कॅसल' हा शो तर तुम्ही नक्कीच पाहिला असावा. यात स्पर्धक वेगवेगळ्या साहसी खेळांमध्ये भाग घेतात. याच संकल्पनेवर भारतात रिअल-लाइफ ॲडव्हेंचर थीम पार्क बनवण्यात आलं आहे. इथे तुम्ही पॅकेजनुसार वेगवेगळ्या साहसी आणि रंजक खेळांचा अनुभव घेऊ शकता.

नुपूर भगत
  • ५० हून अधिक थरारक आणि मनोरंजक ॲक्टिव्हिटीजचा आनंद घेण्याची संधी.
  • प्रत्येक बजेटनुसार वेगवेगळी पॅकेजेस आणि वेळेचे पर्याय उपलब्ध.
  • वीकेंड ट्रिप किंवा ग्रुप आउटिंगसाठी एक परफेक्ट डेस्टिनेशन.

जपानचे फेमस टिव्ही शो 'ताकेशी कॅसल' तुम्ही टेलिव्हिजनवर नक्कीच पाहिला असेल. लहानपणापासूनच या ॲडव्हेंचर कॅसलमध्ये जाण्याची प्रत्येकाची इच्छा असते. तुम्हालाही साहसी आणि ॲडव्हेंचर खेळ खेळायला आवडत असतील तर खऱ्या आयुष्यातील 'ताकेशी कॅसल'ला तुम्ही नक्कीच भेट द्यायला हवी. दिल्ली-एनसीआरमध्ये मूळ जपानी टीव्ही शोवर आधारित एक रिअल-लाइफ ॲडव्हेंचर थीम पार्क बनवण्यात आले आहे. कुटुंबासोबत किंवा मित्रांसोबत मजामस्ती करण्यासाठी हे थीम पार्क एक परफेक्ट ठिकाण आहे.

इथे तुमच्या बजेटनुसार वेगवेगळे पॅकेज उपलब्ध आहेत. तुमच्या पॅकेजनुसार यात साहसी आणि मनोरंजक खेळ ॲड करण्यात आले आहेत. या थीम पार्कमध्ये पर्यटकांसाठी स्विमिंग पूलपासून ते झिपलाइन, सोलो स्विंग, टेक्सास बुल राइड, डेव्हिल क्लाइंब, वाइपआऊट चॅलेंज, मॅजिक वॉल आणि ताकेशीज स्लिपरी वॉलपर्यंत ५० हून अधिक ॲक्टिव्हिटीज उपलब्ध आहेत.

कुठे आहे हे थीम पार्क?

एलिव्हेट-टीम, स्पोर्ट्स अँड ॲडव्हेंचर पार्क फरिदाबाद रोड, बलोला, बंधवारी, गुरुग्राम येथे हे थीम पार्क बांधण्यात आले आहे. तुम्ही कधी दिल्लीला गेलात तर या थीम पार्कला जाण्याचा नक्की प्लॅन बनवा. दिल्लीपासून ३०-४० किलोमीटर अंतरावर हे पार्क आहे, अशात टॅक्सी करुन तुम्ही इथे जाऊ शकता. मेट्रोने जात असल्यास Millennium City Centre Gurugram स्टेशनवर उतरा आणि इथून कॅब करा. सामान्यपणे हे पार्क सकाळी १०.३० वाजता खुले होते.

६ पॅकेज उपलब्ध

तुम्ही या ॲडव्हेंचर थीम पार्कमध्ये तुमच्या बजेट आणि वेळेनुसार वेगवेगळे पॅकेज निवडू शकता. तुमच्या पॅकेजनुसार तुम्हाला यात वेगवेगळ्या एक्टीव्हिटीजची मजा लुटू शकता. या पॅकेजेसमध्ये एलिव्हेट सनरायझर्स, एलिव्हेट रॉयल चॅलेंजर्स, एलिव्हेट सुपर किंग्स, ताकेशीज बॅटल, ताकेशीज सनरायझर्स आणि घोस्ट रायडर द गोल्डन पास यांचा समावेश आहे.

पॅकेजची किंमत काय?

एलिवेट एडवेंचर पार्कमध्ये तुम्हाला ९९९ पासून ते ३ हजारापर्यंतचे पॅकेजेस मिळतील. सुरुवातीच्या पॅकेजमध्ये साधारण १० एक्टीव्हिटीज खेळता येतात. तसेच जर फुल पॅकेज किंवा महागड्या पॅकेजची निवड केली तर यात तुम्हाला ५० हून अधिक एक्टिव्हिटीजचा आनंद लुटता येईल. याबरोबरच या पॅकेजमध्ये टाईम लिमिट देखील आहे. काही पॅकेजमध्ये २ तास टाईम लिमिट आहे तर काहींमध्ये ४ तासांची टाईम लिमिट आहे.

शिवाजी पार्क आंदोलन भोवलं! अभिजीत दीपके, आशुतोष रांका, सौरव दासविरोधात LOC जारी; मुंबई पोलिसांच्या कारवाईने खळबळ

धुक्याचा कहर रोखण्यासाठी वाशिम पोलीस अलर्ट! महामार्गावर गस्त अन् विशेष उपाययोजना, वाहनचालकांना सतर्कतेचे आवाहन

Bopdeo Ghat Accident प्रकरणात मोठी बातमी; चालकाला कोर्टाने थेट...; वाचा सविस्तर

Kho Kho Championship : चार गुणांनी हुकले सुवर्ण! कर्नाटककडून महाराष्ट्राचा सलग दुसऱ्या वर्षी पराभव

Winter Health: थंडीत सकाळी अंथरुणातून उठण्याची इच्छा होत नाही? Winter Blues ची 'ही' लक्षणे दुर्लक्षित करू नका