- गोड पदार्थ खायला आवडतात का?
- गोड पदार्थ आवडत असल्यास ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा.
- रेसिपी फार सोपी आणि सहज बनते.
जेवणानंतर काही गोड खाण्याची इच्छा होत असेल तर ही रेसिपी तुमच्यासाठी खास आहे. गोड मिठाई बनवायची म्हणजे त्यात अनेक साहित्य लागणार. पण आजची ही मिठाई काहीशी वेगळी असणार आहे. याला बनवण्यासाठी फार साहित्याची गरज भासत नाही. शिवाय कमी वेळेत ही मिठाई बनून तयार होते. फक्त १ कप तांदळापासून तुम्ही हा स्वादिष्ट आणि रुचकर असा गोड पदार्थ तयार करु शकता. अनेकांना जेवणानंतर गोड पदार्थ खाण्याची सवय असते किंवा लेट नाईट गोड पदार्थांची क्रेव्हिंग होत असते. अशावेळी हा पदार्थ बनवणे तुमच्यासाठी चांगला पर्याय ठरले. चला या रेसिपीसाठी लागणारे साहित्य आणि कृती जाणून घेऊया.
- तांदूळ: १ कप
- देशी तूप: २ मोठे चमचे
- पांढरे तीळ: १/४कप
- सुका खोवलेला/किसलेला नारळ: १/४ कप
- साखर: १/२ कप
- दूध : १ कप
- काजू आणि पिस्ता: बारीक कापलेले
- या मिष्टान्नाला तयार करण्यासाठी सर्वप्रथम १ कप तांदूळ घ्या. तुम्ही कोणत्याही प्रकाराचे तांदूळ घेऊ शकता.
- तांदळांना पाण्याने दोन ते तीन वेळा चांगलं धुवून घ्या.
- तांदळातून सर्व पाणी काढा आणि एका कापडात तांदळांना पसरवून ठेवा, जेणेकरुन यातील सर्व पाणी निघून जाईल.
- तांदळांना १० ते १५ मिनिटे पंख्याखाली किंवा उन्हात ठेवून सुकवून घ्या.
- आता कढईत तूप २ मोठे चमचे तूप घाला.
- तांदळांना कढईत टाका आणि मंद आचेवर ब्राउन कलर येईपर्यंत शिजवत ठेवा.
- जेव्हा तांदूळ चांगले शिजतील तेव्हा यात पांढरे तीळ घालून यांना हलकेसे परता.
- आता यात सुक्या नारळाचा किस घाला आणि पुन्हा सर्व साहित्य मंद आचेवर परतून घ्या.
- सर्व साहित्य नीट शिजले आणि खमंग वास येऊ लागला की गॅस बंद करा आणि सर्व साहित्य मिक्सरमध्ये वाटून घ्या.
- एक कढई गॅसवर ठेवून यात अर्धा कप साखर आणि घट्ट दूध घाला.
- साखर दूधात विरघळली की, यात मिक्सरमध्ये वाटलेले तांदळाचे साहित्य घाला.
- याला सतत ढवळून मंद आचेवर शिजत ठेवा.
- जेव्हा साहित्य कढईला चिपकणे बंद होईल तेव्हा तुमची मिठाई तयार झाली आहे असं समजा.
- तुम्हाला हवं असल्यास शेवटी तुम्ही आणखी तूप घालू शकता.
- बारीक तुकडे केलेले काजू आणि पिस्त्याचे काप मिठाईवर घाला आणि तयार मिठाई खाण्यासाठी सर्व्ह करा.