सर्दी आणि खोकल्यासोबतच हवामानातील बदल, ॲलर्जी आणि संसर्ग यांसारख्या कारणांमुळे घसा खवखवू शकतो. यामुळे वेदना, खाण्यापिण्यास त्रास आणि बोलण्यासही अडचण येऊ शकते.घसादुखी नेहमीच जिवाणू संसर्गामुळे होत नाही. काही प्रकरणांमध्ये, विषाणू संसर्गामुळे देखील घश्याचा त्रास होऊ शकतो. अशा परिस्थितीत, अँटीबायोटिक्स नेहमीच आवश्यक नसतात. ही औषधे केवळ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच वापरावीत. काही घरगुती उपाय घसादुखी आणि वेदनेपासून तात्पुरता आराम देण्यास मदत करू शकतात. तुळस, हळद आणि मध यांचा वापर आयुर्वेदात पारंपरिकरित्या केला जातो. सर्दी, खोकला आणि घसादुखीपासून आराम मिळवण्यासाठी कोणते उपाय करावेत, जाणून घ्या. (Sore Throat Easy Home Remedies: )
तुळस आणि काळी मिरी घालून बनवलेले गरम पेय प्यायल्याने सर्दी, खोकला किंवा घसादुखी असलेल्या काही लोकांना आराम मिळू शकतो. आयुर्वेदात तुळशीला पारंपरिकरित्या एक उपयुक्त औषधी वनस्पती मानले जाते. हे गरम पेय घशाला आराम देते आणि घसादुखीमुळे होणारा त्रास कमी करण्यास मदत करते. हा काढा बनवण्यासाठी, एका कप पाण्यात तुळशीची ५-६ पाने आणि ४-५ काळी मिरी घालून उकळवा. यानंतर पाणी गाळून घ्या आणि कोमट झाल्यावर प्या. घशाच्या सामान्य त्रासांपासून आराम मिळवण्यासाठी हा एक फायदेशीर मार्ग ठरू शकतो.
कोमट मिठाच्या पाण्याने गुळण्या केल्याने घसादुखी आणि वेदनेपासून आराम मिळू शकतो. हा एक सोपा घरगुती उपाय आहे जो घशातील खवखवपणा कमी करण्यास मदत करू शकतो.एका ग्लास कोमट पाण्यात सुमारे अर्धा चमचा मीठ मिसळा. मीठ पूर्णपणे विरघळल्यानंतर, पाणी चमच्याने ढवळून घ्या आणि या पाण्याने गुळण्या करा. आवश्यकतेनुसार हे दिवसातून दोन ते तीन वेळा करु शकता. यामुळे घशाला आराम मिळेल.
मधाचे सेवन केल्याने घसादुखी आणि खोकल्यापासून काही प्रमाणात आराम मिळू शकतो. मध घशाला आराम देण्यास आणि खोकला कमी करण्यास मदत करतो. जर तुमचा घसा खवखवत असेल तर थोड्या प्रमाणात मधाचे सेवन केले जाऊ शकते. एक चमचा मध आणि आंबे हळद एकत्र मिक्स करुन खाल्ल्याने घशाचा त्रास कमी होऊ शकतो.जर ही समस्या कायम राहिली आणि सामान्य उपायांनी आराम मिळत नसेल, तर नक्कीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.