Home tips(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)  
लाइफ स्टाइल

Home tips: नवीन आठवड्याची सुरुवात करा फ्रेश मूडमध्ये! रविवारी करा 'Sunday Reset', घरासोबत स्वतःचीही घ्या काळजी

Home tips: आठवडाभराची धावपळ आणि कामाचा ताण कमी करण्यासाठी ‘Sunday Reset’ ही संकल्पना उपयुक्त ठरू शकते. रविवारी घराची आवराआवर, जेवणाचे नियोजन, कपड्यांची तयारी आणि सेल्फ केअर यासाठी थोडा वेळ काढल्यास नवीन आठवड्याची सुरुवात अधिक उत्साहाने करता येते. जाणून घ्या Sunday Reset करण्याच्या ७ सोप्या टिप्स.

siddhi berde
  • रविवारी घराची स्वच्छता, कपड्यांची तयारी आणि आठवडाभराच्या जेवणाचे नियोजन केल्यास दैनंदिन धावपळ कमी होऊ शकते.

  • सेल्फ केअर, डिजिटल डिटॉक्स आणि आवडत्या छंदासाठी वेळ काढल्याने स्वतःकडे लक्ष देण्याची संधी मिळते.

  • पुढील आठवड्यातील कामांची यादी तयार करून पुरेशी झोप घेतल्यास नवीन आठवड्याची सुरुवात अधिक नियोजनबद्ध पद्धतीने करता येते.

आठवडाभर ऑफिस, घरातील कामे आणि वैयक्तिक जबाबदाऱ्या सांभाळताना अनेकदा स्वतःसाठी वेळ काढणे कठीण होते.त्यामध्ये आपल्या वैयक्तिक जीवनाकडे लक्ष देणे अवघड होऊन बसते. सोमवार ते शनिवार धावपळ केल्यानंतर रविवार हा विश्रांतीचा दिवस असतो.त्यातलाही अर्धा दिवस आरामात जातो बाकीचा घराची साफसफाई करण्यात त्याही पुढच्या आठवड्यातील गोष्टींचं नियोजन करायचे असते.मात्र, रविवारी फक्त आराम करण्याऐवजी नवीन आठवड्याची तयारी केली तर पुढील काही दिवस अधिक नियोजनबद्ध पद्धतीने घालवता येऊ शकतात. सध्या सोशल मीडियावर 'Sunday Reset' ही संकल्पना लोकप्रिय होत आहे. या संकल्पनेमध्ये रविवारी घराची आवराआवर, पुढील आठवड्याचे नियोजन आणि स्वतःची काळजी घेण्यावर भर दिला जातो.

१. घराची स्वच्छता आणि आवराआवर करा.

नवीन आठवड्याची सुरुवात स्वच्छ घरातून करण्यासाठी रविवारी थोडा वेळ घराच्या आवराआवरीसाठी काढा. बेडरूम, हॉल आणि किचनमधील पसारा आवरा. अनावश्यक वस्तू जागेवर ठेवा, बेडशीट बदला आणि घरातील कचरा बाहेर टाका. यामुळे घर स्वच्छ आणि नीटनेटके राहण्यास मदत होते.

२. आठवड्याचे जेवण आधीच ठरवा.

दररोज काय बनवायचे, याचा विचार करण्यात बराच वेळ जातो. त्यामुळे रविवारी आठवडाभराच्या जेवणाचे नियोजन करा. कोणत्या दिवशी कोणती भाजी, नाश्ता किंवा डब्यासाठी काय बनवायचे हे ठरवा. आवश्यक किराणा आणि भाजीपाल्याची यादी तयार करा. यामुळे वेळेची बचत होऊ शकते.

३. कपड्यांची आणि ऑफिस बॅगची तयारी करा.

कामासाठी किंवा कॉलेजसाठी रोज सकाळी कपडे शोधण्याची धावपळ टाळायची असेल तर रविवारीच कपड्यांचे नियोजन करा. कपडे इस्त्री करून ठेवा. ऑफिस बॅग, आवश्यक कागदपत्रे, चार्जर आणि इतर वस्तू व्यवस्थित ठेवा. यामुळे सोमवारची सकाळ अधिक सोपी होईल.

४. स्वतःसाठी सेल्फ केअर वेळ ठेवा.

Sunday Reset मध्ये स्वतःची काळजी घेणेही महत्त्वाचे आहे. रविवारी केसांना तेल लावणे, हेअर मास्क वापरणे, त्वचेची काळजी घेणे किंवा आरामात अंघोळ करणे अशा गोष्टी करा. याशिवाय आवडते पुस्तक वाचणे किंवा संगीत ऐकणे यासाठीही वेळ काढा.

५. मोबाईल आणि डिजिटल डिटॉक्स करा.

सतत मोबाईल पाहण्याची सवय कमी करण्यासाठी रविवारी काही तास डिजिटल ब्रेक घ्या. अनावश्यक फोटो डिलीट करा, मोबाईलमधील फाइल्स व्यवस्थित करा आणि सोशल मीडियापासून थोडा वेळ दूर राहा. या वेळेत कुटुंबासोबत गप्पा मारा किंवा आवडता छंद जोपासा.

६. पुढील आठवड्याचे नियोजन करा.

नवीन आठवड्यातील महत्त्वाची कामे, ऑफिसच्या मीटिंग्स, वैयक्तिक भेटी आणि इतर जबाबदाऱ्यांची यादी तयार करा. डायरी किंवा मोबाईल कॅलेंडरमध्ये आवश्यक तारखा नोंदवा. महत्त्वाच्या कामांना प्राधान्य दिल्यास कामांचा ताण कमी होण्यास मदत होते.

७. पुरेशी विश्रांती आणि झोप घ्या.

रविवारी रात्री उशिरापर्यंत जागरण करण्याऐवजी वेळेवर झोपण्याचा प्रयत्न करा. नवीन आठवड्याची सुरुवात उत्साहाने करण्यासाठी पुरेशी झोप घेणे आवश्यक आहे. झोपण्यापूर्वी मोबाईलचा वापर कमी करा आणि शांत वातावरणात आराम करा.

Sunday Reset का महत्त्वाचे आहे?

Sunday Reset ही केवळ घर स्वच्छ करण्याची पद्धत नसून स्वतःला मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या नवीन आठवड्यासाठी तयार करण्याची एक चांगली सवय आहे.ह्यामुळे तुमचा कोणताही गोंधळ उडणार नाही. यामुळे दैनंदिन कामांचे नियोजन करणे, वेळेची बचत करणे आणि स्वतःसाठी वेळ काढणे सोपे होते. त्यामुळे या रविवारी काही तास स्वतःसाठी आणि घरासाठी राखून ठेवा आणि नवीन आठवड्याचे स्वागत फ्रेश मूडमध्ये करा!

बोरांसाठी चिमुरडीवर क्रूरतेचा कळस! सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांची चक्रे फिरली...

जुन्या WhatsApp DP ला म्हणा बाय-बाय! AI बनवणार तुमचा नवा स्टायलिश लूक

Kabaddi Tournament : अजिंक्यपद कबड्डी निवड चाचणी स्पर्धेत; स्पर्श फाउंडेशन, स्वस्तिक मंडळाची विजयी आगेकूच

Deepak Kejriwal: कॅन्सरशी झुंज देणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण? CINTAA कार्यालयातील घटनेने खळबळ

FUEL Social Stock Exchange: ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी मोठी संधी! 'फ्युएल'च्या माध्यमातून शिष्यवृत्ती आणि मोफत MBA ची घोषणा