सोन्याच्या तुलनेत परवडणारी किंमत आणि आकर्षक डिझाइन्समुळे चांदीच्या दागिन्यांना वाढती पसंती.
पारंपरिक दागिन्यांपासून ऑक्सिडाइज्ड ज्वेलरीपर्यंत विविध प्रकारचे पर्याय उपलब्ध.
दागिन्यांचा चमकदारपणा टिकवण्यासाठी योग्य साठवणूक आणि नियमित काळजी घेणे महत्त्वाचे.
फॅशनविश्वात सध्या सोन्याच्या दागिन्यांबरोबरच चांदीच्या दागिन्यांचीही लोकप्रियता वाढताना दिसत आहे. विविध चांदीच्या दागिन्यांना विकणारे वेबसाईट हे सध्या बाजारात उपलब्ध आहेत. विशेषतः तरुणींमध्ये चांदीच्या दागिन्यांची क्रेझ अधिक आहे.त्याचबरोबर हे चांदीचे दागिने रोजच्या वापरा साठीदेखील सुरेख आहेत. बदलत्या फॅशन ट्रेंडनुसार चांदीचे दागिने पारंपरिक तसेच आधुनिक लूकसाठी वापरले जात आहेत. सोन्याच्या तुलनेत चांदीचे दागिने सामान्यतः कमी किमतीत उपलब्ध होत असल्यामुळे अनेक महिला त्यांना पसंती देत आहेत.त्याचबरोबर ज्यांना सोन्य्सारखा लुक हवा असतो ते सोन्याचा गिलावा करून घेतात, रोजच्या वापरापासून ते लग्नसमारंभ आणि सण-उत्सवांपर्यंत चांदीच्या दागिन्यांचा वापर केला जात आहे.
सोन्याच्या तुलनेत चांदीचे दागिने अनेकदा कमी बजेटमध्ये खरेदी करता येतात. त्यामुळे कमी किमतीतही आकर्षक आणि वेगवेगळ्या डिझाइन्सचे दागिने मिळतात.तसेच सुटी कापड असलेल्या सड्यावर चांदीचे दागिने अजूनच सुंदर दिसतात. विशेषतः तरुणींना कमी बजेटमध्ये फॅशनेबल दिसण्यासाठी चांदीचे दागिने चांगला पर्याय ठरतात.त्याचबरोबर चांदीच्या दागिन्यांमध्ये अनेक पर्याय उपलब्ध असतात.
चांदीमध्ये पैंजण, जोडवी, तोडे, वाकी, बांगड्या, ठुशी आणि नेकलेस असे अनेक पारंपरिक दागिन्यांचे प्रकार उपलब्ध आहेत. तसेच वेगवेगळ्या प्रकारातले साज हे चांदीमध्ये उपलब्ध आहेत. महाराष्ट्रीयन पारंपरिक वेशभूषेसोबत हे दागिने विशेष खुलून दिसतात. साडी किंवा नऊवारी साडीवर चांदीचे पारंपरिक दागिने घातल्यास लूक अधिक आकर्षक दिसतो.चांदी वापरायला देखील सोप्पी असते. स्त्रियांबरोबर पुरुष देखील चांदीचे कड किंवा ब्रेसलेट हातात घालतात.
सध्या ऑक्सिडाइज्ड चांदीच्या दागिन्यांना विशेष पसंती मिळत आहे. मोठे झुमके, चोकर, नक्षीदार अंगठ्या, ब्रेसलेट आणि नेकलेस तरुणींमध्ये लोकप्रिय आहेत. तसेच ऑक्सिडाइज्ड दागिने हे सणासुदीला अगदी छान दिसतात. कुर्ती, ड्रेस, जीन्स आणि इंडो-वेस्टर्न कपड्यांवर हे दागिने छान दिसतात.चांदी फॅशन च्या बाबतीत कोणत्या एका लुक साठी बनलेली नाही. ती सर्व प्रकारच्या लुक वर अगदी सुरेख दिसते.
सोने हे सुंदर दिसत असले तरी वापरताना तितकीच काळजी घ्यावी लागते. हलके आणि नाजूक चांदीचे दागिने रोजच्या वापरासाठी निवडता येतात.तसेच ऑफिस ला साडी नेसून जाणाऱ्या स्त्रियांसाठी चांदी ही उत्तम पर्याय आहे. लहान कानातले, साधी चेन, अंगठी आणि ब्रेसलेट ऑफिस किंवा कॉलेजमध्येही वापरता येतात. त्यामुळे रोजच्या लूकमध्ये वेगळेपणा आणण्यासाठी चांदीचे दागिने उपयोगी ठरतात.
वाढदिवस, लग्न, साखरपुडा किंवा इतर खास प्रसंगी चांदीचे दागिने भेट म्हणून देता येतात. चांदीची नाणी, पैंजण, अंगठ्या आणि ब्रेसलेट यांना भेटवस्तू म्हणून पसंती दिली जाते.त्याचबरोबर सध्या स्त्रियांना विविध प्रकारचे दागिने वापरण्याची आवड असते . त्यामुळे त्यांना चांदीचे दागिने भेट म्हणून देऊ शकतात.
चांदीचे दागिने वापरताना त्यांची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. हवा आणि ओलाव्याच्या संपर्कामुळे चांदी काळवंडू शकते. त्यामुळे वापरानंतर दागिने मऊ कापडाने पुसून हवाबंद डब्यात ठेवावेत. परफ्यूम, साबण ,आणि इतर रसायनांचा थेट संपर्क टाळावा.चांदीची योग्य काळजी घेतल्यामुळे चांदीचा चमकदारपणा टिकून राहील. एकूणच, परवडणारी किंमत, आकर्षक डिझाइन्स आणि पारंपरिक तसेच आधुनिक वेशभूषेसोबत सहज जुळणारी शैली यामुळे चांदीचे दागिने महिलांच्या पसंतीस उतरत आहेत. त्यामुळे सोन्याबरोबरच चांदीच्या दागिन्यांनाही फॅशनविश्वात महत्त्वाचे स्थान मिळत आहे.