Skincare(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)  
लाइफ स्टाइल

Skincare: हात-पायांवरील पिग्मेंटेशन कमी करायचे आहे? जाणून घ्या त्वचेची काळजी घेण्याच्या सोप्या टिप्स

Skincare: हात-पायांवरील टॅनिंग आणि पिग्मेंटेशनमुळे त्वचा काळपट दिसत असेल, तर नियमित स्किन केअर फायदेशीर ठरू शकते. सनस्क्रीन, मॉइश्चरायझर, व्हिटॅमिन सी आणि सौम्य एक्सफोलिएशनच्या मदतीने त्वचेचा रंग एकसमान ठेवण्यास मदत होऊ शकते. मात्र, पिग्मेंटेशन वाढत असल्यास त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला घ्या.

siddhi berde
  • हात-पायांवरील टॅनिंग कमी करण्यासाठी SPF 30 ते 50 असलेले ब्रॉड-स्पेक्ट्रम सनस्क्रीन नियमित लावा.

  • मॉइश्चरायझर, व्हिटॅमिन सी आणि सौम्य एक्सफोलिएशनमुळे त्वचेचा कोरडेपणा कमी करण्यास आणि रंग एकसमान दिसण्यास मदत होऊ शकते.

  • लिंबाचा रस आणि बेकिंग सोडा यांसारखे त्वचेला त्रास देणारे पदार्थ टाळा. पिग्मेंटेशन वाढल्यास त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला घ्या.

अनेक व्यक्तींना त्यांच्या हात पायावर मोठ्या प्रमाणात पिग्मेंटेशन चा त्रास असतो, पण त्यावर सर्वच उपाय हे काम करत नाहीत. उन्हाचा थेट संपर्क, त्वचेचा कोरडेपणा, धूळ, प्रदूषण आणि सतत होणारे घर्षण यामुळे हात-पायांवर टॅनिंग किंवा पिग्मेंटेशन होऊ शकते.ज्यामुळे त्वचा काळपट पडत जाते. काही वेळा हार्मोनल बदल, त्वचेची जळजळ किंवा इतर आरोग्यविषयक कारणांमुळेही त्वचेचा रंग असमान दिसू लागतो. अशावेळी महागड्या ब्युटी ट्रीटमेंट करण्याऐवजी नियमित त्वचेची काळजी घेणे फायदेशीर ठरू शकते.त्यासाठी कोणकोणते पर्याय आहेत ते जाणून घेऊया

१. सनस्क्रीन लावायला विसरू नका.

हात आणि पायांवरील काळपटपणाचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे सूर्यप्रकाश.सतत त्वचा सूर्याच्या संबंधात आली की काळपॅट पडत जाते. त्यामुळे घराबाहेर पडण्यापूर्वी हात, पाय आणि बोटांवर SPF 30 ते 50 असलेले ब्रॉड स्पेक्ट्रम सनस्क्रीन लावा. उन्हात जास्त वेळ राहणार असल्यास दर दोन तासांनी पुन्हा सनस्क्रीन लावणे आवश्यक आहे.ज्यामुळे तुमची त्वचा हि सूर्यापासून सुरक्षित राहील.

२. मॉइश्चरायझरचा वापर करा.

त्वचेचा कोरडेपणा कमी करण्यासाठी नियमित मॉइश्चरायझर लावणे गरजेचे आहे. ग्लिसरीन, सिरॅमाइड आणि युरिया असलेली उत्पादने त्वचेला ओलावा देण्यास मदत करतात. आंघोळीनंतर हात-पायांना मॉइश्चरायझर लावण्याची सवय लावा.

३. व्हिटॅमिन सीचा वापर करा.

व्हिटॅमिन सी त्वचेवरील काळे डाग कमी करण्यास आणि त्वचेचा रंग एकसमान दिसण्यास मदत करू शकते. मात्र कोणतेही सिरम वापरण्यापूर्वी पॅच टेस्ट करणे आवश्यक आहे. पॅच टेस्ट शिवाय वापरणे टाळा.व्हिटॅमिन सीचा वापर करण्याची एक वेळ ठरवा.

४. सौम्य एक्सफोलिएशन करा.

त्वचेवरील मृत पेशी काढण्यासाठी आठवड्यातून एक किंवा दोन वेळा लॅक्टिक अॅसिड किंवा युरिया असलेली उत्पादने वापरू शकता. मात्र त्वचेवर जोरात स्क्रब करणे टाळा. त्यामुळे जळजळ होऊन पिग्मेंटेशन वाढू शकते.

५. घरगुती उपाय करताना काळजी घ्या.

लिंबाचा रस, बेकिंग सोडा किंवा इतर तीव्र पदार्थ त्वचेवर लावणे टाळा. यामुळे त्वचेची जळजळ होऊन काळपटपणा वाढण्याची शक्यता असते. त्वचेची स्वच्छता राखणे आणि नियमित मॉइश्चरायझिंग करणे अधिक महत्त्वाचे आहे.योग्य मार्गांचा वापर करा ज्याने तुमच्या त्वचेला त्रास होणार नाही.

६. योग्य पादत्राणांची निवड करा.

घट्ट चप्पल किंवा शूजमुळे पायांवर सतत घर्षण होऊन त्वचा काळपट होऊ शकते.तसेच पायाला माती लागल्यामुळे देखील त्वचा काळपट पडत जाऊ शकते. त्यामुळे आरामदायी पादत्राणे वापरा आणि त्वचेवर घर्षण होणार नाही याची काळजी घ्या.

नियमित स्किन केअर केल्यास साधारण आठ ते बारा आठवड्यांत काही प्रमाणात सुधारणा दिसू शकते. मात्र अचानक वाढणारे पिग्मेंटेशन, जाडसर काळपट त्वचा किंवा सतत होणारी जळजळ याकडे दुर्लक्ष करू नये. अशावेळी त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

Rohit Sharma: 'पलटण कुर्सी की...'; Suryakumar Yadav ची रोहितसाठी खास पोस्ट

Political News : "... पण त्यांनी माती खाल्ली", संजय राऊतांचा राष्ट्रवादी शरद पवार गटावर निशाणा

७ वर्षांपेक्षा अधिक काळ फोन टिकून राहण्यासाठी खरेदी करताना 'या' गोष्टी आवर्जून तपासा, अन्यथा नंतर होईल पश्चाताप

India vs Malaysia: भारताच्या वाघिणींचा हल्लाबोल! मलेशियाला ६-२ ने चारली धूळ; टीम इंडियाचा फायनलमध्ये सहाव्यांदा दिमाखात प्रवेश

Good Sleep Tips: रात्री चांगली झोप येण्यासाठी झोपण्यापूर्वी करा 'या' ५ गोष्टी; जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी