लाइफ स्टाइल

अक्कल दाढ का दुखते? 'हे' नक्की वाचा

Rashmi Dongre

बहुतेक अक्कल दाढ १७ ते २५ या वयोगटात फुटू लागते आणि ही दाढ बाहेर येण्याच्या प्रक्रियेत केवळ दातच नाही तर संपूर्ण तोंड दुखू लागते. या वेदना इतक्या तीव्र असतात की काही खावसं किंवा प्यावसं वाटत नाही. अक्कल दाढेच्या या तीव्र दुखण्याचे कारण आधीच जुने दात आहेत, त्यामुळे अक्कल दाढीच्या दातांना स्वतःसाठी जागा बनवावी लागते आणि त्यामुळे दातांवर आणि हिरड्यांवर खोलवर परिणाम होतो. हिरड्या कापल्या जातात किंवा सुजतात.

अक्कल दाढेच्या दुखण्यावर काही उपाय

◼️दाढीच्या ठिकाणी बर्फ लावावा कारण दाढदुखीमुळे येणारी सूज किमान १५ मिनिटे लावल्यानंतर थांबेल.

◼️मिठाच्या पाण्याने गुळण्या करा. काही वेळ मिठाचे पाणी तोंडात ठेवल्याने दाढदुखीत आराम मिळतो.

◼️कोमट पाणी तोंडात ठेवल्याने दाढीच्या दुखण्यावरही फरक जाणवतो.

◼️दाढदुखीवरही लवंग चांगला प्रभाव दाखवते. लवंग थेट दाढेवर ठेवा किंवा लवंग तेल कापसात भिजवा आणि काही वेळ दाढेवर ठेवा. तुम्हाला आराम मिळेल.

◼️तुम्ही लवंग बारीक करून दाढेवरही लावू शकता.

◼️सूज कमी करण्यासाठी लसणाच्या पाकळ्या ठेचून दाढेवर ठेवता येतात. त्याचप्रमाणे, आले सूज कमी करण्यास देखील मदत करते.

◼️हळदीचे औषधी गुणधर्म दाढांवर गुणकारी आहेत. तुम्ही थेट दाढीवर हळद लावा. वेदना कमी होऊ लागतील.

◼️एलोवेरा जेल देखील वापरू शकता. कोरफडीच्या पानांमधून थेट जेल काढा आणि दाढेवर ठेवा.

असे काही सोपे उपाय आपण करू शकतो, परंतु दाढेमुळे खूपच जास्त त्रास असेल तर मात्र दंत वैद्याचा सल्ला घ्यावा.

Delhi Jama Masjid : दिल्लीतील जामा मशिद पोलीस ठाण्यात पाच पोलिसांवर चाकूने हल्ला; आरोपीच्या पायावर गोळी झाडत केली अटक

Gold Imports Drop : PM Modi यांच्या आवाहनाचा मोठा परिणाम? सोन्याच्या आयातीत तब्बल 40 % घट; 7 महिन्यांत 1.53 लाख कोटींची बचत

Maharashtra Recruitment Exam: पेपरफुटी करणाऱ्यांना १० कोटींचा दंड, १० वर्षे कारावास; भरती परीक्षांसाठी सरकारचा कठोर ॲक्शन प्लॅन

Leopard Attack in Assam:बिबट्याचा थरारक हल्ला कॅमेऱ्यात कैद; वनविभागाच्या बचावकार्यात मोठी दुर्घटना

IND A vs UAE : गोलंदाजांना सुर गवसेना, युएईचं भारताला 250 धावांचं आव्हान