महाराष्ट्र

खांबाटकी घाटात 20 टन वजनाच्या ट्रेलरचा अपघात

खांबाटकी घाटातील भैरवनाथ मंदीराजवळ ट्रेलरची पीन निसटल्याने केबीन व ट्रेलर वेगळा झाला. मात्र सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झाले नाही .

Aparna

खंडाळा : खांबाटकी घाटातील भैरवनाथ मंदीराजवळ ट्रेलरची पीन निसटल्याने केबीन व ट्रेलर वेगळा झाला. मात्र सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झाले नाही .

याबाबत घटनास्थळाहून मिळालेली माहिती अशी की,गुजरातहुन बेंगलोरकडे 20 टन वजनाच्या केबलचे रोल घेऊन ट्रेलर निघाला होता . बुधवारी दुपारी पावणेतीन वाजण्याच्या सुमारास खांबाटकी घाट चढत असताना भैरवनाथ मंदीराजवळील अवघड तीन वळणे पार करून ट्रेलर पुढे निघाला होता . सपाट व सरळ असणाऱ्या मार्गावर रस्त्याच्या मधल्या लेनवरून ट्रेलर पुढे जात असताना अचानकपणे ट्रेलर व केबीन तुटून वेगळे झाले . ट्रेलर तुटून खाली पडला.त्याच्या दोन्ही बाजुंनी वाहतुक सुरळीत सुरु होती .

या अपघाताची माहिती मिळताच महामार्ग वाहतुक शाखेचे सपोनि हर्षद गालिंदे , पोलीस हवालदार निलेश गायकवाड,रविंद्र वाघमारे,अतुल आवळे,सर्जेराव कांबळे हे घटनास्थळी दाखल झाले . क्रेनच्या साहाय्याने ट्रेलर बाजुला करून वाहतुक सुरळीत करण्यात आली.

Mumbai News: भारतावर अतिवृष्टी, पूर आणि दुष्काळाचे संकट! महाराष्ट्रात दुष्काळ परिस्थितीची चिन्हे

मिनी महाबळेश्वर गारठलं! तापमान थेट एकेरी अंकात; पर्यटकांचा ओढा वाढला

Kolhapur Drink and Drive: कोल्हापुरात मद्यधुंद कारचालकाने दोघा भावांना चिरडले; गोकुळच्या माजी अध्यक्षांच्या मुलाला अटक

जुन्या कॅसेटला मिळाली नवी ओळख! 44 वर्षांपूर्वी फ्लॉप झालेलं गाणं GTA 6 मुळे पुन्हा ट्रेंडमध्ये

Bajra Soup: थंडीच्या दिवसांमध्ये सकाळच्या नाश्त्यात करा बाजरीच्या सूपचा समावेश, पित्ताच्या त्रासापासून मिळेल सुटका