अकोला : राज्य शासनाच्या निर्देशानुसार सेतू सेवा केंद्र आणि आपले सरकार सेवा केंद्रांना एकसमान (कॉमन) ब्रडिंग करणे तसेच आवश्यक सुविधांची माहिती सेल्फ रिपोर्टिंग फॉर्ममध्ये अपलोड करणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र, वारंवार सूचना, प्रशिक्षण आणि मार्गदर्शन देऊनही जिल्ह्यातील अनेक केंद्रचालकांनी या नियमांचे पालन केलेले नाही. त्यामुळे संबंधित २६० केंद्रांचे आयडी निलंबित अथवा सहा महिन्यांसाठी तात्पुरते बंद करण्याची शिफारस जिल्हाधिकारी कार्यालयाने केली आहे.
महाराष्ट्र शासनाने सेतू सेवा केंद्र आणि आपले सरकार सेवा केंद्रांसाठी एकसमान ब्रेंडिंग, पायाभूत सुविधांची मानके आणि सनियंत्रण कार्यप्रणाली निश्चित केली आहे. त्यानुसार प्रत्येक केंद्रावर कॉमन ब्रँडिंग करणे आणि सेल्फ रिपोर्टिंग फॉर्ममध्ये आवश्यक माहिती अपलोड करणे अनिवार्य आहे. शासन निर्णयातील तरतुदींची पूर्तता करण्यासाठी केंद्रचालकांना वेळोवेळी सूचना देण्यात आल्या होत्या. तसेच केंद्रांवरील सुविधांची जिल्हा प्रशासनाकडून वेळोवेळी सूचना केंद्रचालकांवर कारवाई होऊ नये, यासाठी प्रत्यक्ष पडताळणी करण्याचेही निर्देश देण्यात आले होते. या प्रक्रियेंतर्गत केंद्रचालकांना प्रशिक्षण व मार्गदर्शन करण्यात आले. त्यानंतर १९ नोव्हेंबर रोजी पत्र देऊन २० नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी घेण्यात आली.
या बैठकीत नियमांचे पालन करण्यासाठी अंतिम मुदत देण्यात न करणाऱ्या केंद्रांचे आयडी निलंबित अथवा बंद करण्याची कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट निर्देशही देण्यात आले होते. मात्र, मुदत संपल्यानंतरही काही केंद्रांनी कॉमन अँडिंग पूर्ण केले नाही. तसेच सेल्फ रिपोर्टिंग फॉर्ममध्ये आवश्यक माहिती अपलोड केली नाही. त्यामुळे संबंधित केंद्रांची यादी जोडून त्यांचे आयडी निलंबित अथवा सहा महिन्यांसाठी तात्पुरते बंद करण्याबाबत महाआयटी सर्व्हरवर आवश्यक कार्यवाही करण्याची शिफारस जिल्हाधिकारी कार्यालयाने शुक्रवारी पत्राद्वारे केली आहे. त्यामुळे संबंधित केंद्रचालकांमध्ये खळबळ उडाली आहे.
260 केंद्रचालकांना फटका
शासनाच्या निर्देशांचे पालन न करणाऱ्या जिल्ह्यातील तब्बल २६० आपले सरकार सेवा केंद्र आणि सेतू सेवा केंद्रांचे आयडी निलंबित अथवा सहा महिन्यांसाठी तात्पुरते बंद करण्याची शिफारस करण्यात आली आहे. या कारवाईमुळे संबंधित केंद्रांच्या कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता आहे. महाआयटीच्या जिल्हा समन्वयकांकडून वेळोवेळी सूचना, प्रशिक्षण आणि मार्गदर्शन करण्यात आले.
कॉमन ब्रँडिंग पूर्ण करणे तसेच सेल्फ रिपोर्टिंग फॉर्ममध्ये आवश्यक माहिती भरण्याबाबत वारंवार पाठपुरावा करण्यात आला. तरीही अनेक केंद्रचालकांनी याकडे दुर्लक्ष केले. अखेर जिल्हा प्रशासनाकडून संबंधित केंद्रांचे आयडी निलंबित अथवा तात्पुरते बंद करण्याची शिफारस करण्यात आली.
1. अकोल्यातील किती सेवा केंद्रांवर कारवाईची शक्यता आहे?
अकोला जिल्ह्यातील २६० सेवा केंद्रांचे आयडी निलंबित किंवा सहा महिन्यांसाठी तात्पुरते बंद करण्याची शिफारस करण्यात आली आहे.
2. या केंद्रांवर कोणता नियम लागू करण्यात आला आहे?
सेतू सेवा केंद्र आणि आपले सरकार सेवा केंद्रांना एकसमान कॉमन ब्रँडिंग करणे तसेच आवश्यक पायाभूत सुविधांची माहिती सेल्फ रिपोर्टिंग फॉर्ममध्ये अपलोड करणे बंधनकारक आहे.
3. केंद्रचालकांना यापूर्वी सूचना देण्यात आल्या होत्या का?
होय. केंद्रचालकांना वेळोवेळी सूचना, प्रशिक्षण आणि मार्गदर्शन देण्यात आले होते.