बिजवाई सोयाबीनला ८ हजारावर भाव! 
अमरावती

बिजवाई सोयाबीनला ८ हजारावर भाव! चार वर्षांनंतर सोयाबीनला सोन्याची झळाळी; शेतकऱ्यांना दिलासा

शेतकऱ्यांकडे विक्रीसाठी मालच शिल्लक नसल्याने आणि दुसरीकडे बिजवाई सोयाबीनला ८ हजार रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत असल्याने बाजारात तेजीचे वातावरण कायम आहे. चार वर्षांनंतर सोयाबीनला असा समाधानकारक भाव मिळाल्याने उमरखेड व यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर काहीसे समाधान दिसू लागले आहे.(फोटो सौजन्य – istock)

सुरुची कदम

निसर्गाच्या लहरीपणामुळे यंदा उत्पादनात मोठी घट होऊन आर्थिक संकटात सापडलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना बाजारभावातील तेजीमुळे मोठा दिलासा मिळाला आहे. तब्बल ४ वर्षांनंतर सोयाबीनच्या दराने साडेसात हजार रुपये प्रतिक्विंटलचा टप्पा ओलांडला आहे. बिजवाई सोयाबीनला थेट आठ हजार रुपयांपर्यंत भाव मिळत आहे. त्यामुळे उत्पादनाने मारले, पण भावाने सावरले अशी भावना बळीराजा व्यक्त करत आहे.

यंदाच्या खरीप हंगामात सुरुवातीला पेरणी झाल्यानंतर पिकांची वाढ चांगली होती. मात्र, ऐन शेंगा भरण्याच्या अवस्थेत पावसाने दीर्घकाळ दडी मारल्याने यवतमाळ जिल्ह्यासह उमरखेड परिसरातील पिकांची वाढ खुंटली. अनेक शेतांत शेंगा लागल्या, परंतु पाण्याअभावी त्यात दाणेच भरले नाहीत. परिणामी, एकरी अवघे दोन ते अडीच क्विंटलच्या आसपास उत्पादन हाती आल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले होते.

गतवर्षी सोयाबीनला साधारणतः

४ हजार ३०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळत असल्याने उत्पादन खर्चही निघणे कठीण झाले होते. मात्र, यंदा बाजारातील चित्र पूर्णपणे बदलले आहे. साध्या सोयाबीनला ७ हजार ४०० ते ७ हजार ७०० रुपयांपर्यंत भाव मिळत आहे, तर ९३०५ आणि ११३५ या वाणांना ७ हजार ६५० ते ८ हजार १८५ रुपयांपर्यंत दर मिळत असल्याचे चित्र बाजारपेठेत आहे. सध्या बाजारपेठेत सोयाबीनची आवक मोठ्या प्रमाणात घटली आहे. अनेक शेतकऱ्यांकडे विक्रीसाठी मालच शिल्लक नसल्याने आणि दुसरीकडे बिजवाई सोयाबीनला ८ हजार रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत असल्याने बाजारात तेजीचे वातावरण कायम आहे.

सध्या शेतकरी द्विधा मनःस्थितीत

चार वर्षांनंतर सोयाबीनला असा समाधानकारक भाव मिळाल्याने उमरखेड व यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर काहीसे समाधान दिसू लागले आहे. मात्र, हातात मालच कमी असल्याने दरवाढीचा आनंद साजरा करावा की उत्पादनातील घटीचे दुःख व्यक्त करावे, अशा द्विधा मनःस्थितीत सध्या शेतकरी आहेत.

Iran : इराणची युद्धनीती जगात भारी! अमेरिकेला मात देण्यासाठी वापरले इलॉन मस्कचेच तंत्रज्ञान; स्टारलिंकचा वापर करून उडवले US Air Base

म्युझिक लव्हर्सना गिफ्ट द्यायचंय? हेडफोनपासून स्पीकरपर्यंत... 'हे' गॅझेट्स ठरतील बेस्ट पर्याय

डिलिमिटेशनला पाठिंबा दिल्याने राष्ट्रवादी शरद पवार गटात नाराजी; 'या' बड्या नेत्याने दिला राजीनामा

IND vs NZ: किवींनी भारताचा खेळ बिघडवला! तिसऱ्या दिवशी न्यूझीलंडचा दबदबा; दुसऱ्या कसोटीत टीम इंडिया बॅकफूटवर

Sainik School Bharti : १०वी उत्तीर्ण ते पोस्ट ग्रॅज्युएटसाठी सुवर्णसंधी! सैनिक स्कूलमध्ये 'या' पदांवर भरती सुरू