महाराष्ट्र

पुण्याहून लातूरला परीक्षेसाठी आलेल्या मुलीवर अत्याचार; आरोपीला अटक

पुणे येथे वास्तव्यास असणाऱ्या एका कुटूंबातील युवती लातूरात शिक्षण घेत होती. महिनाभरापूर्वी ती पुण्याहून लातूरला परिक्षेसाठी आली. यावेळी ती तिच्या आत्याच्या घरी मुक्कामी होती. या काळात आत्याच्या पतीने तिच्यावर अत्याचार केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली असून संशयित आराेपीस अटक करण्यात आली आहे. 

ज्ञानेश्वर मोरे

लातूर : पुणे येथे वास्तव्यास असणाऱ्या एका कुटूंबातील युवती लातूरात शिक्षण घेत होती. महिनाभरापूर्वी ती पुण्याहून लातूरला परिक्षेसाठी आली. यावेळी ती तिच्या आत्याच्या घरी मुक्कामी होती. या काळात आत्याच्या पतीने तिच्यावर अत्याचार केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली असून संशयित आराेपीस अटक करण्यात आली आहे.

विवेकानंद चौक पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित मूलगी इयत्ता १२ वीची परिक्षा देण्यासाठी लातूर येथे तिच्या आत्याच्या घरी आली हाेती. १२ फेब्रुवारीस संबंधित मुलगी मध्यरात्री झोपेत असताना तिच्यावर अत्याच्या पतीने अत्याचाराचा प्रयत्न केला. परंतु पिडीत मुलीने विरोध केल्यामुळे त्याने तिची माफी मागितली. त्यानंतर ३ मार्चला दुपारी अडीचला ती घरात एकटी असताना त्याने तिच्यावर अत्याचार केला.

दरम्यान या घटनेनंतर मुलगी पुणे येथे गेली. तिने आईला घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर आईने तिच्यासमवेत लातूर येथे मंगळवारी विवेकानंद चौक पोलिसांत संबंधित संशयित आराेपी विरुद्ध तक्रार दिली. त्यानूसार त्याला अटक करण्यात आली आहे.

Delhi Jama Masjid : दिल्लीतील जामा मशिद पोलीस ठाण्यात पाच पोलिसांवर चाकूने हल्ला; आरोपीच्या पायावर गोळी झाडत केली अटक

Gold Imports Drop : PM Modi यांच्या आवाहनाचा मोठा परिणाम? सोन्याच्या आयातीत तब्बल 40 % घट; 7 महिन्यांत 1.53 लाख कोटींची बचत

Maharashtra Recruitment Exam: पेपरफुटी करणाऱ्यांना १० कोटींचा दंड, १० वर्षे कारावास; भरती परीक्षांसाठी सरकारचा कठोर ॲक्शन प्लॅन

Leopard Attack in Assam:बिबट्याचा थरारक हल्ला कॅमेऱ्यात कैद; वनविभागाच्या बचावकार्यात मोठी दुर्घटना

IND A vs UAE : गोलंदाजांना सुर गवसेना, युएईचं भारताला 250 धावांचं आव्हान