फोटो -टीम नवराष्ट्र  
महाराष्ट्र

खंबाटकी घाटात वाहनांची मोठी वाहतूक कोंडी! खंडाळ्यापर्यंत लागल्या वाहनांच्या रांगा

गणेशोत्सवामुळे गावी जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या वाढली आहे. शनिवार रविवार अशी लागून सुट्ट्या आल्यामुळे अनेकांनी गावी जाण्याचा प्लॅन केला आहे. मात्र यामुळे खंडाळ्यामध्ये मोठे ट्राफिक जॅम झाले आहे,

प्रीति माने

खंडाळा : सध्या राज्यभर गणेशोत्सवाची धुमधाम आहे. सर्वत्र गणरायाचे जल्लोषामध्ये स्वागत केले जात आहे. तसेच गणेशोत्सवामुळे चाकरमानी गावाकडे परतू लागले आहेत. घाट रस्त्यावर बंद पडलेली वाहने अणि महामार्गावर वाहनांची वाढती वर्दळ,यामुळे खंबाटकी घाटात मध्यरात्रीपासून वाहतूक कोंडी झाली.दरम्यान,पारगाव-खंडाळ्यापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्याचे दिसून आले.

अधिक माहितीनुसार, शनिवार,रविवारी असणाऱ्या सलग सुट्ट्यांमुळे मुंबई,पुण्याला असलेले चाकरमानी उत्सवासाठी गावाकडे परतू लागले आहेत.त्यामुळे अशियाई महामार्गावर वाहनांची वर्दळ अधिक असल्याचे दिसून येते.शुक्रवारी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास दोन अवजड वाहने बंद पडल्याचे सांगण्यात आले.बंद पडलेली वाहने अणि वाहनांची वाढती संख्या यामुळे खंबाटकी घाट पुन्हा जाम झाला.

वाहतूक विस्कळीत झाल्याने अनेक पर्यटक,प्रवासी चाकरमानी सुमारे अठरा तास खोळंबल्याची माहीती मिळत आहे.तर काही वेळ बोगदा मार्गे वाहतूक सुरू करण्यात आली होती.सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास वाहतूक पूर्ववत काही अंशी वाहतूक सुरळीत करण्यात यश आले.दरम्यान, क्रेनच्या सहाय्याने वाहने बाजूला करण्यात आली.

यावेळी खंडाळ्याचे पोलीस निरीक्षक सुनिल शेळके, सहाय्यक पोलीस फौजदार राजू अहिरराव,संजय पोळ,प्रकाश फरांदे, संजय जाधव,अमित चव्हाण,श्रीकांत भोसले,महामार्ग पोलीस ए.पी.आय वर्षा शिंदे,पी.एस.आय शाम गोरड,प्रकाश घनवट,सहाय्यक फौजदार अविनाश डेरे,किशोर नलवडे, मिथून मोरे,विजय बागल,रविद्र वाघमारे, प्रमोद फरांदे,हेमंत ननावरे,मनोज गायकवाड,संतोष कचरे यांनी वाहतूक पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न केले.मात्र महामार्गावर वाहनांची संख्या अधिक असल्याचे दिसून येते होते.

Mumbai News: भारतावर अतिवृष्टी, पूर आणि दुष्काळाचे संकट! महाराष्ट्रात दुष्काळ परिस्थितीची चिन्हे

मिनी महाबळेश्वर गारठलं! तापमान थेट एकेरी अंकात; पर्यटकांचा ओढा वाढला

Kolhapur Drink and Drive: कोल्हापुरात मद्यधुंद कारचालकाने दोघा भावांना चिरडले; गोकुळच्या माजी अध्यक्षांच्या मुलाला अटक

जुन्या कॅसेटला मिळाली नवी ओळख! 44 वर्षांपूर्वी फ्लॉप झालेलं गाणं GTA 6 मुळे पुन्हा ट्रेंडमध्ये

Bajra Soup: थंडीच्या दिवसांमध्ये सकाळच्या नाश्त्यात करा बाजरीच्या सूपचा समावेश, पित्ताच्या त्रासापासून मिळेल सुटका