Sambhajinagar Mohalla Library फोटो सौजन्य सोशल मिडिया  Sambhajinagar Mohalla Library फोटो सौजन्य सोशल मिडिया
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar Mohalla Library : ‘मुलांनी मनाच्या भाषेत वाचायला शिकावे’; ब्रिटिश संशोधक मॅटी थर्ले यांचे मत

संभाजीनगरातील रीड अँड लीड फाउंडेशनच्या ‘मरियम मिर्झा मोहल्ला बाल पुस्तकालय अभियाना’ची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेतली जात आहे. ब्रिटनमधील जोनाथन थर्ले आणि मॅटी थर्ले या दाम्पत्याने बायजीपुरा येथील डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम मोहल्ला बाल वाचनालयाला भेट देऊन उपक्रमाचे कौतुक केले.

sanman jadhav
  • जोनाथन थलें आणि मॅटी थलें यांनी वाचनालयाच्या पुस्तकांची पाहणी केली

  • मुले जिथे सहजपणे पुस्तकांपर्यंत पोहोचू शकती

  • 'उर्दू'वर पीएचडी करणार मॅटी थर्ले

Sambhajinagar Mohalla Library : छत्रपती संभाजीनगरात रीड अँड लीड फाउंडेशनच्या वतीने शहरात सुरू असलेल्या 'मरियम मिर्झा मोहल्ला बाल पुस्तकालय अभियाना'ची दखल आता आंतरराष्ट्रीय स्तरावरही घेतली जात आहे. ब्रिटनमधून आलेल्या जोनाथन थलें आणि मॅटी थर्ले या दाम्पत्याने बायजीपुरा, गल्ली क्रमांक २० येथील 'डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम मोहल्ला बाल वाचनालया'ला भेट दिली. विशेष म्हणजे, 'मरियम मिर्झा मोहल्ला बाल पुस्तकालय अभियाना' अंतर्गत सुरू झालेले हे पहिलेच वाचनालय असून, येथील उपक्रम पाहून या ब्रिटिश पाहुण्यांनी या कार्याचे कौतुक केले.

जोनाथन थलें आणि मॅटी थलें यांनी वाचनालयाच्या पुस्तकांची पाहणी केली

फाउंडेशनचे अध्यक्ष मिर्झा अब्दुल कय्यूम नदवी यांनी या परदेशी पाहुण्यांचे पुस्तके भेट देऊन स्वागत केले. या अभियानाची सुरुवात, त्यामागील उद्दिष्टे तसेच शहरभरात सुरू असलेल्या वाचनालयांच्या जाळ्याबद्दल सविस्तर माहिती दिली. तसेच, छत्रपती संभाजीनगर येथून प्रकाशित होणारे 'अ न्यू चॅप्टर' हे काव्यविषयक मासिकही त्यांना भेट देण्यात आले.

या भेटीदरम्यान जोनाथन थलें आणि मॅटी थलें यांनी वाचनालयाच्या कपाटात मांडलेल्या पुस्तकांची पाहणी केली. आपले मनोगत व्यक्त करताना जोनाथन थर्ले म्हणाले की, ते यूकेहून आले असून एका छोट्याशा कपाटात सुमारे ५०० पुस्तके असलेले हे सुंदर वाचनालय पाहून त्यांना अत्यंत आनंद झाला आहे.

मुले जिथे सहजपणे पुस्तकांपर्यंत पोहोचू शकतील

मुले जिथे सहजपणे पुस्तकांपर्यंत पोहोचू शकतील, वाचनाचा आनंद घेऊ शकतील आणि आपल्या पालक व कुटुंबीयांसोबत गोष्टी शेअर करू शकतील, अशा सार्वजनिक ठिकाणी पुस्तके उपलब्ध करून देणे हा एक अतिशय स्तुत्य आणि प्रेरणादायी उपक्रम असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यांना अत्यंत आनंद झाला आहे. मुले जिथे सहजपणे पुस्तकांपर्यंत पोहोचू शकतील, वाचनाचा आनंद घेऊ शकतील आणि आपल्या पालक व कुटुंबीयांसोबत गोष्टी शेअर करू शकतील, अशा सार्वजनिक ठिकाणी पुस्तके उपलब्ध करून देणे हा एक अतिशय स्तुत्य आणि प्रेरणादायी उपक्रम असल्याचे त्यांनी नमूद केले.

'उर्दू'वर पीएचडी करणार मॅटी थर्ले

दरम्यान, उर्दूच्या समाजभाषा विज्ञानावर पीएचडी सुरू करणार असलेल्या आणि सध्या छत्रपती संभाजीनगर येथे संशोधन करत असलेल्या मॅटी थलें यांनी वाचनालयात उर्दू, हिंदी आणि मराठी भाषांतील पुस्तकांची विविधता पाहून आनंद व्यक्त केला. मुलांनी सर्वप्रथम त्यांच्या 'हार्ट लँग्वेज'मध्ये म्हणजेच घरच्या आणि मनाच्या भाषेत वाचायला शिकले पाहिजे, असे सांगत पुस्तकांचा हा विविधरंगी संग्रह मुलांसाठी अत्यंत उपयुक्त आणि आनंददायी ठरेल, असे त्या म्हणाल्या.

MSRTC: एसटी महामंडळाचा विद्यार्थ्यांसाठी नवा प्लॅन! आता शाळा-महाविद्यालयांच्या बस धावणार विनावाहक

AI Smart Glasses म्हणजे काय? चष्म्यातून कॉल, फोटो आणि AI ची मदत?

महिंद्राची नवी BE 07 इलेक्ट्रिक SUV पुढील वर्षी होणार लॉन्च; जाणून घ्या खास फीचर्स आणि महत्त्वाची माहिती

MSRTC Electric Bus Project: इलेक्ट्रिक बसमुळे एसटी आर्थिक संकटात; प्रतिकिलोमीटर २० ते २५ रुपये अनुदान द्या, अन्यथा प्रकल्प बंद करा!

पिंपरी-चिंचवडमध्ये विकासकामांना गती; स्थायी समितीच्या बैठकीत विविध प्रस्तावांवर शिक्कामोर्तब