काँग्रेसमधील अंतर्गत मतभेद समोर; स्वबळावर लढू म्हणणारे जगताप आता म्हणतात, 'हायकमांड ठरवेल...' (संग्रहित फोटो) 
महाराष्ट्र

महायुती सरकारविरोधात काँग्रेस आक्रमक; 'या' तारखेला करणार राज्यभर पिठलं भाकर आंदोलन

सरकारचा धिक्कार करण्यासाठी काँग्रेस पक्ष सोमवार दिनांक २० ऑक्टोबर रोजी राज्यभर शेतकऱ्यांसोबत पिठलं, भाकरी व ठेचा खाऊन आंदोलन करणार आहे.

ज्ञानेश्वर मोरे
  • पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान
  • शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्याची गरज
  • काँग्रेस पक्ष सरकारविरोधात करणार राज्यभर आंदोलन

मुंबई : गेल्या काही दिवसापासून राज्यात मुसळधार पाऊस पडला आहे. या मुसळधार पावसामुळे अतिवृष्टी आणि वादळामुळे मराठवाड्यासह विविध भागातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास मातीमोल झाला असून बळीराजावर संकट कोसळलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना तातडीने मदतीची गरज आहे. अशातच आता शेतकऱ्यांसाठी काँग्रेस पक्ष आक्रमक झाला आहे. सरकारचा धिक्कार करण्यासाठी काँग्रेस पक्ष सोमवार दिनांक २० ऑक्टोबर रोजी राज्यभर शेतकऱ्यांसोबत पिठलं, भाकरी व ठेचा खाऊन आंदोलन करणार आहे.

राज्यातील बळीराजावर यावर्षी मोठे संकट ओढवले आहे. शेतकरी उद्ध्वस्थ झाला असताना त्याला भरीव पॅकेज व कर्जमाफी देण्याची आवश्यकता होती. परंतु सरकारने जाहीर केलेले पॅकेज अत्यंत तुटपुंजे आहे आणि जे जाहीर केले तेही शेतकऱ्यांना अद्याप मिळालेले नाही. जगाचा पोशिंदा बळीराजावर काळी दिवाळी करण्याची वेळ आहे आणि या परिस्थितीला शेतकरी विरोधी महायुती सरकारच जबाबदार आहे. भाजपा महायुती सरकारचा धिक्कार करण्यासाठी काँग्रेस पक्ष राज्यभर शेतकऱ्यांसोबत पिठलं, भाकरी व ठेचा खाऊन आंदोलन करणार आहे, अशी माहिती काँग्रेस पक्षाने दिली.

अतिवृष्टीने राज्यातील ३० जिल्ह्यातील ३५० तालुक्यात सर्व वाहून गेले आहे. लाखो एकर शेतीचे नुकसान झाले आहे. हेक्टरी ५० हजार रुपये, जमीन खरडून गेली त्यासाठी हेक्टरी ५ लाख रुपये व कर्जमाफी करण्याची मागणी काँग्रेस पक्षाने लावून धरली होती पण भाजपा महायुती सरकारने जुन्याच योजनांची गोळाबेरीज करून ३२ हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले, पण हे पॅकेज फसवे निघाले आहे. शेतकऱ्यांना दिवाळीच्या आधी मदत देण्याचे आश्वासनही फेल गेले असून, सरकारचा निषेध करण्यासाठी काँग्रेस पक्ष शेतकऱ्यांबरोबर पिठलं भाकर आंदोलन करणार आहे. सर्व जिल्हे, तालुका व गावागावात हे आंदोलन केले जाणार असल्याची माहिती प्रदेश काँग्रेसने दिली आहे.

प्रदूषणाने पावसालाही रोखले? ढगांच्या निर्मिती प्रक्रियेत थेट...; समोर आला धक्कादायक खुलासा

Maruti Suzuki Cars Price Hike: मारुती सुझुकीच्या कार पुन्हा महागल्या! 2026 मधील चौथी दरवाढ, जाणून घ्या नव्या किंमती

Cute Viral Video : केस कापायला नकार, डोळ्यात पाणी अन् चेहऱ्यावर राग; चिमुकल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

Dharashiv Dance Competition : पुण्यात धाराशिवच्या कलाकारांचा डंका! 'रस रंग' ग्रुपची गरब्यात बाजी

सामाजिक संस्थांसाठी निधीची सुवर्णसंधी! कोणतेही परतफेडीचे बंधन न ठेवता Wadhwani Foundation देणार अनुदान; पाहा कोण करू शकते अर्ज