"आरोपीला उमेदवारी देऊन गुन्हेगारीला पाठबळ...", करुणा मुंडे यांचा भाजपावर घणाघात  
धाराशिव

Karuna Munde : "आरोपीला उमेदवारी देऊन गुन्हेगारीला पाठबळ...", करुणा मुंडे यांचा भाजपावर घणाघात

Karuna Munde On BJP : जामिनावर जेलबाहेर असलेल्या आरोपीला भाजपाने उमेदवारी देऊन गुन्हेगारीला पाठबळ दिले आहे, अशी टीका करुणा मुंडे यांनी भाजपावर केली आहे.

श्वेता झगडे
  • भाजपाने उमेदवारी देऊन गुन्हेगारीला पाठबळ
  • मोठमोठे भ्रष्टाचार केलेल्यांनाही मंत्री बनविण्यात आले
  • करुणा मुंडे यांचा भाजपावर घणाघात

धाराशिव : तुळजापूर नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा राजकीय धक्का आणि तितकाच वाद निर्माण करणारा निर्णय समोर आला आहे. ड्रग्स प्रकरणातील मुख्य आरोपी विनोद उर्फ पिटू गंगणे यांना अखेर भारतीय जनता पक्षाकडून अधिकृत उमेदवारी देण्यात आली आहे. याचपार्श्वभूमीवर करुणा मुंडे यांनी भाजपावर टिका केली आहे.

'नगराध्यक्ष हे पद मोठे पद आहे. मात्र या पदासाठी जामिनावर जेलबाहेर असलेल्या आरोपीला भाजपाने उमेदवारी देऊन गुन्हेगारीला पाठबळ दिले आहे." अशी घणाघाती टीका करुणा मुंडे यांनी गुरुवारी (२० नोव्हेंबर) तुळजापूर येथे केली आहे. तुळजाभवानी मातेचे दर्शन करून मंदिराबाहेर आल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांच्या सोबत तुळजापूर नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक येथून स्वराज शक्ती सेनेच्या वतीने एक उमेदवारी दाखल केलेले उमेदवार आणि अन्य उपस्थित होते.

मोठमोठे भ्रष्टाचार केलेल्यांनाही मंत्री बनविण्यात आले आहे. आता नगराध्यक्षपदासाठीही भाजपाने गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यास उमेदवारी दिली आहे. भाजपा घराणेशाही विरोधी असल्याचा गवगवा ते करतात. मात्र भाजपाने तुळजापूरमध्ये एकाच घराण्यातील सहा - सहा लोकांना उमेदवारी दिली आहे. हे कसली घराणेशाही मोडतात. अशी टीका त्यांनी यावेळी केली. तुळजाभवानी मातेने तेंव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना जशी तालावर दिली होती. त्याच पद्धतीने मलाही आशीर्वाद द्यावा की, राज्यातील भ्रष्टाचाराचा डोंगर मी उलथवून टाकू शकेन. असे मागणे आपण मातेच्या चरणी मागितले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

ड्रग्ज प्रकरणातील आरोपीला नगराध्यक्ष पदाची उमेदवारी जाहीर

गेल्या काही दिवसांपासून विविध दावेदारांची नावे चर्चेत असताना, शेवटच्या क्षणी सर्वच विरोधी उमेदवारांनी माघार घेतली. या नाट्यमय घडामोडीनंतर शहरात राजकीय चर्चेला उधाण आले आहे. माजी नगराध्यक्ष संतोष परमेश्वर कदम हे ड्रग्ज प्रकरणातील आरोपी आहे. भाजपमध्ये त्यांचा प्रवेश झाला त्यावेळी विरोधकांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या होत्या. आता देखील भाजपने तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील आरोपी विनोद गंगणे यांना भाजपाकडून थेट नगराध्यक्ष पदाची उमेदवारी जाहीर करण्यात आली असून यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. ड्रग्ज प्रकरणात तुरुंगात जाऊन सध्या जामिनावर बाहेर असलेल्या गंगणे यांचा राजकीय प्रवास पुन्हा चर्चेत आला आहे.

Health tips: सतत जंक फूड खाताय? वेळीच व्हा सावध! शरीराला होऊ शकतात 'हे' गंभीर आजार

उत्तर प्रदेशात जागावाटपावरून काँग्रेस-समाजवादी पक्षात संघर्ष; अखिलेश यादवांचं 'ते' विधान चर्चेत

Mahabharat Katha: शिखंडी कोण होता? अंबाचा पुनर्जन्म आणि भीष्मांच्या पतनाची रंजक कथा जाणून घ्या

Gokul Milk Union Hearing : गोकुळ सत्तासंघर्षावर हायकोर्टात सुनावणी! न्यायालयाने महायुतीच्या वकिलांना सुनावले

Cairo Fire : कैरो रिंग रोडवर आगीचे तांडव! इंधन टँकर उलटून भीषण स्फोट; 31 जणांचा मृत्यू, अनेक वाहने जळून खाक