Washim VB G RAM G Fodder Scheme Washim VB G RAM G Fodder Scheme
महाराष्ट्र

वाशिममध्ये चारा टंचाई रोखण्यासाठी प्रशासनाचा मोठा निर्णय; 'व्हीबी-जी रामजी' योजनेंतर्गत ४९१ ग्रामपंचायतींमध्ये लागवड

Washim VB G RAM G Scheme: 'व्हीबी-जी रामजी' योजनेंतर्गत वाशिम जिल्ह्यातील ४९१ ग्रामपंचायतींमध्ये शेतकऱ्यांच्या शेतावर चारा लागवड करण्यात येणार आहे. चाऱ्याची गरज पूर्ण करण्यासाठी १२ हजार ३६६ एकर क्षेत्रावर चारा उत्पादनाचे नियोजन करण्यात आले आहे.

Priya M
  • शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी

  • 'व्हीबी-जी रामजी' योजनेतून चारा लागवडीला प्राधान्य

  • वाशिममधील ४९१ ग्रामपंचायतींमध्ये विशेष मोहीम

वाशिम: जिल्ह्यात चाऱ्याची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी 'विकसित भारत रोजगार आणि आजीविका हमी मिशन (ग्रामीण)' अर्थात 'व्हीबी-जी रामजी' योजनेंतर्गत वैयक्तिक शेतकऱ्यांच्या शेतावर चारा लागवड करण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील ४९१ ग्रामपंचायतींमध्ये ही कामे हाती घेण्याचे नियोजन असून, प्रत्येक ग्रामपंचायतीने सरासरी २० कामे हाती घ्यावीत, असे आवाहन पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभागाचे जिल्हा उपआयुक्त डॉ. तुषार बावणे यांनी केले आहे. जिल्ह्यातील पशुधनाची दैनंदिन तसेच आगामी काळातील चाऱ्याची गरज लक्षात घेता चारा उत्पादनात वाढ करणे आवश्यक आहे.

जिल्ह्यातील पशुधनासाठी एकूण १ लाख ८ हजार मेट्रिक टन कोरड्या चाऱ्याची गरज असून, ही गरज पूर्ण करण्यासाठी १२ हजार ३६६ एकर क्षेत्रावर चारा लागवड करणे आवश्यक आहे. यापैकी पशुसंवर्धन आणि कृषी विभागामार्फत ३ हजार ३१९ एकर क्षेत्रासाठी बियाण्यांचे वाटप करण्यात आले आहे. उर्वरित क्षेत्रावर चारा पेरणी करण्यासाठी ६९ हजार १८८ किलो बियाण्यांची आवश्यकता भासणार आहे.

'व्हीबी-जी रामजी' योजनेंतर्गत जनावरांसाठी चारा उत्पादनाला विशेष प्राधान्य देण्यात आले आहे. शासन निर्णयानुसार चारा पिकांच्या लागवडीची कामे पशुसंवर्धन विभाग, कृषी विभाग आणि ग्रामपंचायत या तीन यंत्रणांमार्फत राबविण्यात येणार आहेत. पशुसंवर्धन विभागामार्फत कामे सुरू असतानाच ग्रामपंचायत आणि कृषी विभागाच्या पुढील महिनाभरात यंत्रणांनाही चारा लागवडीची कामे सुरू करता येणार आहेत.

ग्रामपंचायत-कृषी विभागाचा समन्वय

जून २०२७ पर्यंत जिल्ह्यात चाऱ्याची टंचाई निर्माण होऊ नये, यासाठी वैयक्तिक तसेच सामूहिक जमिनीवर जास्तीत जास्त क्षेत्रात चारा लागवड करणे आवश्यक आहे. यासाठी ग्रामपंचायत आणि कृषी विभागाच्या यंत्रणांनी परस्पर समन्वयातून कार्यवाही करावी. प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये कृषी विभागाच्या कार्यान्वयीन यंत्रणेमार्फत किमान ५ ते ७ अर्ज घेण्यात यावेत. सर्व संबंधित यंत्रणांनी एकत्रित नियोजन करून चारा लागवडीची कामे प्रभावीपणे पूर्ण केल्यास जिल्ह्यात चाऱ्याची टंचाई टाळणे शक्य होईल, असेही जिल्हा उपआयुक्त डॉ. बावणे यांनी सांगितले.

Satara News: साताऱ्यात सूर्यकिरण एअर शोमुळे ६ तास ट्रॅफिक बंद! कोणते रस्ते बंद, पर्यायी मार्ग पाहा

Pratapgad News : संविधान दिनी प्रतापगडावर स्वच्छता-संवर्धन महाअभियान; राज्यातील ११ किल्ल्यांवर एकाच वेळी उपक्रम

WTC मध्ये मोठी उलथापालथ! आफ्रिकेने बांग्लादेशला लोळवले पण फायदा 'या' संघाला; भारताचे काय होणार?

बोगस दिव्यांगत्वाचा लाभ घेणाऱ्या ५ शिक्षकांवर निलंबनाची कारवाई; आतापर्यंत घेतलेल्या सुविधांची होणार वसुली

Buldhana: बुलढाण्यातील महिला उद्योजिकांसाठी आनंदाची बातमी; घरगुती उत्पादनांना मिळणार नवी ओळख, प्रतापराव जाधवांची मोठी घोषणा