महाराष्ट्र

'मीच कुठंतरी कमी पडलो'; कसबा पोटनिवडणुकीतील पराभवावर भाजपच्या रासनेंचे विधान

कसबा (Kasba Peth Bypoll) विधानसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी पूर्ण झाली असून, यामध्ये महाविकास आघाडीच्या रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांचा मोठ्या मताधिक्याने विजय झाला. तर भाजप उमेदवार हेमंत रासने (Hemant Rasane) यांचा पराभव झाला.

कृपादान आवळे

पुणे : कसबा (Kasba Peth Bypoll) विधानसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी पूर्ण झाली असून, यामध्ये महाविकास आघाडीच्या रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांचा मोठ्या मताधिक्याने विजय झाला. तर भाजप उमेदवार हेमंत रासने (Hemant Rasane) यांचा पराभव झाला. या पराभवानंतर हेमंत रासने यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली असून, त्यांनी हा पराभव स्वीकारला आहे. मी कुठं कमी पडलो ते मी पाहीन, मला आत्मचिंतन करावं लागणार आहे, असे ते म्हणाले.

संपूर्ण राज्याचं लक्ष वेधून घेतलेल्या कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी आज सकाळपासून सुरु झाली. यामध्ये कसबा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर विजयी झाले आहेत. कसब्यात रवींद्र धंगेकरांचा 11 हजार 040 मतांनी विजय झाला तर हेमंत रासनेंना 61,771 मते मिळाली आहेत. धंगेकर यांना एकूण ७२ हजार ५१९ मते मिळाली आहेत, तर हेमंत रासने यांना ६१७७१ एकूण मते मिळाली आहेत. या पराभवानंतर हेमंत रासने यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. यामध्ये त्यांनी म्हटले की, 'मी बुथवाईज आकडेवारी पाहिली. त्यानंतर, सर्व गोष्टीचं बारकाईनं विश्लेषण करेन. मात्र, मी कुठे कमी पडलो ते मी पाहीन. मला आत्मचिंतन करावं लागेल'.

निकाल स्वीकारतो

तसेच रासने पुढे म्हणाले, 'पक्षाने मला उमेदवारी दिली, माझ्यावर विश्वास दर्शवला, सर्व यंत्रणा माझ्यासाठी काम करत होती. मात्र, केवळ मी उमेदवार म्हणून कमी पडलो. जो निकाल लागला त्याचा मी स्विकार करतो'.

Mumbai News: भारतावर अतिवृष्टी, पूर आणि दुष्काळाचे संकट! महाराष्ट्रात दुष्काळ परिस्थितीची चिन्हे

मिनी महाबळेश्वर गारठलं! तापमान थेट एकेरी अंकात; पर्यटकांचा ओढा वाढला

Kolhapur Drink and Drive: कोल्हापुरात मद्यधुंद कारचालकाने दोघा भावांना चिरडले; गोकुळच्या माजी अध्यक्षांच्या मुलाला अटक

जुन्या कॅसेटला मिळाली नवी ओळख! 44 वर्षांपूर्वी फ्लॉप झालेलं गाणं GTA 6 मुळे पुन्हा ट्रेंडमध्ये

Bajra Soup: थंडीच्या दिवसांमध्ये सकाळच्या नाश्त्यात करा बाजरीच्या सूपचा समावेश, पित्ताच्या त्रासापासून मिळेल सुटका