महाराष्ट्र

ना संजयकाका, ना चंद्रहार सांगलीत विशालच 'पाटील'; तब्बल एक लाख मतांनी संजयकाकांचा पराभव

महाविकास आघाडीच्या नेत्याचा विरोध झुगारून विजय विजय मिळवून सर्वांनाच धक्का दिला. त्यांनी भाजपचे उमेदवार संजयकाका पाटील आणि महाविकास आघाडीचे चंद्रहार पाटील यांना पराभूत करत 1 लाख 259 मतांनी विजय मिळविला.

कृपादान आवळे

सांगली / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : संपूर्ण राज्याचे लक्ष असलेल्या सांगली लोकसभा मतदारसंघात (Sangli Lok Sabha) काँग्रेसचे अपक्ष उमेदवार विशाल पाटील (Vishal Patil) यांनी बंद दरवाजा फोडून दिल्लीत एंट्री केली. दहा वर्षे काबीज केलेला भाजपचा गड हिसकावून घेण्यात विशाल पाटील यांना यश आले.

महाविकास आघाडीच्या नेत्याचा विरोध झुगारून विजय मिळवून सर्वांनाच धक्का दिला. त्यांनी भाजपचे उमेदवार संजयकाका पाटील आणि महाविकास आघाडीचे चंद्रहार पाटील यांना पराभूत करत 1 लाख 259 मतांनी विजय मिळविला. या पराभवाने संजयकाकांची हॅट्रिक हुकली. महाविकास आघाडीचे चंद्रहार यांना डिपॉझिटही वाचवता आले नाही. त्यांच्यासह 18 जणांचे डिपॉझिट जप्त झाले. काँग्रेसचे अपक्ष 'विशाल' विजयाने त्यांच्या समर्थकांनी काँग्रेस कार्यालयासह जिल्ह्याच्या विविध भागात आतिषबाजी आणि गुलालाची उधळण करत मोठ्या प्रमाणात जल्लोष व्यक्त केला.

सांगली-मिरज रोडवरील सेंट्रल वेअर हाऊसमध्ये सकाळी साडेआठ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी व निवडणूक निरीक्षक बी. परमेश्वरम यांनी मतमोजणी सुरू करण्याचे आदेश दिल्यानंतर पोस्टल, मतदान यंत्रासह व्हीव्हीपॅटची कडक बंदोबस्तात मोजणी सुरू झाली.

दरम्यान, लोकसभेसाठी 7 मे रोजी मतदान झाले होते. भाजपकडून विद्यमान खासदार संजयकाका पाटील, महाविकास आघाडीचे चंद्रहार पाटील आणि काँग्रेसचे विशाल पाटील यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. त्यांच्यासह 20 उमेदवार रिंगणात होते.

निवडणुकीत 62.27 टक्के मतदानाची नोंद झाली होती. 18 लाख 68 हजार 174 मतदारांपैकी 11 लाख 63 हजार 353 मतदारांनी मतदान केले. सन 2019 च्या तुलनेत 3 टक्क्यांनी मतदान घटले होते. त्यामुळे कमी मतदानाचा टक्का कुणाला धक्का देणार याबाब प्रचंड उत्सुकता होती.

महाविकास आघाडीत ठाकरे गटाने परस्पर चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिल्याने निवडणुकीत चांगलाच रंग भरला होता. काँग्रेस हद्दपार होण्याच्या चर्चेने विशाल यांना बंडाचा झेंडा हाती घ्यावा लागला. त्यामुळे महाविकास आघाडीत फूट पडल्याने चंद्रहार एकाकी पडले.

दुसरीकडे संजयकाकांना पक्षांतर्गत संघर्ष करावा लागला. त्याचा परिणाम निकालात दिसून आला. जत विधानसभा मतदारसंघ वगळता सांगली, मिरज, पलूस-कडेगाव, तासगाव-कवठेमहांकाळ, खानापूर-आटपाडी या पाच मतदारसंघात विशाल पाटील यांनाच मताधिक्य मिळाले.

सांगलीत उमेदवारनिहाय मिळालेली मत

विशाल पाटील अपक्ष 5,69,651

संजयकाका पाटील भाजप 4,69,392

चंद्रहार पाटील उबाठा 60,155

टिपूसुलतान पटवेगार बसपा 5,502

महेश खराडे स्वाभिमानी 5,491

आनंद नलगे बळीराजा पार्टी 3,531

सतिश कदम हिंदुस्थान पार्टी 2,851

प्रकाश शेंडगे अपक्ष 8,150

नोटा 6,512

Mumbai News: भारतावर अतिवृष्टी, पूर आणि दुष्काळाचे संकट! महाराष्ट्रात दुष्काळ परिस्थितीची चिन्हे

मिनी महाबळेश्वर गारठलं! तापमान थेट एकेरी अंकात; पर्यटकांचा ओढा वाढला

Kolhapur Drink and Drive: कोल्हापुरात मद्यधुंद कारचालकाने दोघा भावांना चिरडले; गोकुळच्या माजी अध्यक्षांच्या मुलाला अटक

जुन्या कॅसेटला मिळाली नवी ओळख! 44 वर्षांपूर्वी फ्लॉप झालेलं गाणं GTA 6 मुळे पुन्हा ट्रेंडमध्ये

Bajra Soup: थंडीच्या दिवसांमध्ये सकाळच्या नाश्त्यात करा बाजरीच्या सूपचा समावेश, पित्ताच्या त्रासापासून मिळेल सुटका