महाराष्ट्र

खंडाळा - पुणे - सातारा महामार्गावर वाहतूक कोंडीमुळे वाहनधारकांना मनस्ताप, एक ट्रक घाटामध्ये पडला बंद

बोगदया मार्गे पुण्याला जाणारा रस्ता ही जाम होता. यावेळी एस कॉर्नर वर ट्रक ला दोन गाड्या घासल्या.

शुभांगी मेरे

खंडाळा - पुणे - सातारा : आज सकाळी सात वाजल्यापासून खंबाटकी घाटात कासव गतीने वाहतूक सुरु आहे. खंडाळा - पुणे - सातारा महामार्गावरील खंबाटकी घाटात दोन्ही बाजुने आज सकाळ पासुन वाहतूक कोंडी मुळे प्रचंड मनस्ताप चा सामना वाहनधारकांना करावा लागला. वाहतूक पोलीस व खंडाळा पोलीस सकाळ पासून पहारा देत आहेत. यासंदर्भात असे सांगितले जात आहे की, सलग सुट्ट्या मिळाल्यामुळे महामार्गावर वाहनांची मोठी संख्या आहे. परिणामी सकाळी घाट मार्गात वाहनांची गती कमी करावी लागली.

ट्रक आणि जड वाहने रस्त्यावर असल्यामुळे वाहतूक कोंडी होतच गेली आहे. परिणामी पोलिसांनी मोठी जड वाहने घाट पायथ्याला थांबविली. दरम्यान खंबाटकी घाटमार्गे वाहतूक पाहुन अनेकांनी कॅनॉल वरून बोगद्यामार्गे उलट दिशेने वाहतुक वळवण्यात आली. यामुळे सकाळी १० वाजता पुण्याबाजुकडे जाणारी वाहतूक ही खोळंबली. याप्रकारे दोन्ही बाजुने हा घाट जाम राहिला. खंबाटकी घाटामध्ये सातारा बाजुकडे जाणाऱ्या गाड्या या अधिक काळ चालुच राहिल्याने गाड्या गरम झाल्या.

घाटामध्ये असलेल्या गाड्या बाजूला करण्यात आल्या त्यामुळे नंतर या गाड्या लावण्यासाठी जागाही अपुरी पडत होती. इतक्या गरम गाड्या होऊन बाजूला करण्यात आल्या होत्या. दरम्यान एक ट्रक ही घाटामध्ये बंद पडला आहे. तर बोगदया मार्गे पुण्याला जाणारा रस्ता ही जाम होता. यावेळी एस कॉर्नर वर ट्रक ला दोन गाड्या घासल्या. तसेच या रस्त्याचे काम सुरु असल्याने जागोजागी बॅरिकेटस असल्यामुळे वाहनांची कोंडी अधिक वाढली. तरी पुण्याकडुन येणारी वाहतूक लोणंद मार्गे वळवुन या रस्त्यावरील वाहने कमी करण्याची गरज अनेकांनी व्यक्त केली.

Mumbai News: भारतावर अतिवृष्टी, पूर आणि दुष्काळाचे संकट! महाराष्ट्रात दुष्काळ परिस्थितीची चिन्हे

मिनी महाबळेश्वर गारठलं! तापमान थेट एकेरी अंकात; पर्यटकांचा ओढा वाढला

Kolhapur Drink and Drive: कोल्हापुरात मद्यधुंद कारचालकाने दोघा भावांना चिरडले; गोकुळच्या माजी अध्यक्षांच्या मुलाला अटक

जुन्या कॅसेटला मिळाली नवी ओळख! 44 वर्षांपूर्वी फ्लॉप झालेलं गाणं GTA 6 मुळे पुन्हा ट्रेंडमध्ये

Bajra Soup: थंडीच्या दिवसांमध्ये सकाळच्या नाश्त्यात करा बाजरीच्या सूपचा समावेश, पित्ताच्या त्रासापासून मिळेल सुटका