मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राच्या जनतेचे आहेत. महाराष्ट्राच्या विकासाचं त्यांच्यासमोर लक्ष आहे. या कामासाठी दोघांनी वाहून घेतलं आहे. शिंदे साहेबांची शिवसेना आणि मोदी साहेबांचं भाजप आता एक होऊन आता महाराष्ट्राचा विकास करणार असं म्हणत भाजप नेते किरीट सोमय्या यांनी शिंदेच कौतुक केलं.
संजय राऊत आणि संजय पांडे या दोघांची प्रकरण आता लॉजिकल एन्डपर्यंत आलेली आहेत. सहा ऑगस्टला संजय राऊत यांना शिवडी कोर्टात उभ राहावं लागणार. संजय पांडे यांच्या कंपनीने नॅशनल स्टॉक एक्सचेंज च्या नागरिकांचे फोन टॅप केले. चार कोटी 44 लाख रुपये त्यांच्या कंपनीत जमा झाले. असा आयपीएस ऑफिसर अवैध कामे करतो त्याला ठाकरे सरकार पोलीस आयुक्त बनवतात. महावसुली सरकारपासून महाराष्ट्राची सुटका झाल. अशी घणाघाती टिका किरीट सोमय्या यांनी दिली आह.