File Photo : Farmers 
महाराष्ट्र

'लाडकी बहीण'नंतर आता लाडका शेतकरी योजना लागू करा; 'या' आमदाराने केली मागणी

 सततच्या पावसाने त्रस्त झालेले धारणी, चिखलदरा, अचलपूर, दर्यापूर, अंजनगाव सूर्जी, चांदूरबाजार, तिवसा, भातकुली, अमरावती तालुक्यातील गावागावातील नुकसानग्रस्त शेताची पाहणी केली. यावेळी या संततधार पावसाने जिल्ह्यातील पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास या अस्मानी संकटाने हिरावून घेतला आहे व शेतात पाणी साठले आहे.

कृपादान आवळे

अमरावती : राज्य सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चांगलीच पसंतीस उतरली आहे. महिलांचा या योजनेला मोठा पाठिंबा मिळत आहे. त्यानंतर आता शासनाने तातडीने ओला दुष्काळ जाहीर करून सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट मदत करावी. तसेच लाडकी बहिणी योजनेच्या धर्तीवर लाडका शेतकरी योजनाही सुरू करण्यात यावी, अशी मागणी आमदार रवी राणा यांनी केली आहे.

आमदार रवी राणा यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पीक नुकसानीची पाहणी केली. सततच्या पावसाने त्रस्त झालेले धारणी, चिखलदरा, अचलपूर, दर्यापूर, अंजनगाव सूर्जी, चांदूरबाजार, तिवसा, भातकुली, अमरावती तालुक्यातील गावागावातील नुकसानग्रस्त शेताची पाहणी केली. यावेळी या संततधार पावसाने जिल्ह्यातील पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास या अस्मानी संकटाने हिरावून घेतला आहे व शेतात पाणी साठले आहे.

सण उत्सावांच्या दिवसांत आपण कसे जगावे हा प्रश्न बळीराजापुढे निर्माण झाला आहे. या नैसर्गिक आपत्तीच्या प्रसंगी सरकारने ठामपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहावे, अशी मागणी आमदार रवी राणा यांनी यावेळी केली.

लाडका शेतकरी योजना सुरु करावी

शासनाने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. त्याच पद्धतीने शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी 'लाडका शेतकरी' योजना सुरू करावी, अशी मागणी सुद्धा करण्यात आली. शेतकऱ्यांनी धीर धरावा, खचून जाऊ नये, सरकार खंबीरपणे पाठीशी उभे राहील, असा विश्वास यावेळी शेतकऱ्यांना देऊन राणा यांनी मदत मिळवून देण्याचे अभिवचन दिले.

विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात पुरंदर विमानतळाचा मुद्दा गाजणार; भूसंपादन अधिकाऱ्यांवर तारांकित प्रश्न

Alice Huang : चीनचा मोठा 'AI' डाव उघड! कथित गुप्तहेर ॲलिस हुआंगच्या नेटवर्कला तब्बल 2491 कोटींचा निधी; अमेरिकेची मोठी कारवाई

Tata Group : Noel Tata विरुद्ध N Chandrasekaran वाद कोर्टात! बॉम्बे हायकोर्टात कायदेशीर लढाईची तयारी; काय निर्णय होणार?

Amravati News: ६९ गावांत १०% पाणीकपात! १ डिसेंबरपासून अंमलबाजावणी; उन्हाळ्यापूर्वीच उद्भवणार जलसंकट

Harshad Atkari: ५० ATKT अन् गावभर नापासाचे होर्डिंग्ज! हर्षद अतकरीने सांगितला भूमिकेमागचा भन्नाट किस्सा!