Photo Credit-Team Navrashtra लाडक्या बहिणींनींच्या 2100 रुपयांबाबत महत्त्वाची अपडेट; देवेंद्र फडणवीसांची स्पष्टचं सांगितलं 
मुंबई

Ladki Bahin Yojna Update: लाडक्या बहिणींनींच्या 2100 रुपयांबाबत महत्त्वाची अपडेट; देवेंद्र फडणवीसांची स्पष्टचं सांगितलं

वित्तमंत्री अजित पवार यांनी हा अर्थसंकल्प विधानसभेत मांडला. या अर्थसंकल्पात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी 2025-26 या आर्थिक वर्षात 36,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

anuradha sagar

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारचा पहिला अर्थसंकल्प काल सादर करण्यात आला. उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री अजित पवार यांनी हा अर्थसंकल्प विधानसभेत मांडला. या अर्थसंकल्पात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी 2025-26 या आर्थिक वर्षात 36,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मात्र, लाडकी बहीण योजनेसंदर्भातील सर्वसामान्य नागरिक आणि लाभार्थी ज्या घोषणेची प्रतिक्षा करत होते, ती घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आलेली नाही. योजनेच्या हप्त्याची रक्कम ₹1,500 वरून ₹2,100 करण्याचा निर्णय जाहीर केला जाईल, अशी अपेक्षा होती. मात्र, याबाबत अर्थसंकल्पात कोणतीही घोषणा न झाल्याने चर्चेला उधाण आले आहे.

यासंदर्भात महायुतीच्या प्रमुख नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ₹2,100 च्या हप्त्याविषयी विचारणा करण्यात आली. यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. या पत्रकार परिषदेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार देखील उपस्थित होते.

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी निधी कमी पडणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना आर्थिक स्वावलंबी करण्याचे नियोजन सरकारने केले असून, काही लाभार्थींनी या योजनेतील मदतीतून सोसायट्या स्थापन केल्या आहेत. पुढील टप्प्यात, या सोसायट्यांचे मोठे जाळे निर्माण करून राज्यस्तरीय ‘अपेक्स’ सोसायटी स्थापन करण्याचा सरकारचा मानस आहे.

₹2,100 च्या हप्त्यावर निर्णय कधी?

फडणवीस यांनी स्पष्ट केले की, कोणतीही योजना सुरू करताना आर्थिक गृहितके ठरवली जातात आणि प्रत्यक्ष खर्च वर्षभरानंतर स्पष्ट होतो. मागील वर्षीच्या ट्रेंडच्या आधारावर अर्थसंकल्पात तरतूद केली आहे. हप्त्याची रक्कम वाढवण्याची गरज वाटल्यास, त्याबाबत जुलै, डिसेंबर आणि मार्चमध्ये निर्णय घेतला जाईल.

फडणवीस म्हणाले, "₹2,100 च्या हप्त्यासंदर्भात काम सुरू आहे. मात्र, अर्थसंकल्पीय शिस्तही महत्त्वाची आहे. आपल्याला योजना शाश्वत ठेवायची असेल, तर आर्थिक शिस्त पाळावी लागेल. 3 टक्क्यांच्या वर जाता येणार नाही. मागील वर्षी हा दर 2.9% होता, जो 2.7% पर्यंत आणला आहे."

1500 रुपये एप्रिलमध्ये मिळणार, वाढीव हप्ता लवकरच - एकनाथ शिंदे

यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, "एप्रिल महिन्यात लाडक्या बहिणींना ₹1,500 मिळतील. जेव्हा सरकार अधिकृत घोषणा करेल, त्यानंतर ₹2,100 चा हप्ता दिला जाईल."

2024-25 आर्थिक वर्षात, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सुमारे 2 कोटी 53 लाख लाभार्थी महिलांना 33,232 कोटी रुपये निधीचे वाटप करण्यात आले.2025-26 आर्थिक वर्षासाठी, या योजनेसाठी 36,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. योजनेचा लाभ घेणाऱ्या महिला गटांना आणखी प्रोत्साहन देण्यासाठी सरकार विशेष योजना हाती घेणार असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान, एप्रिल महिन्यात लाडकी बहीण योजनेचा हप्ता 1,500 रुपये असणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Home decor: घरातील कोणत्या ठिकाणी कोणती झाडे लावावीत? हॉलपासून ते बाथरूमपर्यंत जाणून घ्या योग्य रोपांची निवड!

National Gymnastics Competition : पहिल्या दिवशी सर्व्हिसेस' आणि उत्तर प्रदेशच्या खेळाडूंचे वर्चस्व

Made In India उत्पादनांचा जागतिक डंका! Amazon ची भारतातून E-Commerce निर्यात 27 अब्ज डॉलर्सवर; 2030 पर्यंत 80 अब्ज डॉलर्सचे लक्ष्य

MarMarathi Theatre News : ‘एक तिची गोष्ट’चा रौप्यमहोत्सवी टप्पा! २५ प्रयोग पूर्ण, पंकज त्रिपाठींकडून कौतुकाची थाप

फक्त 6 रुपयांत बेड गरम? Heated Blanket चा वीज वापर जाणून घ्या!