फोटो सौजन्य सोशल मिडिया  
मुंबई

MNS Activists : मीरा रोड Zepto स्टोअर मॅनेजरवर महिला कर्मचाऱ्यांच्या छेडछाडीचे आरोप; मनसे कार्यकर्त्यांकडून मारहाण

MNS Activists : शिवार गार्डन परिसरातील Zepto स्टोअरचे मॅनेजर जय पाठक यांच्यावर महिला कर्मचाऱ्यांनी छेडछाड आणि अयोग्य शारीरिक वर्तन केल्याचे आरोप केले आहेत. महिला कर्मचाऱ्यांच्या तक्रारीनंतर मनसे कार्यकर्त्यांनी जय पाठक यांना मारहाण करून पोलिसांच्या ताब्यात दिल्याचे माहिती समोर येत आहे.

sanman jadhav
  • मनसेने कार्यकर्त्याकडून चांगला चोप 
  • जय पाठक आम्हाला शारिरीक रित्या अश्लिल वर्तन कारायचा  
  • पोलिस आता पुढील तपास करत आहेत 

MNS Activists : मीरा रोड येथील शिवर गार्डन परिसरात;  Zepto स्टोअरमधील जय पाठक या मॅनेजरला महिला कर्मचाऱ्यांची छेडछाड केल्याचा आरोप झाल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) कार्यकर्त्यांनी चांगला चोप दिला आहे. मीरा रोड येथे महिला कर्मचाऱ्यांनी अयोग्य वर्तनाचा आरोप केल्यानंतर, शुक्रवारी मनसे कार्यकर्त्यांनी 'क्विक-कॉमर्स' स्टोअरचा व्यवस्थापक जय पाठक याला मारहाण केल्याचा आरोप आहे. त्यानंतर त्यांनी त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले.

मनसेने कार्यकर्त्याकडून चांगला चोप

मिरा रोड शिवार गार्डन zepto येथे काम करणाऱ्या मुलींना जय पाठक स्टोर मॅनेजर याच्याकडून छेडछाड करणे हात लावणे मानसिक त्रास देण्याचं काम करत होता. मनसे कार्यकर्त्याकडून त्याला चांगला चोप देण्यात आला असून मिरा रोड कनकिया पोलीस स्टेशन मध्ये त्याच्या विषयी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आज एका मुलीची छेड काढली आहे; उद्या दुसऱ्यामुलींची छेड काढेल. अशी मनसे कार्यकर्त्यांनी zepto मध्ये काम करणाऱ्या मुलींना ताकीद दिली.

जय पाठक आम्हाला शारिरीक रित्या अश्लिल वर्तन कारायचा

आम्ही सर्व मुली स्टोर मध्ये पॅकिंगची कामे करतो. जय पाठक आम्हाला शारिरीक रित्या अश्लिल वर्तन कारायचा; आम्ही या आदी सुद्धा त्यांना बजावून सांगितले होते. आज आम्ही आमच्या घरी तक्रार केली. आमच्या सोबत मनसेचे कार्यकर्ते एकत्र आले आणि जय पाठक याला चोप देऊन पोलिसात पकडून दिले आहे. असे  Zepto स्टोअरमधे काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांनी म्हटले.

पोलिस आता पुढील तपास करत आहेत

zepto मध्ये काम करणाऱ्या मुलींनी तक्रार दिल्या नंतर मनसे कार्यकर्त्यांनी zepto मॅनेजर जय पाठक याला चोप देत  पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आले. पोलिसात zepto मॅनेजर जय पाठक याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असून पोलिस आता पुढील तपास करत आहेत.

Mumbai News: भारतावर अतिवृष्टी, पूर आणि दुष्काळाचे संकट! महाराष्ट्रात दुष्काळ परिस्थितीची चिन्हे

मिनी महाबळेश्वर गारठलं! तापमान थेट एकेरी अंकात; पर्यटकांचा ओढा वाढला

Kolhapur Drink and Drive: कोल्हापुरात मद्यधुंद कारचालकाने दोघा भावांना चिरडले; गोकुळच्या माजी अध्यक्षांच्या मुलाला अटक

जुन्या कॅसेटला मिळाली नवी ओळख! 44 वर्षांपूर्वी फ्लॉप झालेलं गाणं GTA 6 मुळे पुन्हा ट्रेंडमध्ये

Bajra Soup: थंडीच्या दिवसांमध्ये सकाळच्या नाश्त्यात करा बाजरीच्या सूपचा समावेश, पित्ताच्या त्रासापासून मिळेल सुटका