नाशिकमध्ये दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झाली असून अनेक गाव-वाड्यांमध्ये टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे (फोटो - istok) 
नाशिक

नाशिकमध्ये दुष्कळाची तीव्रता वाढली; २०१ गाव-वाड्यांना ६० टँकरने पाणीपुरवठा

नाशिकमध्ये कमी पावसामुळे दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. मागील १५ दिवसांमध्ये टँकरच्या वापरामध्ये वाढ झाली आहे.

प्रीति माने
  • नाशिकमध्ये पाणीटंचाईचे संकट

  • पाऊस कमी पडल्याने जिल्ह्यामध्ये टँकरने पाणीपुरवठा

  • २०१ गाव-वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा सुरू

नाशिक : महाराष्ट्रामध्ये दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली असून यामुळे बळीराजावर संकट ओढावले आहे. काही गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू लागल्याचे दिसून आले आहे. लवकरच नाशिकमध्ये कुंभमेळा होणार असला तरी त्यापूर्वी दुष्काळ जाणवत असल्याचे दिसून आले आहे.

यंदा नाशिक जिल्ह्यात पावसाचा मोठा खंड पडल्याने तेरा तालुके दुःष्काळच्या छायेखाली आले असून भूजल पातळी प्रचंड खालावल्याने विहिरींनी तळ गाठण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे सहा तालुक्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळी प्रशासनावर आली आहे. नोव्हेंबर महिन्याच्या प्रारंभीपासूनच दुष्काळाची मोठी झळ बसण्यास सुरुवात झाली आहे.

नदी, नाले, विहिरींनी तळ गाठल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. सध्या सहा तालुक्यातील ५३ गावे व १४८ वाड्यांवर ६० टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. या माध्यमातून १ लाख ४ हजार ३४७ लोकसंख्येची तहान भागवली जात आहे.

पुण्यातील हल्ला प्रकरणावर पालकमंत्री सुनेत्रा पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, 'गंभीर...'

यंदा पावासाचा मोठा खंड पडल्याने राज्य सरकारने निकषानुसार, जिल्ह्यतील १५ पैकी १३ तालुक्यात दुष्काळ जाहीर केला आहे.  नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्‌यात येवला, मालेगाव, चंदवड, देवळा या चार तालुक्यातील १०३ गाव वाड्‌यावर टॅंकर सुरु होते. मात्र आता दुष्काळाची तीव्रता वाढण्याच सुरुवात झाली आहे. त्यामुळे टँकरची संख्या ३७ वरून ६० वर पोहोचली आहे.

'पुण्याच्या कायदा-सुव्यवस्थेचे अक्षरशः तीनतेरा वाजलेत...' शिवाजीनगर गोळीबार घटनेवरून सुप्रिया सुळेंचा संताप

सध्या प्रशासनच्या वतीने येवला, मालेगाव, चांदवड, देवळा, सिन्नर, आणि नांदगाव या सहा तालुक्यांना टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरु आहे. पुढील काही दिवसात उर्वरित दुष्काळग्रस्त तालुक्यांमधून देखील टँकरसाठी प्रस्तावाची शक्यता असल्याने त्यादृष्टीने प्रशासनाने नियोजन केले आहे. तालुकानिहाय आकडेवारी पाहिल्यास पाण्याचे सर्वाधिक दुर्भिश्य येवला तालुक्यात दिसून येत आहे. एकट्या येवल्यात २७ गावे आणि ५५ वाड्‌यावर २९ टँकर सुरू करण्यात आले आहे. त्यापाठोपाठ नांदगाव तालुक्यात ९ गावे आणि ५३ वाड्यांवर १२ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.

१४ विहिरींचे अधिग्रहण

ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू नये, वासाठी प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरू असून, प्रशासनाने जिल्यात २०१ गाव, वाड्यांसाठी ६० टॅंकर सुरु केले आहे. या दुष्काळग्रस्त गावांना पाणी पुरवठा करण्यासाठी एकूण १४ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.

नाशिक जिल्ह्यातील किती तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे?

यंदा पावसाचा मोठा खंड पडल्याने राज्य सरकारने निकषांनुसार नाशिक जिल्ह्यातील १५ पैकी १३ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे.

नाशिक जिल्ह्यात सध्या किती गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे?

नाशिक जिल्ह्यातील सहा तालुक्यांमधील ५३ गावे आणि १४८ वाड्यांना सध्या ६० टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. याचा लाभ १ लाख ४ हजार ३४७ नागरिकांना होत आहे.

नाशिक जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात पाणीटंचाईची सर्वाधिक तीव्रता आहे?

नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यात पाणीटंचाईची सर्वाधिक तीव्रता दिसून येत आहे. येथील २७ गावे आणि ५५ वाड्यांमध्ये २९ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.

MarMarathi Theatre News : ‘एक तिची गोष्ट’चा रौप्यमहोत्सवी टप्पा! २५ प्रयोग पूर्ण, पंकज त्रिपाठींकडून कौतुकाची थाप

फक्त 6 रुपयांत बेड गरम? Heated Blanket चा वीज वापर जाणून घ्या!

Laxman Hake: 'पवार कुटुंबाचं राजकारण संपेल!' सुप्रिया सुळे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेवर लक्ष्मण हाके स्पष्टच बोलले

रुग्णालयातही मौल्यवान दागिने सुरक्षित नाहीत? कल्याणच्या वैष्णवी हॉस्पिटलमध्ये मंगळसूत्र चोरीला

Nagpur News : सीताबर्डी उड्डाणपूल बंद होताच नागपूरची वाहतूक कोलमडली; पर्यायी मार्गांअभावी नागरिक तासनतास कोंडीत