Prataprao Jadhav on Modern Farming Technology Prataprao Jadhav on Modern Farming Technology
महाराष्ट्र

अल निनोचा धोका, दुष्काळाचे संकट! बदलत्या हवामानानुसार शेतीचे नियोजन करा; केंद्रीय राज्यमंत्री प्रताप जाधवांचे आवाहन

Prataprao Jadhav on Modern Farming Technology: प्रताप जाधव यांनी शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानातून शेती समृद्ध करण्याचे आवाहन केले. मेहकरमध्ये हळद उत्पादकांना तज्ज्ञांनी पीक व्यवस्थापनाचे मार्गदर्शन केले.

Priyanka Mundinkeri
  • शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवा

  • केंद्रीय मंत्री प्रताप जाधव यांचे आवाहन

  • हळद उत्पादक शेतकऱ्यांसाठी विशेष मेळावा

बुलढाणा: बदलत्या हवामान परिस्थिती आणि दुष्काळाच्या आव्हानांवर मात करण्यासाठी शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून पीक व्यवस्थापनावर भर द्यावा. कृषी क्षेत्रातील नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करून शेती अधिक समृद्ध करावी. येणारा काळ हा शेतजमीनधारक शेतकऱ्यांचा असून, योग् य नियोजन आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने शेतीतून अधिक उत्पादन घेणे शक्य आहे, असे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केले.

दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर हळद पिकाचे प्रभावी व्यवस्थापन, उत्पादनवाढ आणि हवामानातील बदलांनुसार शेतीचे नियोजन याबाबत शेतकऱ्यांना तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळावे, या उद्देशाने मेहकर येथील भूमिपुत्र शेतकरी भवन येथे हळद उत्पादक शेतकऱ्यांसाठी केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या पुढाकारातून मार्गदर्शन आणि संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते.

या मेळाव्यात डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली येथील डॉ. नितेंद्र कदम यांनी दुष्काळी परिस्थितीत हळद पिकाचे व्यवस्थापन या विषयावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथील विभागप्रमुख डॉ. हरिहर कोरसकर यांनी पीक व पाणी व्यवस्थापनाबाबत शेतकऱ्यांना माहिती दिली.

तसेच जिल्हा विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. झापे यांनी हळद पिकातील अन्नद्रव्य व्यवस्थापनाचे महत्त्व आणि त्यासंदर्भातील उपाययोजना स्पष्ट केल्या.यशस्वीतेसाठी उपविभागीय कृषी अधिकारी वाघ आणि तालुका कृषी अधिकारी किशोर काळे यांनी सहकार्य केले. मेळाव्यात हळद उत्पादकांसह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. बदलत्या हवामान परिस्थितीत आधुनिक कृषी तंत्रज्ञान, शास्त्रीय पीक व्यवस्थापन आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन यांच्या माध्यमातून शेती अधिक फायदेशीर करण्याचा संदेश या शेतकरी संवाद मेळाव्यातून देण्यात आला.

हवामान अनुकूल व दुष्काळ प्रतिरोधक व्यवस्थापनावर मार्गदर्शन

अल निनोच्या संभाव्य प्रभावाच्या पार्श्वभूमीवर फळबाग पिकांचे हवामान अनुकूल व दुष्काळ प्रतिरोधक व्यवस्थापन या विषयावर कृषी विज्ञान केंद्र, बुलढाणा येथील उद्यानविद्या विषय विशेषज्ञ डॉ. अनिल तारू यांनी मार्गदर्शन केले. तर अल निनोची सद्यस्थिती आणि आगामी काळातील शेतीसमोरील हवामानविषयक आवाहन या विषयावर जिल्हा कृषी हवामान केंद्र, कृषी विज्ञान केंद्र, बुलडाणा येथील हवामानतज्ज्ञ मनीष यदुलवार यांनी सविस्तर माहिती दिली.

केवळ सैद्धांतिक माहितीपुरते मर्यादित न राहता शेतकऱ्यांना प्रत्यक्ष शेतावर जाऊन पीक व्यवस्थापनाची माहिती मिळावी, यासाठी शिवार फेरीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शेताच्या बांधावर जाऊन उत्कृष्ट हळद उत्पादनासाठी आवश्यक तंत्रज्ञान, पीक व्यवस्थापन आणि उत्पादनवाढीच्या उपाययोजनांबाबत तज्ज्ञांनी प्रत्यक्ष मार्गदर्शन केले.

NCP Sharad Pawar : शरद पवारांच्या राष्ट्रवादी महिला आघाडीत मोठी खांदेपालट, दोन महिला नेत्यांवर महत्त्वाची जबाबदारी

शिवाजी पार्क आंदोलन भोवलं! अभिजीत दीपके, आशुतोष रांका, सौरव दासविरोधात LOC जारी; मुंबई पोलिसांच्या कारवाईने खळबळ

धुक्याचा कहर रोखण्यासाठी वाशिम पोलीस अलर्ट! महामार्गावर गस्त अन् विशेष उपाययोजना, वाहनचालकांना सतर्कतेचे आवाहन

Bopdeo Ghat Accident प्रकरणात मोठी बातमी; चालकाला कोर्टाने थेट...; वाचा सविस्तर

Kho Kho Championship : चार गुणांनी हुकले सुवर्ण! कर्नाटककडून महाराष्ट्राचा सलग दुसऱ्या वर्षी पराभव