Wai medical camp  फोटो सौजन्य सोशल मीडिया
महाराष्ट्र

Satara News : वाईत चेलाराम बेल एअर हॉस्पिटलच्या मोफत आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; हृदयरोग, मधुमेहाच्या तपासण्या

वाई येथील चेलाराम बेल एअर फाउंडेशन हॉस्पिटलच्या मोफत आरोग्य शिबिराला पत्रकार आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पुण्यातील तज्ज्ञ डॉक्टरांनी रक्तातील साखर, रक्तदाब, कोलेस्ट्रॉल आणि ईसीजीसह विविध तपासण्या करून वैद्यकीय मार्गदर्शन केले.

Chaitanya Pisal
  • मान्यवरांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन

  • हृदयरोग आणि मधुमेहाच्या विविध तपासण्या मोफत

  • वाईकरांना तज्ज्ञ वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्याचा संकल्प

Satara News : चेलाराम बेल एअर फाउंडेशन हॉस्पिटलच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मोफत हृदयरोग, मधुमेह आणि आरोग्य तपासणी शिबिराला पत्रकार बांधवांसह नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पुण्यातील चेलाराम डायबेटिस हॉस्पिटलच्या तज्ज्ञ डॉक्टरांनी या शिबिरात विविध वैद्यकीय तपासण्या करून नागरिकांना आरोग्यविषयक मार्गदर्शन केले.

मान्यवरांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन

या आरोग्य शिबिराचे उद्घाटन चेलाराम बेल एअर फाउंडेशनचे विश्वस्त इक्बाल धरमशी, वैद्यकीय संचालक डॉ. हर्षल मोरे, फायनान्स कंट्रोल ऑफिसर योगिनी गरुड, डॉ. देशपांडे, सातारा जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष दत्ता मर्ढेकर आणि वाई तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष सचिन ननावरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पत्रकार आणि स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.

हृदयरोग आणि मधुमेहाच्या विविध तपासण्या मोफत

शिबिरात रक्तातील साखर, रक्तदाब, एचबीएवनसी, लाल रक्तपेशी, हिमोग्लोबिन, कोलेस्ट्रॉल यांसह ईसीजी तपासणी मोफत करण्यात आली. तपासणीनंतर डॉ. सुमेरू पाटील आणि डॉ. रिंकल यांनी नागरिकांचे समुपदेशन केले.

तसेच त्यांच्या आरोग्यविषयक तक्रारी समजून घेत आवश्यक वैद्यकीय सल्ला दिला. मधुमेह आणि हृदयरोगासारख्या आजारांचे वेळीच निदान व्हावे, या उद्देशाने शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

वाईकरांना तज्ज्ञ वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्याचा संकल्प

पुण्यातील चेलाराम डायबेटिस हॉस्पिटलचा मधुमेह उपचार क्षेत्रातील नामांकित रुग्णालयांमध्ये समावेश होतो. या रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या सेवा वाईकरांना स्थानिक पातळीवर उपलब्ध करून देण्याचा फाउंडेशनचा प्रयत्न असल्याचे विश्वस्त इक्बाल धरमशी यांनी सांगितले.

अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा आणि तज्ज्ञांचा सल्ला रास्त दरात उपलब्ध करून देण्याचा संकल्पही त्यांनी व्यक्त केला. यावेळी पत्रकार विश्वास पवार, भद्रेश भाटे, जयवंत पिसाळ, विकास जाधव, कुमार पवार, किशोर रोकडे, अनिल काटे, मेजर डॉ. समीर पवार आणि विलास साळुंखे उपस्थित होते. हॉस्पिटलचे जनसंपर्क अधिकारी संदीप बाबर यांनी स्वागत केले, तर विठ्ठल माने यांनी आभार मानले.

Koregaon Nagar Panchayat Election : राजाभाऊ बर्गे यांच्या नेतृत्वाखाली कोरेगाव नगरपंचायतीवर भगवा फडकविणार; शंभूराज देसाईंचा निर्धार

Satara News : साताऱ्यातील ऐतिहासिक तलावात प्लास्टिकचा खच; दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त, रोगराईचा धोका

USA News : पिझ्झा हटचे सह-संस्थापक डॅन कार्नी यांचे निधन; वयाच्या ९५व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Wai: चिखलीच्या आंबेडकर नगरला पाणीप्रश्नातून दिलासा; दहा लाखांच्या कामांचे भूमिपूजन, रोहित वाडकरांच्या प्रयत्नांना यश

Nepal Viral Video: बायबल, येशू ख्रिस्त आणि जागतिक अर्थव्यवस्था! पशुपतिनाथ मंदिरातील साधूचा व्हिडिओ व्हायरल