Satara News : साताऱ्यातील ऐतिहासिक तलावात प्लास्टिकचा खच; दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त, रोगराईचा धोका 
महाराष्ट्र

Satara News : साताऱ्यातील ऐतिहासिक तलावात प्लास्टिकचा खच; दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त, रोगराईचा धोका

साताऱ्यातील शुक्रवार पेठ येथील शाहू कला मंदिरासमोरील ऐतिहासिक तलावात प्लास्टिक पिशव्या, बाटल्या आणि शेवाळे साचल्याने पाणी दूषित झाले आहे. परिसरात दुर्गंधी पसरल्याने नागरिक त्रस्त असून तलावाच्या तातडीच्या स्वच्छतेची मागणी होत आहे.

Rakesh Khedekar
  • तलावात प्लास्टिक पिशव्या, बाटल्या आणि शेवाळे साचले

  • दुर्गंधीमुळे ज्येष्ठ नागरिकांसह लहान मुलांच्या आरोग्याला धोका

  • तलावाची तातडीने स्वच्छता करण्याची नागरिकांची मागणी

Satara News : फरासखाना म्हणून प्रसिद्ध असलेल्या शुक्रवार पेठ येथील शाहू कला मंदिर समोरील जागेत असलेला ऐतिहासिक तलावामध्ये प्लास्टिक पिशव्या, बाटल्या तसेच शेवाळे साचल्याने हे पाणी दूषित झाले आहे. त्यामुळे परिसरात सर्वत्र दुर्गंधी पसरली असून नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने हे धोकादायक ठरू पाहत आहे.

या तलावाची तातडीने स्वच्छता करावी अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे. या तलावात मृत झालेल्या जलचर प्राण्यांची भर पडली असून रोगराईचा धोका वाढला आहे. परिसरातील दुर्गंधीमुळे नागरिक विशेषता ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांना याचा अधिक त्रास होत आहे.

नाले स्वच्छतेत सातत्य हवे

'सुंदर सातारा, स्वच्छ सातारा' या अभियानांतर्गत सातारा शहराच्या विविध भागात ओढे नाले स्वच्छता मोहीम सातारा नगरपालिकेने यापूर्वी राबवलेली आहे. यामध्ये सातत्य हवे असे नागरिकांचे मत आहे. आरोग्याशी निगडित असणाऱ्या प्रश्नाबाबत अधिक जागृतीने काम करणे गरजेचे आहे.

तळं स्वच्छ केल्यास पाण्याचा प्रश्न सुटेल

या संदर्भात श्रीरंग काटेकर असे म्हणाले की, दूषित तळ्यातील पाण्यामुळे परिसरातील नागरिक हैराण झाले आहेत. रात्रीच्या वेळी अधिक प्रमाणात परिसरात दुर्गंधी पसरत आहे. या तलावाच्या कडेने वाढलेली झाडेझुडपे व त्याचा पाला पाचोळा तळ्यात पडत असल्याने ते अधिकच दूषित होत आहे. सध्या सर्वत्र पाण्याची टंचाई जाणवत आहे, अशावेळी अशी तळी स्वच्छ करून ती नागरिकांना वापरासाठी उपलब्ध केल्यास पाणीटंचाईवरील मात होऊ शकेल. त्यामुळे संबंधित यंत्रणेने त्वरित लक्ष द्यावे ही नागरिकांची अपेक्षा असल्याचे काटेकर म्हणाले.

Sharad Pawar in NDA : '१५ डिसेंबरनंतर शरद पवार NDA मध्ये सहभागी होतील...'; बच्चू कडू यांचा मोठा गौप्यस्फोट

Satara News : वाईत चेलाराम बेल एअर हॉस्पिटलच्या मोफत आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; हृदयरोग, मधुमेहाच्या तपासण्या

Koregaon Nagar Panchayat Election : राजाभाऊ बर्गे यांच्या नेतृत्वाखाली कोरेगाव नगरपंचायतीवर भगवा फडकविणार; शंभूराज देसाईंचा निर्धार

USA News : पिझ्झा हटचे सह-संस्थापक डॅन कार्नी यांचे निधन; वयाच्या ९५व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Wai: चिखलीच्या आंबेडकर नगरला पाणीप्रश्नातून दिलासा; दहा लाखांच्या कामांचे भूमिपूजन, रोहित वाडकरांच्या प्रयत्नांना यश