महाराष्ट्र

साताऱ्यात पोवई नाक्यावर शिवसेनेची निदर्शने; राऊतांवरील कारवाई अन् राज्यपालांच्या वक्तव्याचा केला निषेध

महाराष्ट्राबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारे महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी व खासदार संजय राऊत यांच्यावर इडीने केलेली कारवाई या घटनांचा सातारा जिल्हा शिवसेना कार्यकारणीच्या वतीने निषेध करण्यात आला. शिवसैनिकांनी आज पोवई नाक्यावर शिवपुतळा परिसरात जोरदार निदर्शने केली.

ज्ञानेश्वर मोरे

सातारा : महाराष्ट्राबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारे महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी व खासदार संजय राऊत यांच्यावर इडीने केलेली कारवाई या घटनांचा सातारा जिल्हा शिवसेना कार्यकारणीच्या वतीने निषेध करण्यात आला. शिवसैनिकांनी आज पोवई नाक्यावर शिवपुतळा परिसरात जोरदार निदर्शने केली. आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

या आंदोलनात सातारा जिल्हा उपप्रमुख सचिन मोहिते, शहराध्यक्ष बाळासाहेब शिंदे तसेच अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबई बद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचे जोरदार पडसाद महाराष्ट्रात उमटले आहेत. तसेच रविवारी सुट्टीच्या दिवशी शिवसेनेचे खासदार यांची ईडीने ते नऊ तास चौकशी करून त्यांना अखेर ताब्यात घेतले. या दोन्ही घटनांचा सातारा जिल्हा शिवसेना कार्यकारणीच्या वतीने सोमवारी दुपारी पोवई नाक्यावर शिवपुतळा परिसरात जोरदार निषेध करण्यात आला. शिवसैनिकांनी यावेळी जोरदार घोषणाबाजी केली. महाराष्ट्रात आलेलं काळ्या टोपीचं पार्सल परत पाठवा, अशा घोषणा यावेळी शिवसैनिकांनी दिल्या.

शिवसैनिकांची खंत व्यक्त करताना उपजिल्हाप्रमुख सचिन मोहिते म्हणाले, राज्यपालांनी वेळोवेळी महाराष्ट्राच्या जनभावनांचा अपमान केला आहे. छत्रपती शिवरायांबद्दल सुद्धा बेताल वक्तव्य करणारे राज्यपाल यापूर्वीही खपवून घेतले गेले. महाराष्ट्रातील सुधारणावादी विचारवंतांच्या बाबतीतही त्यांनी आकस बुद्धीने वक्तव्य केली आहेत. या सर्व घटनांचे संतप्त पडसाद संपूर्ण राज्यात उमटले आहेत. या घटनांवरील लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी सक्तवसुली संचालनालयाने रविवारी सुट्टीच्या दिवशी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर कारवाई केली आहे, हे चुकीचे आहे. महाराष्ट्रात असले प्रकार शिवसैनिक खपवून घेणार नाही, त्यामुळेच आम्ही शिवसैनिक या घटनांचा निषेध करत आहोत, असे सचिन मोहिते म्हणाले.

या आंदोलनात सातारा तालुका प्रमुख अनिल गुजर, शहर प्रमुख शिवराज टोणपे, शहर संघटक प्रणव सावंत, राहुल गुजर, रवी भणगे, इम्रान बागवान, आझाद शेख, सागर धोत्रे, लक्ष्मण जाधव, सुमित नाईक, गणेश अहिवा ले इं शिवसैनिक आंदोलनात सहभागी झाले होते.आंदोलकांच्या निदर्शनानंतर पोवई नाक्यावर बंदोबस्ताला असणाऱ्या पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन त्यांची शहर पोलिस ठाण्यात रवानगी केली, त्यानंतर आंदोलकांना सोडून देण्यात आले.

Mumbai News: भारतावर अतिवृष्टी, पूर आणि दुष्काळाचे संकट! महाराष्ट्रात दुष्काळ परिस्थितीची चिन्हे

मिनी महाबळेश्वर गारठलं! तापमान थेट एकेरी अंकात; पर्यटकांचा ओढा वाढला

Kolhapur Drink and Drive: कोल्हापुरात मद्यधुंद कारचालकाने दोघा भावांना चिरडले; गोकुळच्या माजी अध्यक्षांच्या मुलाला अटक

जुन्या कॅसेटला मिळाली नवी ओळख! 44 वर्षांपूर्वी फ्लॉप झालेलं गाणं GTA 6 मुळे पुन्हा ट्रेंडमध्ये

Bajra Soup: थंडीच्या दिवसांमध्ये सकाळच्या नाश्त्यात करा बाजरीच्या सूपचा समावेश, पित्ताच्या त्रासापासून मिळेल सुटका