Mira Bhayandar: फोटो-व्हिडिओसाठी महिन्याला लाखोंचा खर्च! मिरा-भाईंदर महापालिकेच्या खर्चावर प्रश्नचिन्ह, नेमकं प्रकरण काय?  
ठाणे

Mira Bhayandar: फोटो-व्हिडिओसाठी महिन्याला लाखोंचा खर्च! मिरा-भाईंदर महापालिकेच्या खर्चावर प्रश्नचिन्ह, नेमकं प्रकरण काय?

मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या खर्चावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कारण विविध योजनांची जनजागृती करण्यासाठी एका खासगी कंत्राटदारावर महिन्याला तब्बल ३ लाख ७५ हजार रुपये खर्च करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने स्थायी समितीसमोर ठेवला आहे.

हर्षदा जाधव
  • महापालिकेला फोटोग्राफीचा भारी शौक! महिन्याला ३.७५ लाखांचा खर्च

  • जनजागृतीच्या नावाखाली कंत्राटदाराची चांदी; महापालिकेच्या तिजोरीला कात्री!

  • विविध योजनांची जनजागृती करण्यासाठी एका खासगी कंत्राटदारावर महिन्याला तब्बल ३ लाख ७५ हजार रुपये खर्च करण्याचा प्रस्ताव

प्रतिनिधी विजय काते

भाईंदर : मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या आर्थिक कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित होण्याची शक्यता आहे. महापालिकेच्या विविध विभागांमार्फत होणाऱ्या विकासकामांचे फोटो काढणे, व्हिडिओग्राफी करणे, सार्वजनिक कार्यक्रमांचे चित्रीकरण आणि विविध योजनांची जनजागृती करण्यासाठी एका खासगी कंत्राटदारावर महिन्याला तब्बल ३ लाख ७५ हजार रुपये खर्च करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने स्थायी समितीसमोर ठेवला आहे. विशेष म्हणजे, केवळ तीन महिन्यांसाठी या कामावर ११ लाख २५ हजार रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. त्यामुळे जनजागृतीच्या नावाखाली महापालिकेच्या पैशांची उधळपट्टी सुरू आहे का, असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.

महापालिकेच्या माहिती व जनसंपर्क विभागाने सादर केलेल्या प्रस्तावानुसार, 'मे. ३ डॉल्फिन्स ग्रुप' या कंत्राटदारामार्फत फोटोग्राफी, व्हिडिओग्राफी आणि IEC (Information, Education and Communication) उपक्रम राबविण्यात येत आहेत. यापूर्वी या संस्थेला देण्यात आलेल्या कामाच्या मुदतवाढीची मुदत १५ ऑक्टोबर २०२६ रोजी संपली आहे. नवीन ई-निविदा प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी लागणार असल्याचे कारण पुढे करत पुन्हा त्याच कंत्राटदाराकडून काम करून घेण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. (फोटो सौजन्य: Instagram)

मात्र, या प्रस्तावामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. महापालिकेकडे स्वतःचा माहिती व जनसंपर्क विभाग असताना फोटोग्राफी, व्हिडिओग्राफी आणि जनजागृतीसाठी दरमहा साडेतीन लाखांहून अधिक रक्कम खर्च करण्याची नेमकी गरज काय? महापालिकेच्या कार्यक्रमांचे फोटो आणि व्हिडिओ तयार करण्यासाठी एवढा मोठा आर्थिक भार कशासाठी? या खर्चाचा प्रत्यक्ष नागरिकांना किती फायदा होतो? तसेच यापूर्वी झालेल्या कामांचा दर्जा आणि त्यावर झालेल्या खर्चाचा हिशोब सार्वजनिक केला जाणार का?

विशेष म्हणजे, नवीन निविदा प्रक्रिया राबविण्याचे कारण देत पुन्हा त्याच संस्थेला काम देण्याची शिफारस करण्यात आली आहे. त्यामुळे स्पर्धात्मक निविदा प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत तात्पुरत्या व्यवस्थेच्या नावाखाली जुन्याच कंत्राटदाराला मुदतवाढ देण्याची पद्धत कितपत योग्य आहे, याचीही चर्चा सुरू होण्याची शक्यता आहे.

एकीकडे पाणीटंचाई, रस्त्यांची दुरवस्था, सार्वजनिक शौचालयांची समस्या, आरोग्य सुविधा आणि नागरी मूलभूत प्रश्नांसाठी नागरिकांना संघर्ष करावा लागत असताना दुसरीकडे फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफीसाठी लाखोंचा खर्च करण्याची तयारी महापालिका प्रशासन दाखवत आहे. नागरिकांच्या कररूपाने जमा होणाऱ्या पैशांचा प्राधान्यक्रम नेमका कोण ठरवणार, असा सवाल उपस्थित होत आहे. आता स्थायी समिती या प्रस्तावाला मंजुरी देते की महापालिकेच्या या खर्चावर जाब विचारते, याकडे मिरा-भाईंदरकरांचे लक्ष लागले आहे.

Health tips: चुकीच्या पद्धतीने बसण्यामुळे वाढतायत मणक्याचे आजार; वेळीच सुधारा बसण्याची सवय, अन्यथा होऊ शकतात 'या' गंभीर समस्या!

Weight Loss: कंबरेचा घेर वाढला आहे? मग सकाळी नियमित प्या 'हा' आयुर्वेदिक काढा, महिनाभरात कमी होईल वजन

Maan: माणदेशच्या मातीत उलगडणार स्त्रीशक्तीचा प्रेरणादायी प्रवास! आशुतोष गोवारीकरच्या निर्मितीचा श्रीगणेशा!

NSEL OTS Payout : NSEL One Time Settlement चे पे-आउट जारी! 14 वर्षांच्या लढ्यानंतर ऐतिहासिक तोडगा; कॉर्पोरेट भारतातील पहिलेच सेटलमेंट

Phulwara: ‘फुलवरा’चा लावणीसाज उलगडला! वैदेही परशुरामी-प्रियदर्शिनी इंदलकर अस्सल मराठमोळी झलक समोर!