एसटी बसस्थानकांतील अस्वच्छतेवर मंत्र्यांचा संताप; ठाण्यातील तीन बसस्थानकांमध्ये प्रताप सरनाईक यांची पाहणी 
ठाणे

Pratap Sarnaik: एसटी बसस्थानकांतील अस्वच्छतेवर मंत्र्यांचा संताप; ठाण्यातील तीन बसस्थानकांमध्ये प्रताप सरनाईक यांची पाहणी

Pratap Sarnaik: ठाण्यातील एसटी बसस्थानकांमधील अस्वच्छतेची दखल घेत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी अचानक पाहणी केली. ठाणे स्टेशन, वंदना आणि खोपट बसस्थानकांची पाहणी करत त्यांनी स्वच्छतेचा आढावा घेतला. तसेच संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने सुधारणा करण्याचे निर्देश दिले आहेत.

श्वेता झगडे
  • ठाणे एसटी बसस्थानकांतील अस्वच्छतेवर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक संतप्त

  • अधिकाऱ्यांना तातडीने सुधारणा करण्याचे निर्देश

  • ठाणे स्टेशन, वंदना आणि खोपट बसस्थानकांची अचानक पाहणी

Pratap Sarnaik : नौपाडा-कोपरी प्रभाग समितीच्या सभापती तथा नगरसेविका मिनल संके यांनी केलेल्या तक्रारीची गंभीर दखल घेत परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी आज (28 नोव्हेंबर 2026) ठाणे शहरातील ठाणे स्टेशन, वंदना आणि खोपट या तीन एसटी बसस्थानकांची प्रत्यक्ष पाहणी केली.

या पाहणीदरम्यान बसस्थानकांवरील पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, प्रसाधनगृहे, वाहतूक नियंत्रण कक्ष तसेच चालक-वाहकांच्या विश्रांतीगृहांची तपासणी करून त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सुधारणा तातडीने करण्याचे निर्देश दिले. यावेळी त्यांच्या समवेत नगरसेविका मिनल संके, नगरसेवक पवन कदम, सुधीर कोकाटे, संजय वाघुले आदी उपस्थित होते. (Pratap Sarnaik)

ठाणे रेल्वे स्टेशन परिसरातील एसटी बसस्थानकावरील प्रसाधनगृहांची दुरवस्था आणि अस्वच्छता पाहून मंत्री सरनाईक यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. "बसस्थानकावरील प्रसाधनगृह हे अस्वच्छतेचे आगार बनले आहे," अशा स्पष्ट शब्दांत त्यांनी अधिकाऱ्यांना सुनावले. स्वच्छतेच्या कामात कोणतीही हयगय खपवून घेतली जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

संबंधित ठेकेदाराकडून दर्जेदार काम करून घेण्यासह स्वच्छतेबाबत तातडीने कार्यवाही करण्याची तंबी त्यांनी अधिकाऱ्यांना दिली. बसस्थानक परिसरात ज्या ठिकाणी पाडकाम झाले आहे, तेथील बांधकाम साहित्य व इतर वस्तू त्वरित हटवून परिसर स्वच्छ आणि व्यवस्थित ठेवावा. तसेच नवीन बसस्थानकाचे काम कोणताही विलंब न करता पूर्ण करावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

"तुम्ही आल्यावर सगळं ठीक होते!" कर्मचाऱ्यांच्या भावना

खोपट बसस्थानकावरील चालक-वाहकांच्या विश्रांतीगृहाला भेट दिल्यानंतर मंत्री सरनाईक यांनी तेथे विश्रांती घेत असलेल्या कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी एका कर्मचाऱ्याने मनातील भावना व्यक्त करताना, "साहेब, तुम्ही आल्यानंतर सगळं ठीक होते. अशाच प्रकारचे दौरे महाराष्ट्रभर करा. त्यामुळे आम्हा कर्मचाऱ्यांना चांगल्या सुविधा मिळतात आणि प्रसन्न वातावरणात विश्रांती घेता येते. चांगल्या सुविधा मिळाल्या तर आम्हीही अधिक जोमाने काम करू," असे सांगितले. या कर्मचाऱ्याच्या या प्रांजळ प्रतिक्रियेची मंत्री सरनाईक यांनी सकारात्मक दखल घेतली. एसटी महामंडळाचा प्रत्येक कर्मचारी हा महामंडळाचा महत्त्वाचा घटक असून प्रवाशांना चांगली सेवा देण्यासाठी कर्मचाऱ्यांनाही चांगल्या सुविधा मिळणे आवश्यक आहे, अशी भूमिका त्यांनी व्यक्त केली.

खोपट बसस्थानकावरील उपलब्ध सोयी-सुविधांबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. खोपटप्रमाणेच स्वच्छ, नीटनेटकी आणि कर्मचाऱ्यांना दिलासा देणारी बसस्थानके महाराष्ट्रातील प्रत्येक विभागात निर्माण झाली पाहिजेत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. या प्रवाशांना स्वच्छ आणि सुरक्षित बसस्थानके, तर कर्मचाऱ्यांना सन्मानजनक व सुविधायुक्त कार्यस्थळ उपलब्ध करून देणे ही एसटी महामंडळाची जबाबदारी आहे. त्यासाठी प्रत्यक्ष पाहणी करून त्रुटी दूर करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे या दौऱ्यातून स्पष्ट झाले.

मुंबईत ‘MIECA 2026’चे चौथे पर्व दिमाखात संपन्न; शिक्षण-उद्योगातील २०० मान्यवर व संस्थांचा सन्मान

'जडेजा जबरदस्त ऑलराउंडर, पण...' चार वेगवान गोलंदाजांच्या प्लॅनवर बहुतुलेंनी सांगितली Team India ची इनसाइड स्टोरी

Health news: आजारांना दूर ठेऊन आरोग्याची काळजी घेण्यासाठी फुफ्फुसांची काळजी घेणे का गरजेचे बनत आहे?

'या' स्मार्टफोनचा लूक बदलला! 5000mAh बॅटरी, 120Hz डिस्प्ले आणि दोन नवे कलर ऑप्शन्स, काय आहे 5G फोनची किंमत?

महागड्या SUV कशाला? कमी बजेटमध्ये दमदार टर्बो इंजिन देणाऱ्या या 5 गाड्या पाहाच