File Photo : Drowned 
महाराष्ट्र

मिठी नदीत दोन तरूण बुडाले; एकाचा मृतदेह सापडला

कुर्ला येथील दोन तरुण जावेद आणि आसिफ माहीम दर्ग्यात दर्शनासाठी गेले होते. दर्शन झाल्यावर दोघेही मध्यरात्री घरी जात असताना शौचाला जाण्यासाठी दोघेही माहिमच्या खाडीपाशी गेले. त्यावेळी एकाचा पाय घसरून तो खाडीत पडला. त्याला वाचवण्यासाठी दुसऱ्याने खाडीत उडी घेतील, पण तो देखील बुडाला.

Ganesh Mate

मुंबई : माहीम येथील दर्ग्यात दर्शन (Darshan In Dargah) घेण्यासाठी आलेले दोन तरुण मिठी नदीत (Mithi River) वाहून गेल्याची दुर्घटना घडली आहे. मध्यरात्री माहीम खाडीवर (Mahim Creek) उभे असताना एका मित्राचा पाय घसरल्याने तो वाहून गेला. त्याला वाचवण्यासाठी दुसऱ्याने धाव घेतली असता तोही वाहून गेला.

मध्यरात्री भरती (Tide) असल्याने अग्निशमन दलाला बचाव (Mumbai Fire Brigade) कार्य करता आले नाही. मात्र, पाणी ओसरताच एकाचा मृतदेह किनाऱ्यालगत आढळून आला असून दुसऱ्याचा शोध सुरू आहे. जावेद आणि आसिफ अशी त्यांची नावे आहेत.

कुर्ला येथील दोन तरुण जावेद आणि आसिफ माहीम दर्ग्यात दर्शनासाठी गेले होते. दर्शन झाल्यावर दोघेही मध्यरात्री घरी जात असताना शौचाला जाण्यासाठी दोघेही माहिमच्या खाडीपाशी गेले. त्यावेळी एकाचा पाय घसरून तो खाडीत पडला. त्याला वाचवण्यासाठी दुसऱ्याने खाडीत उडी घेतील, पण तो देखील बुडाला. घटनेची माहिती मिळताच तात्काळ अग्निशमन दल आणि पोलिसांना पाचारण केले. पण मध्यरात्री मुंबईत मुसळधार आणि भरती असल्याने बचाव कार्य करता आले नाही. पहाटे पाणी ओसरताच एका तरुणाचा मृतदेह किनाऱ्यालगत आढळून आला. तर, दुसऱ्याचा शोध अद्याप सुरुच आहे.

Mumbai News: भारतावर अतिवृष्टी, पूर आणि दुष्काळाचे संकट! महाराष्ट्रात दुष्काळ परिस्थितीची चिन्हे

मिनी महाबळेश्वर गारठलं! तापमान थेट एकेरी अंकात; पर्यटकांचा ओढा वाढला

Kolhapur Drink and Drive: कोल्हापुरात मद्यधुंद कारचालकाने दोघा भावांना चिरडले; गोकुळच्या माजी अध्यक्षांच्या मुलाला अटक

जुन्या कॅसेटला मिळाली नवी ओळख! 44 वर्षांपूर्वी फ्लॉप झालेलं गाणं GTA 6 मुळे पुन्हा ट्रेंडमध्ये

Bajra Soup: थंडीच्या दिवसांमध्ये सकाळच्या नाश्त्यात करा बाजरीच्या सूपचा समावेश, पित्ताच्या त्रासापासून मिळेल सुटका